माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे पवारांची “उत्तम “खेळी

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे  पवारांची “उत्तम “खेळी
 संपादक (प्रमोद शिंदे )- माळशिरस तालुक्यात लोकसभे पासूनच राजकारणाला एक वेगळे वळण लागले आहे लोकसभेला पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादी साठी मोहिते- पाटलांना डावल्या मुळे माळशिरस तालुक्याच्या राजकारणात काळोख पसरला होता मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा प्रकाश टाकला परंतु तोच प्रकाश राष्ट्रवादीसाठी काळोख ठरला त्यातच आता विधानसभेला राष्ट्रवादीकडून शरद पवारांनी भाजपचे नाराज उत्तमराव जानकर यांना टिकीट देऊन  जणूकाही  काळोखात शरदाचे चांदणे  आणले आहे व पवारांनी  राजकारणात उत्तम जानकर यांच्या माध्यमातून  उत्तम खेळी  माळशिरस तालुक्यात  केली आहे  त्यामुळे  राष्ट्रवादीला  नवसंजीवनी  मिळाली असून कार्यकर्त्या मध्ये  नवचैतन्य  निर्माण होऊन  मोहिते पाटलांन विरोधात पुन्हा एकदा मोठी फळी उभी राहिली आहे .माळशिरस तालुक्यातील  चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पंचायत समिती माळशिरस चे माजी उपसभापती उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नुकतीच जाहीर केली असल्याने उत्तमराव जानकर गटामध्ये व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळालेली असून लोकसभेच्या वेळेला मोहिते-पाटील आणि विरोधी गट एकत्र असल्याने भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला आहे. 
माळशिरस तालुक्यामध्ये दोन्ही गट एकत्र झाल्याने माळशिरस तालुका हा पूर्वीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा तो आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून लोकसभे पासून ओळखला जाऊ लागला त्यातच आता फूट पडली आहे व. उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीमुळे माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला नवचैतन्य निर्माण झालेले आहे. उत्तमराव जानकर यांच्यामुळे मोहिते-पाटील गटाच्या  उमेदवाराला  मोठा फटका बसू शकतो.उत्तम जानकर हे खासदार रंजीत सिंह निंबाळकर यांचे निकटवर्ती असल्यामुळे माळशिरस तालुक्यातून जानकर यांना मदत होऊ शकते का हाही मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे शरद पवारांच्या उत्तम खेळीमुळे मोहिते- पाटीलांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे का हा येणारा काळ सांगू शकेल.

You may have missed