अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्याकडून नातेपुते पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)-अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब यांच्याकडून दी 23/11/2021 नातेपुते पोलीस ठाणे चे वार्षिक प्रशासकीय तपासणी करण्यात आली. ही तपासणी सकाळपासून सुरु होती. तपासणी दरम्यान नातेपुते पोलीस ठाणे येथे सलामी देण्यात आलीSquad drill तसेच,रजिस्टर चेकिंग,नोट्सreading,
मुद्देमाल चेकिंग,गोपनीय रजिस्टर चेकिंग,प्रशासन भाग 4 लिहिणे,शीट, इत्यादी गोष्टी तपासण्यात आल्या.


पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक यांची मिटिंग घेण्यात आली.मीटिंगमध्ये नातेपुते परिसरातील सर्व पोलीस पाटील यांना अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले.बोलताना ते म्हणाले की पोलीस पाटील हा प्रशासनातील महत्त्वाचा घटक असून हे मानाचे पद आहे.आपण त्या पदाची प्रतिमा राखी पाहिजे.पोलिस पाटलांनी राजकारण करू नये,राजकारणात पडू नये ग्रामीण भागात पंचांच्या माध्यमातून तंटे मिटवण्याचे परंपरा आहे.

त्यासाठी पोलीस पाटील चारित्र्यवान असला पाहिजे.पोलीस पाटील व्यसनमुक्त असला पाहिजे दारू विक्रीची माहिती पोलीस स्टेशनला पोलीस पाटलांनी दिली पाहिजे.पोलीस पाटलांनी आपले काम काळजीपूर्वक करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.पोलीस पाटलांनी सत्याची बाजू घेतली पाहिजे आणि सत्य आहे ते सांगितले पाहिजे.जे पोलीस पाटील राजकारण करतील त्यांना तात्काळ सस्पेंड केले जाईल.ज्यांना राजकारण करायचा आहे त्यांनी राजीनामा देऊन खुशाल राजकारण करावे.पोलीस पाटलांकडे मुशाफिर रजिस्टर,गाव भेट रजिस्टर असणे गरजेचे आहे.पोलीस पाटलांनी राजकीय, धार्मिक,संवेदनशील माहिती पोलीस स्टेशनला दिली पाहिजे.ऑपरेशन परिवर्तन व सुरक्षिततेवर भर दिला पाहिजे.गावात सीसीटीव्ही बसवणे,ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी करणे यावर भर दिला पाहिजे.अशाप्रकारे पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले.तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सर्वांसमोर गाव गुंडांच्या कुंडल्या वाचल्या तसेच गावगुंडांना व गुन्हेगारांना व्यवस्थित राहण्याचा इशारा दिला.दारू विक्रीत्यांचा बंदोबस्त करू असेही त्यांनी सांगितले.तसेच त्यांनी फोंडशिरस येथे गाव भेट दिली ऑपरेशन परिवर्तन व ग्राम सुरक्षा यंत्रणा याचा वापर करण्याचे आव्हान केले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव डी.वाय.एस.पी शिवपुजे,नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर,पी.एस.आय बैनवाड मॅडम,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल गणेश कापसे, नागरगोजे,हंगे,लोहार इतर कर्मचारी तसेच महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

You may have missed