घरकुल योजना मनरेगा चे पैसे लाभार्थ्यास न मिळाल्याने पंचायत समिती समोर अमरण उपोषण*

  • घरकुल योजना मनरेगा चे पैसे लाभार्थ्यास न मिळाल्याने पंचायत समिती समोर अमरण उपोषण*
    पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-माळशिरस तालुक्यातील रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत मनरेगा अंतर्गत नेमलेले ग्रामरोजगार सेवकानीं मस्टर भरलेले नसल्यामुळे रु.18000/मिळाले नाहीत सदरची रक्कम मिळावी या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव विशाल साळवे यांनी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन केले.दरम्यान याची दखल घेऊन सदर घटनेची चौकशी करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिले.माळशिरसचे माजी सरपंच विकास(दादा)धाइंजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात आले. माळशिरस तालुक्यातील मस्टर न भरलेले ग्रामरोजगार सेवक,ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करावी व घरकूल लाभार्थ्यांना न्याय मिळावा..तसेच मौजे कोथळे,मोरोची,गुरसाळे,भांबुर्डी,शिंदेवाडी,धर्मपुरी ता.माळशिरस येथील 14 वा. वित्त आयोग किती रुपये आला व कोठे खर्च केला याची चौकशी व्हावी.व मार्च 2005 ते 31 मार्च 2021पर्यंत वरील गावात दलित वस्ती,15/% निधी किती रुपये आला व कोठे खर्च केला याची चौकशी व्हावी.यावेळेस रिपाइंचे ऐन.के. साळवे,दयानंद धाइंजे,प्रदीप धाइंजे यांनी भेट दिली.यावेळेस सुनिल ढोबळे,रणजित कसबे, अनिल लांडगे उपस्थित होते.

You may have missed