सोलापूर

आदर्श सरपंच म्हणून संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं -आ.राम सातपुते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आदर्श सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.असे प्रतिपादन माळशिरस तालुका विधानसभा आमदार आ.राम सातपुते यांनी पिरळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटीलयांच्या मार्गदर्शना खालीविविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की
दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत
पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,
उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील
महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदमसर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर
तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, सुनील बनकर शंकर जानकर मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

मुलींच्या स्वागतासाठी संदीप नरोळे यांनी उत्कृष्ट काम केलं आहे-धैर्यशील मोहिते-पाटील


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रमोद शिंदेमुलींच्या स्वागतासाठी संदीप नरोळे  यांनी उत्कृष्ट काम केला आहे.सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात गावचा विकास केला आहे.असे प्रतिपादन शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पिरळे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.  ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शना खाली विविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते  सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी  मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान आ.राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता  ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदम सर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे शंकर जानकर, शांतिनिकेतन साळवे ,सुनील बनकर ,

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा चे प्रास्ताविक   संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

रा.स.प.च्या वतीने ओबीसी आरक्षणसाठी जिल्हाधिकरी कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन

शाहिद भाई मुलांनी अल्पसंख्यांक पश्चिम महाराष्ट्र प्रभारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

उद्या विवार दिनांक 4 जुलै 2021 रोजी पूना नका सोलापुर येथे राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने ओबीसी आरक्षण संदर्भात चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहेओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रासपचे माझे दुग्ध विकास मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशावरून आणि राष्ट्रिय अध्यक्ष अक्किसागर,आमदार रत्नाकर गुट्टे (प्रदेशाध्यक्ष. रासप, बाळासाहेब दोडतले महासचिव.रासप ,यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन आयोजित केले आहे. तरी सर्व समाजबांधवांनी आपल्याहक्कसाठी पारंपरिक वेशात या आंदोलनात,कोरोनाचे सर्व नियम पाळून बहुसंख्येने सहभागी होण्याचे अवाहन राष्ट्रिय समाज पक्षाचे युवा नेते तथा पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडीचे प्रभारी शहीदभाई मुलाणी, युवक जिल्हाध्यक्ष माऊली सरक यांनी केले.

मातंग समाजातील मूकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास

मातंग समाजातील मूकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –एट्रोसिटी कायद्यानुसार आजन्म कारावास होण्याची पंढरपूर तालुक्यातील पहिलीच घटना आहे

 मौजे नांदोरे ता. पंढरपूर जी.सोलापूर येथील अनुसूचित जातीच्या मातंग समाजातील मूकबधीर, मतीमंद व अपंग असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या नांदोरे येथील नारायण भानुदास कदम(वय ५८ वर्षे) याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.चकोर बावीस्कर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्याने पीडितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३० सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी नारायण कदम याने घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यावेळी पीडितेची आजी घरी आल्यानंतर याप्रकरणी तिने कदम याला जाब विचारला असता तो पळून गेला होता. या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपूर तालुक्यासह माळशिरस तालुक्यात उमटले होते. त्यामुळे एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकासदादा धाईंजे, अॅड. सुमित सावंत, अॅड. सुजित निकाळजे, धनाजी शिवपालक, बाबासाहेब सोनवणे, संजय झेंडे, रवि झेंडे, प्रमोद शिंदे, संजय नवगिरे, समीर नवगिरे, प्रविण नलावडे, रवि बनसोडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पोलिस स्टेशन व डीवायएसपी यांना भेटून यांसदर्भात निवेदन दिले होते. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी व मनात चीड उत्पन्न करणारी असल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन वैभव गीते यांनी ही बाब पद्मश्री सुधारकदादा ओलवे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा पद्मश्री सुधारकदादा ओलवे यांच्यासह जर्मनी व कुवैत या देशाच्या महिला पत्रकार यांनीही पंढरपूर तालुक्यातील नांदोरे या गावी भेट देऊन कुटुंबाशी चर्चा केली होती. यादरम्यान अॅड. सुमित सावंत यांनी पीडित व साक्षीदारांना न्यायालयीन प्रक्रिया व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या होत्या. तर मातंग समाजाचे लढाऊ कार्यकर्ते धनाजी तुकाराम शिवपालक यांनी फिर्यादी व साक्षीदारांचे मनोबल वाढवून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामुळे पीडित व साक्षीदारांचे मनोबल वाढले होते. याप्रकरणात एनडीएमजेचे महासचिव डॉ. केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली व रमाताई अहिरे यांच्या नेतृत्वाखाली वैभव गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला शेवटपर्यंत साथ दिली. त्यामुळे याप्रकरणी करकंब पोलिसांत आरोपीच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. तसेच तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयात विशेष खटला नंबर ७६/२०१६ नुसार कामकाज चालले. तेव्हा सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये फिर्यादी पीडितेची आजी, डॉ. आशा घोडके, डॉ. शंकर बोरकर, डॉ. संदीप कुमार, मूकबधीर शिक्षिका गायत्री जोशी, तपास अधिकारी पिंगळे व इतरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. दोन साक्षीदार फितूर घोषित करण्यात आले. मात्र उलट तपासात सरकार पक्षाने घटनेबाबत आवश्यक बाबी न्यायालयासमोर आणल्या. तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायनिवाडे दाखल करण्यात आले. आरोपीचा बचाव व आलेला पुरावा याचे अवलोकन करून न्यायालयाने आरोपी नारायण कदम याला दोषी धरून भादंवि ३७६(२) (जे)(एल) करिता दोषी धरून त्याच्या उर्वरित नैसर्गिक जीवनाच्या अंतापावेतो आजन्म कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(२)(व्ही) करिताही त्याला आजन्म कारावास व ५ हजार रूपये द्रव्यदंड यासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(१)(डब्ल्यू)(१) करिता ५ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ४ करिता आजन्म कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा अशी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे पीडितांसह एससी व एसटी समाजाकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एड. सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले. करकंब पोलिस ठाण्यातर्फे कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलिस फौजदार संजय मंगेडकर हे कार्यरत होते.  

चौकट:-
राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमाला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्याने त्यांचे अंतकरणापासून स्वागत. त्याचबरोबर एनडीएमजेच्या टीमने पीडितांना मदत करून त्यांना न्याय मिळवून दिल्याने त्यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जातीयवाद्यांना व नराधम राक्षसांना एक मोठी चपराक बसल्याने भविष्यात ते एससी व एसटी समाजावर गुन्हे करण्यास धजावणार नाहीत.– विकासदादा धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष, आरपीआय(आठवले)

दहिगाव येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

दहिगाव येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न* 
नातेपुते (प्रमोद शिंदे)- श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव येथे सालाबाद प्रमाणे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला रथाची सुरुवात सकाळी सात वाजता भगवान महावीर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री अनिलकुमार प्रेमचंद दोशी तसेच दोशी परिवार व पायल सागर डूडू नातेपुते यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मानकऱ्यांच्या यांच्या हस्ते पंचवार्षिक मानस्तंभ अभिषेक व मानस्तंभ पायाड उद्घाटन करण्यात आले. यंदाच्या रथ उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जैन मंदिरास 175 वर्ष पूर्ण झाले असून मानस्तंभ एकशे वीस वर्ष पूर्ण झाले आहेत. श्री भगवान महावीर यांच्या मूर्तीचे भव्य तीन मजली लाकडी रथा मधून मिरवणूक काढण्यात आली रथाच्या पुढे नातेपुते येथील बँड पथक तथा अकलूज येथील शांतीसागर ढोल पथक ढोल ताशे वाजून आपली कला सादर करत होते. या रथास शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत हा रथ दहिगाव व पंचक्रोशीतील सर्व समाजाचे लोक दोरीच्या सहाय्याने ओढून ग्राम प्रदक्षणा घालून वाजत गाजत रथ पंडितांच्या माळावर सभामंडपात नेण्यात आला. सभामंडपामध्ये मुनिश्री 108 विनिश्‍चलसगरजी महाराज यांचे प्रवचन घेण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते यांनी देखील हजेरी लावली होती विजयसिंह मोहिते पाटील राम सातपुते यांचा ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त कार्यकारी सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*अतिशय क्षेत्र दहिगाव जैन मंदिरा विषयी थोडक्यात..*

ऐतिहासिक वारसा लाभलेलं दहिगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर, हे मंदिर पुरातन असून या मंदिरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिरा च्या ठिकाणी साक्षात भगवान महावीर हे एक रात्र वास्तव्य करून गेले असल्याचे सांगितले जाते. या मंदिरास 175 वर्ष पूर्ण झाले असून मंदिरासमोरील मानस्तंभास 120 वर्ष पूर्ण झाले आहेत. येथे प्राचीन कालीन भुयार आहे. या मंदिरामध्ये भगवान महावीर यांची काळ्या पाषाणातील पद्मासन अवस्थेत पाच फूट पाच इंच उंचीची विलोभनीय मूर्ती आहे, बाजूला श्री ब्रह्ममहती सागरजी महाराज चरण पादुका मंदिर आहे. त्याला चिटकून पार्श्वनाथ मंदिर आहे. तसेच सरस्वती भुवन ग्रंथालय असून भोयारा मध्ये विविध मंदिरे व मुर्त्या आहेत. त्यापैकी विद्यमान वीस तीर्थंकर संगमरवरी मुर्त्या आहेत व सहस्त्र कूट मंदिर आहे. गाभाऱ्यामध्ये श्री आदिनाथ मंदिर आहे .गाभाऱ्याच्या बाहेर पडताना श्री नेमिनाथ मंदिर आहे, त्यासोबत पार्श्वनाथ मंदिर व क्षेत्रपाल मंदिर आहे. तिथून पुढे वरती आल्यानंतर नंदीश्वर मंदिर, रत्नत्रय मंदिर पाठीमागच्या बाजूस महावीर स्वामी मंदिर आहे. पुढे वासुपूज्य मंदिर आहे. पुढच्या बाजूस बाहेर येताना धरणेंद्र पद्मावती मंदिर आहे .बाहेर मंदिराच्या डाव्या बाजूस भव्य अशी बाहुबली भगवान यांची संगमरवरी मूर्ती आहे. भिंतीच्या डाव्या बाजूला दहिगाव येथील पौराणिक मंदिराच्या इतिहासाचे तैल चित्रे रेखाटण्यात अली आहेत.

रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न*

रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न*

नातेपुते (प्रमोद शिंदे)-श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिर येथे रथोउत्सवानिमित्त अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात 722 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून औषध उपचा करण्यात आले तसेच 30 ते 40 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आले आहे या शिबिरासाठी डॉक्टर राजेश फडे फलटण ,डॉ.आदर्श मेहता सोलापूर, डॉ. वैभव गांधी अकलूज, डॉ. अजिंक्य होरा नातेपुते, डॉ.निखिल फडे पुणे, डॉ. नितीन लोंढे वालचंद नगर, डॉ. निखिल मिसाळ अकलूज, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वैभव गांधी होते तसेच प. पू. 108 श्रमण मुनी श्री विनिश्चय सागर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष विजयकुमार दोशी, डॉ. वैभव गांधी, नरेंद्र गांधी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. तसेच यावेळी दहिगाव चे सरपंच रणधीर पाटील, शिबिर दाता पृथ्वीराज दोशी डॉ.उदय कुमार दोशी दहिगाव येथील ग्रामस्थ डॉ. विकास शहा अशोक दोशी ,डॉक्टर वर्धमान दोशी, डॉ. प्रशांत गांधी,शीतल गांधी ,व मेडिकल असोसिएशन सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषध पुरवठा करण्यात आला होता तसेच मान्यवरांच्या हस्ते त्यागी भवन चिकित्सालया चे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंदिरामध्ये स्वर्गवासी वैभव कुमार अनंतलाल दोशी यांच्या स्मरणार्थ संगीतमय शांतीनाथ विधान सौ पद्मजा राजमहेंद्र अनंतलाल दोशी व दोशी परिवार यांच्यावतीने घेण्यात आले.

वैभव गीते यांच्या प्रयत्न मुळे चर्मकार समाजातील मयत संतोष लक्ष्मण भालके यांच्या कुटुंबा चे पुनर्वसन

वैभव गीते यांच्या प्रयत्न मुळे चर्मकार समाजातील मयत संतोष लक्ष्मण भालके यांच्या कुटुंबा चे पुनर्वसन

सतीश लक्ष्मण भालके यांना मिळाली शासकीय नोकरी

नातेपुते( प्रमोद शिंदे) -मे 2015 मध्ये कंधार तालुका नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे संतोष लक्ष्मण भालके यांची निर्घृण हत्या झाली होती चार वर्षानंतरसुद्धा शासनाने त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन केलेले नाही म्हणून
त्यांचे बंधू साईनाथ भालके राहणार गोणार ता.कंधार जि. नांदेड यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव Dr. केवलजी उके व वैभवजी गिते यांच्याकडे कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची विनंती केली होती,dr. केवलजी उके यांनी ही जबाबदारी . वैभवजी गिते यांचेवर सोपवली होती
चर्मकार समाजातील मयत संतोष लक्ष्मण भालके कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे अशी घोषणा वैभव गितेनी काही महिन्यांपूर्वीच केली होती
जिल्हाधिकारी नांदेड,आयुक्त समाजकल्याण पुणे,सामाजिक न्याय व विशेष सहायय विभाग मंत्रालय या विभागांकडे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेने कायदेशीर पाठपुरावा करून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र निदर्शने करून शासनावर दबाव तयार केला यामुळे दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी सहाययक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांनी शासकीय नोकरीत सामावून घेतल्याची आदेश काढले भालके कुटुंबांनी Dr.केवलजी उके व वैभवजी गिते आभार मानले
महाराष्ट्रातील खून झालेल्या 399 कुटुंबांचे पुनर्वसन केल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही असे वैभव गिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
यापूर्वीच Dr. केवलजी उके व मा. रमाताई आहिरे यांच्या मार्गदर्शनात वैभवजी गिते यांनी नितीन आगे,माणिक उदागे,सागर शेजवळ,विशाल पगारे,संजय दनाने,या गाजलेल्या खून खटल्यांमध्ये त्यांच्या कुटुंबांना नोकरी,जमीन पेन्शन मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे

You may have missed