चिंताग्रस्त आदिवासींना एन डी एम जे ची दिलासादायक भेट

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रायगड-दिनांक २८\११\२०२१रोजी चिंताग्रस्त आदिवासींना एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश टीम ने भेट घेतली असता.

जंगल आणि जमीचे मालक असणारा आदिवासी समाज सिडको प्रशासनाच्या विकास आराखड्यात बेचिराख झाला आहे ,सिडको विकास आराखड्यात केवळ आदिवासी वाड्याच आल्या नाहीत तर गैर आदिवासी गावं सुद्धा आलेली आहेत मात्र कोणत्याही गावावर सिडको प्रशासनाने बुलडोझर चालवलेला नाही किंवा एका घराची विट सुद्धा हळवलेली नाही सिडको आराखड्यात केवळ आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्या जमीनदोस्त केल्या जातात
आदिवासी समाज बांधवांची घरे तोडून श्रीमंतांच्या बायकांना फिरण्यासाठी गार्डन तर मुलांना खेळण्यासाठी खेळांचे मैदान दिले जातात याशिवाय धानदांड्ग्या ना धर्मदाय मधून कॉलेज व शाळेसाठी करोड रुपये किंमतीचे प्लॉट दान धर्मात दिले जातातही बाब महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय देवतेला काळीबा फासणारी असून आदिवासी समाजाला होणाऱ्या शासकीय जुलमा विरोधात खंबीरपणे उभे राहून कोणताही आदिवासी बांधव घरापासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊन आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही तो पर्यन्त एन डी एम जे टीम ने संघर्ष करून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे निर्देश मा ऍड डॉ केवल उके सर महासचिव एन डी एम जे याना दिल्यावरून आज दिनांक २८\११\२०२१रोजी राज्याचे निरीक्षक आयु बी पी लांडगे मुबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे सचिव शशिकांत खंडागळे यांनी मोजे पेटाली फेस वन तळोजा येथे भेट दिली आदिवासी वाडीतीलसमाजाला निश्चित न्याय मिळवून दिला जाईल असे संकेत टीम ने दिले
प्रतिनिधि. बंदिश सोनवणे

You may have missed