श्री १00८ महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथ यात्रेनिमित्त विविध उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री  १00८ महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथ यात्रेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.गेली दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीमुळे रथोत्सव साजरा करता आला नाही परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने यंदा नेहमीप्रमाणे रथोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे.रथोत्सवाची सुरुवात बुधवार 24 नोव्हेंबर ते शुक्रवार 26 नोव्हेंबर पर्यंत रथ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 भगवान श्री यांचा अभिषेक तसेच संगीतमय भक्ताम्बर विधान दुपारी 2  वाजता श्री 1008 जिनेन्द्र देवाधिदेव पालखी शोभायात्रा,बगीचा येथे संगीतमय चढावे अभिषेक, गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 ते 9:30 श्री 1008 बाहुबली भगवान यांचा अभिषेक तसेच श्री ब्रह्मामहती सागर चरण पादुका अभिषेक सकाळी  10 ते1:30 संगीतमय शांतीनाथ विधान तसेच सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वरोग निदान शिबिर आयोजन.सायंकाळी 4:30 ते 5:30 संगीतमय चढावे तथा अभिषेक आयोजन.शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सुशोभित धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांची मूर्ती रथामध्ये विराजमान करून भव्य शोभा रथ यात्रा काढण्यात येईल. दुपारी 12 वाजता सभामंडप उद्घाटन तसेच रथा मधून मंडपामध्ये मूर्ती घेण्याचा कार्यक्रम,त्याच ठिकाणी श्री जिनेन्द्र कला मंच हसुर यांचा संगीतमय कार्यक्रम व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केले आहे. या रथो उत्सवास महाविर सेना नातेपुते,सन्मती सेवा दल स्वयंसेवक उपस्थित होऊन रथ शोभा वाढवतील.या रथोत्सवास अतिशय क्षेत्र दहिगाव समस्त जैन बांधवांच्या वतीने  निमंत्रण देण्यात येत आहे.

You may have missed