यशदा संस्थेच्या वतीने धानोरे निखिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्यांचे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- 31 जुलै रोजी युथ ॲक्शन फॉर सोशल अवेयरनेस अँड डेव्हलपमेंट अक्टिविटी (यसदा) संस्थेतर्फे जनता विद्यालय धानोरा ता. आष्टी जी. बीड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरविंद रामटेके (आयकर अधिकारी मुंबई) मा.दिलीप भोळे (अधिक्षक अभियंता विद्युत परिमंडळ तीन कल्याण) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस राज्य महासचिव मा. डॉ.केवल उके, लॉ लॅपविंग ग्रुपचे चेअरमन विनोद जाधव, माजी आयकर अधिकारी मा. के.पी. सोमकुवर, मा.सुरेश कांबळे (आयकर अधिकारी), मा.रुपेश बेसेकर (आयकर अधिकारी) इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये जनता विद्यालय धानोरा येथील दहावी आणि बारावी मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांचा यसदा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसतिगृहातील जवळपास १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

याकरिता सदर कार्यक्रमाचे मुख्य शिल्पकार, यसदा संस्थेचे सचिव मा.शशिकांत खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळवून देण्या करीता मागील सहा महिन्यापासून प्रयत्न केले होते. मागील जवळपास १५ वर्षापासून हा उपक्रम अविरतपणे राबवित आहेत. त्याकरिता अनेक दात्यांना भेटून त्यांच्या कडे या ऊसतोड कामगार, मजूर व शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडचणी मांडून साहित्य व निधी गोळा करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य दरवषी पोहचवितात. यावेळी त्यांच्या या निस्वार्थसेवेचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात मा.अरविंद रामटेके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे शिक्षण घेईल तो गुगुरल्या शिवाय राहणार नाही” असा मोलाचं संदेश दिला. आपल्या उद्घटकीय भाषणात मा.दिलीप भोळे यांनी म्हटले की, “कष्टकरी गरीब विद्यार्थांनी संघर्ष करून देशाला वैज्ञानिक आयाम दिला व आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरले याची अनेक उदाहरणे देशाच्या इतिहासात पाहायला मिळतात, त्यामुळे स्वतला कधीही कमी लेखू नका”

तसेच मार्गदर्शन करताना डॉ.केवल उके यांनी “विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आहेत, त्यांनी जिद्द, चिकाटी आणि धैर्याने यशाची अनेक शिखरे गाठावी परंतु कधीही प्रमानिक्तेचा विसर पडू नये” असा मोलाचा संदेश दिला. मा.विनोद जाधव यांनी आपली जीवन कथन केले व बबन राठोड यांनी सुद्धा आपले जीवनातील प्रत्येक क्षण विध्यर्थी जीवनात कसे मोलाचे आहे हे सांगितले. तसेच जनता विद्यालय धानोरा या शाळेचे मुखयाध्यापक मा यू.आर.गव्हाणे यांनी “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम दरवर्षी शाळेत साजरा होणार याची गाव्ही दिली”.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा.बंदिश सोनवणे, मा.शरद शेळके, शाळेचे ट्रस्टी मा.विजयकुमार बांदल, मा.सय्यद अब्दुलभाई गफुरभाई, शाळेचे मुख्याध्यापक मा.यू.आर.गव्हाणे तसेच शिक्षकवृंद मा. एस.एम.ढोबळे, मा.एस.एम.चव्हाण, वसतिगृह अधीक्षक मा.रवी शिंगटे, मा.पोपट खंडागळे मा.मच्छिंद्र पवार कारखेलकर, मा.विशाल बांदल, मा.पोकळे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि आजी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

उपस्थित माजी विद्यार्थी मा.बबन राठोड आणि मा.सत्यवान पाखरे यांनीसुद्धा शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे अनुभव शेयर केले. पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनलचे पत्रकार आयु.संदेश तुकाराम भालेराव यांनी कार्यक्रमाचे फेसबुक आणि युट्यूब या सामाजिक माध्यमांवर थेट प्रक्षेपण केले. कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने करण्यात आला.

You may have missed