नातेपुते नगरपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची जोरदार सुरुवात


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

नातेपुते नगरपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे जोरदार सुरुवात करण्यात आली अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त नातेपुते येथील दाते प्रशाला, अक्षय प्रशाला, रत्नप्रभा देवी मोहिते पाटील प्रशाला, शंकरराव मोहिते पाटील कॉलेज, समता,चंद्रप्रभू , एस एन डी इंग्लिश मीडियम,अशा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी नातेपुते शहरातून प्रभात फेरीचे आयोजन केले होते सकाळी 10:30 वाजता सर्व शाळांमधील एकूण 4500 विद्यार्थी पालखी मैदान या ठिकाणी एकत्र आले व इंडिया असं लिहीत 75 असा आकडा तयार करून देश प्रेम जागृत केला याचे ड्रोन च्या साह्याने चित्रीकरण करण्यात आले.

तसेच अक्षय शिक्षण संस्थेच्या लहान विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा संदर्भात पथनाट्य सादर केले.सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. नगरपंचायत च्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. नातेपुते शहरातील सर्व शाळांमधीला सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम च्या जय घोषात पालखी मैदान या ठिकाणी येऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नातेपुते नगरपंचायत व सर्व शाळातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपाध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खंडेकर,मामासाहेब पांढरे,बांधकाम सभापती अतुल पाटील, महिला बालकल्याण सभापती संगीता काळे, पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती स्वाती बावकर ,भारती पांढरे ,शर्मिला चांगण, सविता बरडकर ,माया उराडे,सुरेंद्र सोरटे,भानुदास राऊत,अविनाश दोशी,रावसाहेब पांढरे, नंदू लांडगे, बाळासाहेब काळे, रणवीर देशमुख, अतुल बावकर, शक्ती पलंगे, उमेश पलंगे , भानुदास राऊत, माऊली उराडे, शशिकांत बरडकर, तसेच नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होते.

You may have missed