ऊसतोड कामगारांना ओळख पत्र मिळण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने माळशिरस तेथे आंदोलन


एका तासात प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत सर्व ग्रामसेवकांना दिले आदेश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने प्रथमच राज्यात ऊसतोड कामगारांना ओळख पत्र मिळण्यासाठी माळशिरस तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले होते.हे आंदोलन आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे व एन डी एम जे राज्य महासचिव ऍड केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य सचिव वैभव गिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होतो. 21 सप्टेंबर 2021 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासनाने ऊसतोड कामगार चे राहणीमान उंचावण्यासाठी ऊसतोड कामगारांना विविध योजना मिळण्यासाठी ओळखपत्र देण्याबाबत शासन निर्णय काढला होता.परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली गेली नाही म्हणून नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालय वर ऊसतोड कामगारांच्य विविध मागण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले हो. हे राज्यात प्रथमच तोड कामगारांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाची  प्रशासनाने तात्काळ दखल घेत गट विकास अधिकारी यांनी एका तासाच्या आत माळशिरस तालुक्यातील एकशे आठ गावातील ग्रामसेवकांना ऊसतोड कामगारांची नोंदणी करून घेण्याबाबत आदेश दिले आहेत. ऊसतोड कामगारांसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन केले असून भविष्यात ऊसतोड कामगारांसाठी शासन विविध योजना जाहीर करणार आहे.यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी आवश्यक आहे.शासन निर्णय  निघून सुद्धा एक महिना होत आला अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही.दसऱ्यानंतर ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी आपल्या गावातून परगावी ऊस तोडण्यासाठी जात असतात जवळपास सहा महिने त्यांना बाहेरगावी राहावे लागते. त्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहू शकतात त्यासाठी त्यांची नोंदणी तात्काळ होणे गरजेचे आहे. म्हणून नॅशनल दलीत मोवेमेंत फोर जस्टीस या संघटनेने ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळवून योजनेचा लाभ मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटल्याचे दिसून आले.ऊसतोड कामगारांनी आपापल्या ग्रामसेवकांना भेटून स्वतःची नोंदणी करून घ्यावी सोड मजुरांचे नोंदणी करण्यास ग्रामसेवक व संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असेल अशा ऊसतोड मजुरांनी तात्काळ संघटनेच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधावा असे आव्हान राज्य सचिव वैभव गीते यांनी केले आहे. या आंदोलनास आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे राज्य सचिव वैभव गीते, प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे,डॉक्टर कुमार लोंढे,रिपाई तालुका सरचिटणीस रोहित सोरटे, संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे, महेश शिंदे,प्रशांत खरात,धनाजी शिवपालक,गणेश गायकवाड,रंजीत कसबे, संघर्ष सोरटे ,विशाल सोरटे नाना गायकवाड,भगवान भोसले,वींद्र झेंडे, नवनाथ भागवत,राजू शिंदे कार्यकर्त्यांसह ऊसतोड मजूर व मुकदम मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed