माऊलींच्या सेवेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्जसा

माऊलींच्या सेवेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्जसा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) –लाबादप्रमाणे दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. या सोहळ्यास महाराष्ट्रभरातून लाखो भावीक आळंदी ते पंढरपूर वारीसाठी येत असतात ही वारी पुणे,सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जात असते व सोलापूर जिल्ह्याच्या बॉण्ड्री वर मोठ्या जल्लोषात माऊलीच्या तसेच तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत मोठ्या जल्लोषात होत असते.

सदर दोन्ही पालखी साठी सोलापूर जिल्ह्यातील मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज असतो.याही वर्षी सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज दिनांक 4 जुलै पालखी साठी पालखी विसावा व मुक्कामा ठिकाणी पुढील प्रमाणे पोलीस बंदोबस्त असणार आहे 1 उपअधीक्षक,4 उपविभागीय अधिकारी,11 पोलीस निरीक्षक,34 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपपोलीस निरीक्षक,350 पोलीस कर्मचारी,50 महिला पोलीस कर्मचारी,48 ट्रॅफिक पोलीस कर्मचारी,162 स्पेशल कमांडो,350 पुरुष होमगार्ड कर्मचारी,50 महिला होमगार्ड कर्मचारी,400 पोलीस मित्र स्वयंसेवक तसेच दिनांक 5 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्तासाठी1 उपाधीक्षक,2 उपविभागीय अधिकारी, 6पोलीस निरीक्षक,26 सहाय्यक पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक,170 पोलीस कर्मचारी,26 महिला पोलीस कर्मचारी, 20ट्राफिक पोलीस कर्मचारी, 56 स्पेशल कमांडो, 150 होमगार्ड,50 महिला होमगार्ड,200 पोलीस मित्र स्वयंसेवक अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा माऊलींच्या सेवेसाठी तैनात राहणार आहे. उपविभागीय पोलीस विभाग अकलूज अंतर्गत संत तुकाराम महाराज पालखी साठी सराटी अकलूज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साठी धर्मपुरी नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीपासून पोलीस बंदोबस्त असणार आहे सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली असून.सदर बंदोबस्तात पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असतात.

You may have missed