अनुसूचित जमातीच्या लोकांना वस्तीत जाऊन तहसीलदार यांनी जातीचे दाखले व रेशन कार्ड द्यावे एन.डी.एम.जे ची मागणी.

अनुसूचित जमातीच्या लोकांना वस्तीत जाऊन तहसीलदार यांनी जातीचे दाखले व रेशन कार्ड द्यावे एन डी एम जी ची मागणी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर प्रतिनिधी ;अनुसूचित जमातीच्या वाड्यावर तांड्यावर प्रत्येक वस्तीत जाऊन त्या कुटुंबांना रेशन कार्ड जातीचे दाखले जात वैधता प्रमाणपत्र आधार कार्ड व इतर लागणारे दाखले जाग्यावर देण्यात यावे अशी मागणी नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे कामे याबाबत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबविण्याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प सोलापूर यांनी दिनांक 13/ 9/ 20 21 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना लेखी आदेश दिले आहेत परंतु पंढरपूर तहसीलदार यांच्याकडून अद्याप कारवाई झाली नसल्याने नॅशनल दलित मोमेंट फोर जस्टीस चे आदिवासी विभाग जिल्हाप्रमुख जिल्हा श्याम काळे व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक यांनी पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर ती कारवाई न झाल्यास नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे निवेदनाद्वारे म्हटले आहे

You may have missed