दैनिक अजिंठा टाइम्स वृत्तपत्राच्या “दिपोत्सव” विशेषांकाचे प्रकाशन ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई (प्रतिनिधी) दिनांक २२/११/२०२१ रोजी सायंकाळी पोलिस वसाहत कल्याण पश्चिम येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे दैनिक अजिंठा टाइम्स वृत्तपत्राच्या “दिपोत्सव” विशेषांकाचे प्रकाशन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस तसेच महिला व बाल विकास विभागाचे मंत्रालइन सदस्य ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते व जेष्ठ विचारवंत राजाराम पाटील तसेच जेष्ठ साहित्यिक व स्वतंत्र कामगार युनियनचे अध्यक्ष सागरजी तायडे, रेल्वे कंट्रोल अधिकारी सुधाकर सरवदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

दै.अजिंठा टाइम्सच्या प्रकाशनास शुभेच्छा देताना ॲड.केवल उके म्हणाले की सध्याच्या काळात चळवळीचे मुखपत्रे हे फारच कमी झाले आहेत ‌व समाजावरील अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवला जात नाही. याला वाचा फोडण्याचे काम दैनिक अजिंठा टाइम्स व संपादकीय मंडळ व प्रतिनिधी करतील त्या मुळे संबंध देशात आवाज पोहचला जाईल असी अपेक्षा व्यक्त केली. ज्याप्रकारे नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेने समाजात अनेक “चंद्रू “तयार केले आहेत. त्याच पद्धतीने दै.अजिंठा टाइम्स मध्ये लेखणीच्या माध्यमातून चांदृ तयार व्हावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली. पुढे बोलताना ॲड.केवल उके म्हणाले की अजिंठा टाइम्स चे संपादक हे बोलून दाखवत नाहीत तर करून दाखवतात. संपादक संजय माकेगावकर हे पंधरा ते सोळा वर्षां पासून माझ्या सोबत काम करत असताना बोलणे कमी पण काम हे कृतीत उतरवून करून दाखवतात असेही ॲड.केवल उके म्हणाले.

आग्री कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी व्यापक लढा उभारणारे ओबीसीचे नेते जेष्ठ विचारवंत राजाराम पाटील यांनी दैनिक अजिंठा टाइम्स ला शुभेच्छा पर मार्गदर्शन करताना म्हणाले की मुंबई-ठाणे भागातील ओबिसी समाजाच्या व्यथा मुंबई येथील वृत्तपत्रातून मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, कोळी समाजाच्या अनेक अडीअडचणी येतात त्यावर वृत्तपत्रातून आवाज उठवला तर तो महाराष्ट्र भर प्रसिद्ध होत नाही. परंतु दैनिक अजिंठा टाइम्सने मुंबई-ठाणे येथील सर्वसाधारण जनतेचा आवाज आपल्या दैनिकाच्या माध्यमातून महाराष्ट्राभर पोहचविण्याचे काम करत आहात त्या बद्दल व दैनिक अजिंठा टाइम्सच्या दिपोत्सव विशेषांकास व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण मोरे यांना काही तांत्रिक अडचणी मुळे प्रत्यक्ष हजर राहता आले नाही परंतु त्यांनी ऑनलाइन व्हिडिओ काॅन्फ्रशद्वारे दैनिक अजिंठा टाइम्सच्या दिपोत्सव विशेषांकाच्या प्रकाशना निमित्त सर्व संपादकीय मंडळास शुभेच्छा दिल्यात.

स्वतंत्र कामगार युनियनचे अध्यक्ष, कामगार नेते सागरजी तायडे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात बोलताना म्हणाले की संपादक संजय माकेगावकर हे माझे सहकारी व चांगले मित्र आहेत. त्यांना मी पंधरा वर्षांपासून ओळखतो त्यांना कामाची तळमळ आहे व ते चिकाटीने काम करतात. निस्वार्थी वृत्तीने व एकनिष्ठेने काम करत असतात. दैनिक अजिंठा टाइम्सच्या या रोपट्याचे भविष्यात विशाल वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल आणि वंचित समुद्यचे भविष्य उज्वल करतील अस्या शब्दात शुभेच्छा देताना सागर तायडे हे बोलत होते. यावेळी सेंट्रल रेल्वे अधिकारी सुधाकर सरवदे आणि एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे यांच्या सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर विचार मांडले.
दैनिक अजिंठा टाईम्स चे संपादक संजय कांबळे (माकेगावकर) व संपादकीय मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजनकेले होते. या करिता एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे, एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष अँड प्रविणजी बोदडे व त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून एन.डी.एम.जे सातारा जिल्हा पदाधिकारी पिराजी सातपुते,एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिशजी सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, संघटक शशिकांतजी वाघ, नागसेन बुक डेपोचे संचालक सोमनाथ भोसले, एन.डी.एम.जे ठाणे जिल्हा सचिव विनोदजी रोकडे, उपाध्यक्ष विकासजी चव्हाण, सहसचिव सुनिलजी ठेंगे, ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव, कल्याण डोंबिवली शहर संघटक नथुराम मोहिते,एन.डी.एम.जे.शहापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड, सुमित जाधव तसेच इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संपादक संजय माकेगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.डी.एम.जे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण सर यांनी केले.

You may have missed