पिरळेत हर घर तिरंगा साठी सहविचार सभा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)- जि प शाळा पिरळे येथे ग्राम पंचायत व शालेय शिक्षण समिती यांच्या वतीने हर घर तिरंगा या कार्यक्रमा संदर्भात सहविचार सभा संपन्न झाली.स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवा निमित्त शासनाच्या वतीने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या -तीन दिवशी हर घर तिरंगा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी म्हणून या सहविचार सभेच्या आयोजित करण्यात आले होते. या सभेमध्ये तिरंगा झेंड्याची आचारसंहिता व तिरंगा कशाप्रकारे आपल्या घरावरती लावायचा याविषयीचे ग्रामसेवक हनुमंत वगरे व शेंडगे मॅडम यांच्या वतीने ग्रामस्थ तसेच उपस्थितताना मार्गदर्शन करण्यात करण्यात आले. तसेच या तीन दिवशी जि प शाळा  तसेच गावातील संस्था यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.त्यामध्ये सर्वोदय प्रतिष्ठान तर्फे अमृत महोत्सवानिमित्त गावातील ज्या वयोवृत्तांनी आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण केले आहेत.

अशा वयोवृत्तांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने 75 व्या अमृत महोत्सविनिमित्त पंचक्रोशीतील शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पथनाट्य व विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या सहविचार सभेत उद्योजक संदीप नरोळे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले सर, पत्रकार प्रमोद शिंदे,मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर, संजय ढवळे सर, जब्बर मुलाणी सर,मुल्ला मॅडम,नामदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास अशोक तोडकर,शिक्षण समिती अध्यक्ष आनंद लवटे,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघ,शिवाजी लवटे, गणेश दडस, मा अध्यक्ष अजित खंडागळे,भाऊसाहेब भिसे,अमोल खरात सर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील,अमोल वाघ, सचिन खिलारे तसेच अंगणवाडी सेविका,मदतीस आशा सेविका, आरोग्य सविका तसेच गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगडे सर यांनी केले.

You may have missed