वनविभागाच्या हद्दीतील आपट्याची झाड तोडणारा वर गुन्हा दाखल करणार- वनअधिकारी सोमनाथ शिरसागर

वनविभागाच्या हद्दीतील आपट्याची झाड तोडणारा वर गुन्हा दाखल करणार-वन अधिकारी सोमनाथ शिरसागर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेनातेपुते फोंडशिरस वन परिमंडळ हद्दी मध्ये आपट्याची अगर इतर झाडे तोडणारा वर वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करणार असल्याचं वन परिमंडळ अधिकारी सोमनाथ शिरसागर यांनी सांगितले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपट्याची पानं सोने म्हणून देण्याचा परंपरा आहे यासाठी विविध भागात मोठ्या प्रमाणात चोरून आपट्याची झाडे तोडली जातात याचा परिणाम पर्यावरणावरती होतो वनविभाग हे मोठ्या कष्टाने खडकाळ भागात डोंगर भागात वन विभागाच्या हद्दीमध्ये झाडे लावत असतात एक झाड येण्यासाठी वर्षानुवर्ष लागते पण तू काही कारणानिमित्त एका दिवसासाठी अनेक वर्ष चे झाड तोडले जाते हे चुकीचं असून आपण सर्वांनी वनसंरक्षण केले पाहिजे झाडांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळते आपट्याचे झाड हे वनौषधी असून त्याचे अनेक फायदे आहेत अशा झाडांना विनाकारण तोडू नये उलट दसऱ्याच्या दिवशी एक झाड लावून पर्यावरण राखत नागरिकांनी दसरा साजरा करावा त्याचा फायदा भविष्यात पर्यावरण समतोल राखण्यासाठी होईल असे आव्हान वनाधिकारी शिरसागर यांनी केले.जर कोणी वनविभागाच्या हद्दीत आपट्याचे झाड अगर कोणते झाड तोडताना आढळल्यास त्याच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल

You may have missed