नातेपुतेनगरपंचायत मध्ये कॉलिटी ची कामे झाली पाहिजेत-बाबाराजे देशमुख



नातेपुते नगरपंचायत मध्ये कॉलिटी ची कामे झाली पाहिजेत-बाबाराजे देशमुख पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-ऐतिहासिक नातेपुते नगरपंचायत चा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी माजी जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख होते. उपस्थित यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की नगरपंचायत मध्ये क्वालिटीची कामे झाली पाहिजे .


पुढे बोलताना बाबाराजे म्हणाले की नगरपंचायत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच मुख्य अधिकारी यांनी कॉलिटी ची काम करून नातेपुते ला वैभव प्राप्त करून दिले पाहिजे.भविष्यात कोणाची अडचण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नातेपुतेचे राजकारण हे तात्पुरते असते बाकीच्या वेळी सर्वजण एकत्र येऊन गावाचा विकास आणि हितच पाहिले जाते.नातेपुते ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बी.वाय राऊत असताना नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते त्यांच्याकडून पहिला ठराव करण्यात आला होता.नंतर ग्रामपंचायत निवडणूक झाली व पहिल्या ठरावातच सर्व सदस्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन सदस्य पद गेलं हरकत नाही परंतु नगरपंचायत झाली पाहिजे यासाठी मागणी केली. यावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी मंजुरी देऊन नगरपंचायत शासन निर्णय निघाला.नातेपुते नगरपंचायत विकासासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते दोन्ही आमदारांनी भरपूर निधी दिला आहे.
आमदार खासदार यांनी अजून निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मुख्याधिकार माधव खांडेकर आभार प्रदर्शनात म्हणाले की सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्व पदाधिकारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमत्त लोकहिताचे धोरणात्मक निर्णय घेतले आहे.त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून भौतिक, गुणात्मक सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच हर घर तिरंगा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच पत्रकार व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी माजी सरपंच नगरसेवक बी वाय राऊत,अहिल्या संस्थेचे चेअरमन रघुनाथ कविते,आप्पासाहेब भांड कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे पं.स.सदस्य माऊली पाटील ,शिवाजीराव पिसाळ,नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजी देशमुख,मुख्य अधिकारी माधव खांडेकर, सर्व नगरसेवक ग्रामस्थ तसेच शिक्षक वर्ग व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.

You may have missed