आळंदी ते पंढरपूर उलटपावली पाई वारी करून आंदोलन करणारे -बापूराव गुंड

आळंदी ते पंढरपूर उलटपावली पाई वारी करून आंदोलन करणारे -बापूराव गुंड

आळंदी ते पंढरपूर उलटपावली पाई वारी करून आंदोलन करणारे -बापूराव गुंड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

आळंदी ते पंढरपूर 225 किलोमीटर उलट पावली पाई वारी करणारे पुण्याच्या भोसरी येथील बापूराव गुंड हे अख्या वारी मध्ये चर्चेचा विषय बनत आहेत त्यांच्या अंगावर ती त्यांनी संदेश लिहिलेला आहे की आपल्या मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावा चुकीच्या लोकांना मतदान करू नका समाजहिताचे काम करणारे लोकच निवडून द्या असा असा संदेश जनतेला देत आहेत गळ्यामध्ये लोखंडी गोल चक्र करून त्यावर विठ्ठल विठ्ठल असे लिहिले आहे त्यांचा पोशाख जणू काय वासुदेवा सारखाच आहे त्यांना वीरप्पणासारख्या भारदार मिशा आहेत त्यांच्या एका हातामध्ये भगवी पताका हातामध्ये लाल कपडा व शेट्टी आहे. सध्या संपूर्ण मीडिया गोहाटी मध्ये आहे वारीकडे कोणाचे लक्ष नाही. यातच हे लक्षवेधी अनोख्या पद्धतीचे आंदोलन करून अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. बापूराव गुंड हे पुणे येथील भोसरी या ठिकाणाचे रहिवासी असून ते स्वतः एम ए उच्चशिक्षित असून समाजशास्त्र त्यांचा विषय आहे गेली चार वर्षापासून ते उलट पायी वारी करत आहेत आणि उलट पाई वारी करत असताना ते जनतेला विविध प्रकारचे संदेश देत आहेत वारीसाठी सहा पदरी रस्ता व्हावा म्हणून त्यांनी आंदोलन केले होते. तसेच विविध  मागण्यांसाठी मुंबई, दिल्ली या ठिकाणी मुख्यमंत्री, पंतप्रधान  राष्ट्रपती,राज्यपाल राज्यपाल महोदयांना निवेदन दिले आहेत.

You may have missed