गणेशोत्सवानिमित्त पिरळे येथ कोविशील्ड लसीकरण उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपिरळे तालुका माळशिरस येथे गणेश उत्सवा निमित्त कोविशील्ड19 लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.कोरणा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचे महत्व लक्षात घेऊन पिरळे येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात कोविशील्ड 19 लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.या लसीकरणाचे उद्घाटन पिरळे गावचे सरपंच उद्योजक संदीप सेठ नरोळे,फोंडशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किर्ती सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे लसीकरण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी किर्तीसिंह पाटील यांच्या नेतृत्वात एल.एच.व्ही.विजया चव्हाण, आरोग्य सेविका विजया शिंदे,आरोग्य सेवक विशाल काशीद,आशा वर्कर सुवर्णा शिंदे,मंदाकिनी माने,पुष्पा पैलवान यांनी पार पाडले.यावेळी पोलीस पाटील औदुंबर बुधावले सर,उपसरपंच उमेश भैय्या खिलारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस,शिवाजी लवटे-पाटील सर्व व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.तसेच पिरळे ग्रामपंचायत, ग्रामसेवक रमेश जमदाडे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे, सर्व शिक्षक/शिक्षिका ,ग्रामपंचायत कर्मचारी ,बाळासाहेब खिलारे, अनिल वाघमोडे, नितिन खिलारे ,धनंजय साळवे तलाठी कपिल मसलखांब, कोतवाल विश्वास बनकर यांनी लसीकरण यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. पिरळे गावातील सर्व ग्रामस्थांचे 100% लसीकरण करणार असल्याचं सरपंच संदीप नरोळे यांनी सांगितले.दोन दिवसात तेराशे ग्रामस्थांना लसीकरणाची नियोजन केले आहे.तसेच त्यांनी प्राथमिक आरोग्य फोंडशिरस वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

You may have missed