डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्या चे एन.डी.एम.जे. संघटनेची मागणी

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; कठोर कारवाई करण्याचे एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली व ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन……

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेरावदिनांक २४\९\२०२१रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेबांच्या अदेशा नुसार व मा.विजयजी कांबळे ठाणे जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
ॲड. प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध वेक्त करून
सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण

बाजारपेठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.यशवंत चव्हाण

डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त मा.मोरे साहेब यांना निवेदन दिले
२३ आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील १० ते १२ आरोपी विविध राजकीय पक्षांशी संबधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.संघटनेने पोलीस आयुक्तांना आरोपीवर कोठार कारवाई करण्यास निवेदन दिले आहे.

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटनेत २३ आरोपींना अटक झाली आहे. याप्रकरणी दोषी आरोपींना अटक करण्याच्या निवेदन पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
अशा प्रकारच्या घृणास्पद घटना घडू नये, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल. असे याप्रकरणी छोट्या घटना घडल्या तरीही पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला हवी एन.डी.एम.जे.संघटनेनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

२३ आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील १० ते १२ आरोपी विविध राजकीय पक्षांशी संबधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन पीडितेवर ३३ नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य सलग नऊ महिने केले अत्याचार
१५ वर्षीय पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २२ जानेवारी २०२१ तिच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने अत्याचार करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तेव्हापासूनच तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरात आरोपींनी २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत म्हणजे ९ महिन्यापर्यत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास भादवि ३७६, ३७६ (एन), ३७६ (३) ३७६ (ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम ४, ६१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कल्याण पोलीस परीमंडळ ३ मधील इतर पोलीस ठाणे तसेच मानपाडा पोलीस ठाण्यातील ४ पोलीस पथकांनी आरोपीचे नाव व राहण्याचे ठिकाण शोधून काढले. २३ जणांपैकी २ बालकांचाही या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आला आहे. या गुन्ह्यातील उर्वरीत १० आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न करत असल्याचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन आणि सोनाली ढोले करत आहेत.
निवेदन देत्या वेळेस
उपस्थित पदाधिकारी मा. विजयजी कांबळे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मा.ॲड.प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष, मा.शशिकांतजी खंडागळे , मुंबई ठाणे प्रदेश सचिव,
मा विनोदजी रोकडे ठाणे जिल्हा सचिव,
मा.संदेशजी भालेराव ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, लाईव महाराष्ट्र टुडे संपादक राहुल सावंत,
कल्याण डोंबिवली सचिव संदीप घुसळे, सुप्रसिद्ध गायक सुरेश घोडेराव कल्याण डोंबिवली सदस्य संघटक कुशल निकाळे, शहापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड, संघटक सुमित जाधव,
व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

You may have missed