नातेपुते येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न .

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)नातेपुते ता.माळशिरस येथे राष्ट्रवादी माळशिरस तालुक्याच्या कार्यकर्त्यांच ची विधानसभेनंतर प्रथमच आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक आगामी निवडणुका संदर्भात घेण्यात आली होती.या बैठकीचे प्रमुख राष्ट्रवादीचे नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर हे होते.या बैठकीत उत्तमराव जानकर बोलताना म्हणाले कार्यकर्त्यांनी कामाचा दर्जा वाढवला तर लोक डोक्यावर घेतील.काम करनाच्या मागे नेहमी जनता असते.काम करणाऱ्याला अडचणी या येत असतात. लोक जात-पात बघत नाहीत.नातेपुते बैठकीत एवढ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते म्हणजे ही विजयाची सुरुवात आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत मध्ये एकत्र येऊन मोठा विजय मिळवू             तसेच फत्तेसिंह माने पाटील म्हणाले सर्वांनी एकत्र आले पहिजे. जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे म्हणाले माळशिरस तालुक्यातील सर्वच पदाधिकार्‍यांच्या निवडी कर रद्द केल्या आहेत.नव्याने पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात येणार आहे.तसेच विकासदादा धाईंजे सूचना मांडताना म्हणाले की पक्ष वाढवायचा असेल तर प्रत्येक मोठ्या शहरात संपर्क कार्यालय असायला हवा तसेच पवार साहेब अठरा तास काम करतात मग कार्यकर्त्यांनी बारा तास काम केले पाहिजे.लोकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे.प्रत्येक बैठकीचे प्रोसिडिंग व्हायला हवे.         कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केले.प्रास्ताविकात धैर्यशील देशमुख म्हणाले की विधान भवनात गोंधळ करणाऱ्यांचा आपण निषेध करूया.तालुक्यात सर्वांना सोबत घेऊन काम करू जे येतील त्यांना सोबत घेऊ जे येणार नाहीत त्यांना वगळून काम करू.आपण सर्वांनी सदस्य नोंदणी वाढवली पाहिजे.तसेच सोमनाथ वाघमोडे,किरण साठे व इतर कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात उत्तमराव जानकर व सुरेश पालवे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल नातेपुते करांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील,उत्तमराव जानकर,धैर्यशील भाऊ देशमुख, सुरेश पालवे,भानुदास पाटील,विकासदादा धाईंजे, सोमनाथ वाघमोडे,पांडुरंग देशमुख,गौतम माने जि.प सदस्य बाळासाहेब धाईंजे,पं.स सदस्य अजय सकट, किरण साठे,उत्तम बरडकर,भानुदास सालगुडे-पाटील, बाबा माने,रंजीत जाधव,राजेंद्र काळे,सेनेचे अमोल ऊराडे,शिवाजी पाटील तसेच पंचक्रोशीतील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संदीप ठोंबरे,ग्रा.प.सदस्य अण्णासाहेब पांढरे,विठ्ठल ठोंबरे,सुशांत पाटील,रावसाहेब पांढरे,बंटी सोरटे व नातेपुते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले होते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर बैठकीत मार्गदर्शन करताना
राष्ट्रवादी चे नेते फत्तेसिंह माने पाटील बैठकीत मनोगत व्यक्त करताना
आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे
राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील भाऊ देशमुख प्रास्ताविक करताना

You may have missed