40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही गवत उपटले का ?अशी टीका शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली

40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही गवत उपटले का अशी टीका शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली
नातेपुते (प्रमोद शिंदे )-चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे होती मग तुम्ही काय चाळीस वर्ष गवत उपटले का अशाप्रकारे शरद पवारांनी मोहिते-पाटलांना वरती हल्लाबोल केला माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर यांच्या प्रचार सभे निमित्त शरद पवार ची सभा अकलूज येथे आयोजित करण्यात आली होती या सभेत त्यांनी भाजप व मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला ते म्हणाले की मला कुस्ती शिकू नका मी कुस्ती बोर्डाचा अध्यक्ष होतो हे लक्षात असू द्या हे लोक रात्री झोपेत सुद्धा शरद पवार, शरद पवार म्हणत असतील, मी जोपर्यंत कृषिमंत्री होतो तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाची किंमत कमी होऊ दिली नाही पुढे होऊ देणार नाही हे लोक चार वर्षांपूर्वी समुद्रात शिवस्मारक व इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करतो म्हणाले होते त्याचे भूमिपूजन हे केलं परंतु एक वीट सुद्धा लावली नाही. हे लोक किल्ल्यावरती छम छम करणार की काय किल्ल्यांना पर्यटन स्थळ करून हॉटेल उभारून शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. एका फटक्यात आम्ही सरसकट कर्जमाफी केली होती अजूनही 70 टक्के लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जामुळे  शेतकरी आत्महत्या करताहेत. कारखाने उद्योगधंदे बंद पडून लोक बेरोजगार होत आहेत कोणाला टिकीट द्यायचं याचा केंद्रबिंदू अकलूज होतं आता ते राहिलेल नाही यावेळचा उमेदवार मी कधीही ऐकला नव्हता हनुमंत डोळस यांच्या मुलाला संधी होती परंतु त्याला संधी दिली नाही ही निवडणूक महत्त्वाची आहे ज्याला शेतकऱ्याचा दुःख कळत नाही त्यांना सत्तेवर ठेवायचं नाही अशा प्रकारची टीका त्यांनी केली यावेळी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले पूजन केले राफेल हे विमान अफगाणिस्तानचे होते आपलं विमान एक वर्षांनी येणार आहे भाजपला एक ही योजना व्यवस्थित करता आली नाही. धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले की ज्यांनी आम्हाला कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे गाजर दाखवले त्यांना आम्ही आता मुळा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच्या पोराला बदाम घालून आपलं पोरगं पैलवान होणार आहे का? आमच्या तालुक्यात सुद्धा ऊसतोड कामगार आहेत .शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पवार साहेबांन शिवाय पर्याय नाही अशी  टीका त्यांनी केली, तसेच बबनदादा शिंदे, उमेदवार उत्तम जानकर, सुभाष देशमुख, अविनाश काळे, बाळासाहेब धाइंजे ,किरण साठे ,आप्पा कर्चे यांनीसुद्धा भाजपवर हल्लाबोल केला यावेळी अजय सकट श्रीकांत शिंदे अण्णा शिंदे पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed