बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत…वैभव गिते, राज्य सचिव एन.डी.एम.जे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे दालनात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.यामध्ये प्रामुख्याने सफाई कामगार,कंत्राटी कामगार,लाड-पागे समिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना,सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती,या विषयांसह जातीय अत्याचारात खून झालेल्या पीडितांचे नोकरी,जमीन,पेंशन देऊन पुनर्वस करणे,एट्रोसिटी ऍक्ट अंमलबजावणी,सर्व जाती धर्माच्या ऊसतोड मजुरांना ओळखपत्र,बांधकाम मजूरांच्या योजना,कायदा सुव्यवस्था इत्यादी विषयांवर जिल्हाधिकारी यांच्याबरोबर महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली.चर्चेत प्रामुख्याने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणी,कंत्राटी कामगारांना किमान वेतन,भविष्य निर्वाह निधीची मागणी करून कामगारांचे पुनर्वसन करण्यासह शासनाच्या मागासवर्गीयांसाठी चालू योजनांची सद्यस्थिती आणि अंमलबजावणीमधील त्रुटी योजनांचे शासन निर्णय,परिपत्रके,याचे दाखले देत अनेक गंभीर बाबी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणल्या,आमदार प्रणितीताई शिंदे अध्यक्ष अनुसूचित जाती कमिटी विधानभवन यांनी योजनांच्या अंमलबजावणीकरीता महत्वपूर्ण सूचना केल्या.समिती सदस्य बालया मडेपू यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विषयनिहाय संबंधित विभागांना पुढील बैठकीला येताना सर्व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून प्रत्येक महिन्याला बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.बैठकीस समाजकल्याण,महानगरपालिका, नगरपालिका,रेल्वे,पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त,विभागातील अधिकारी उपस्थित होते.

You may have missed