नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट च्या वतीने छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्यचे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट ता माळशिरस अध्यक्ष विकास दादा धाईंजे  यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नालंदा बुद्ध विहार येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.10 वी 12 वी मध्ये चांगले गुण मिळवून यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना नूतन नायब तहसीलदारपदी नियुक्त झालेले प्रतिक आढाव, माळशिरस पोलिस स्टेशनचे पी.आय दिपरत्न गायकवाड, विक्रीकर निरीक्षक सचिन पाटिल यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण,मूकबधिर विद्यालय तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य बाळासाहेब धाईजे ,आबासाहेब सावंत,बापु धाईजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते आदरणीय विकास दादा धाईंजे ङाॅ. कुमार लोंढे , प्रा उत्तम मोटे सर, ॲड वैभव धाईंजे,विशाल साळवे , ज्ञानदेव कांबळेपाटिल ,दत्ता सोरटे,प्रमोद शिंदे,प्रदीप धाईंजे प्रा. अजीत भोपळेसर,रणजित कसबे , रजनीश बनसोङे , राम कांबळे,दया धाईजे, ङाॅ.अशोक धाईजे , सुरेश मोटे,शशी साळवे,मिलींद गायकवाड,अनिल जाधव, रिकेश चव्हाण,सौरभ वाघमारे , नागेश वाघंबरे , दत्ता वाघमारे , आबा वाघमारे ,ङि जी कांबळे , मारूती सरगर,रणजीत धाईजे,बुध्दभूषण धाईजे , बुध्दभूषण बनसोङे ,विनोद धाईजे , सौरभ बनसोङे , दादा धाईजे,रोहित धाईजे,प्रेमसिंह कांबळे सह मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व,मुकबधीर शाळेचे प्राचार्य, शिक्षक , जि प शाळेचे शिक्षक वर्ग आणि  विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट चे अध्यक्ष विकासदादा धाईंजे यांनी तर सूत्रसंचालन प्रदीप धाईंजे यांनी केले.

You may have missed