मावळते ला गेलेला सूर्य सुंदर ही दिसतो व प्रकाश सुद्धा देतो- प्रा प्रशांत सरुडकर सर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-मावळतीला गेलेला सूर्य सुंदर ही दिसतो व प्रकाश ही देतो असे प्रतिपादन प्रशांत सरुडकर कर सर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिरळे येथे सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने 75 वय वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे ते प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.  पुढे बोलताना ते म्हणाले की उतार वय झालेल्या ज्येष्ठांचा सन्मान आपण केला पाहिजे. आजी आजोबा हे परमेश्वराचे रूप आहे तरुणांना लाजवेल असं काम जेष्ठ करत असतात ज्येष्ठ हे संस्काराचे विद्यापीठ संस्करी कुलगुरू आहेत ज्या देशात ज्या गावात ज्येष्ठांचा सन्मान होतो तो देश प्रगतीपथावर जातो शिवाजी महाराजांनी आईचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि देशाला स्वराज्य दिले एवढे सामर्थ्य आईच्या आशीर्वादामध्ये आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर बोलताना म्हणाली की पिरळे गाव हे आदर्श व दिशादर्शक आहे. त्याची नोंद महाराष्ट्र घेईल तसेच प्रमुख अतिथी ऍड शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे,ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर, प्रमोद शिंदे,अजित खंडागळे यांनी ज्येष्ठांना मनोगतपर शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक संदीपशेठ नरोळे, संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कदम व संस्थेतील सदस्य यांनी केले होते.प्रमुख अतिथींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर ज्येष्ठांना 75 पूर्ण झाल्याबद्दल विशेष सन्मानपत्र, फेटा,शाल,हार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सर्वोदय प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष जब्बर शिंदे, सचिव सूर्यकांत नरूळे ,सरपंच अलकाताई नरोळे, औदुंबर बुधावले पोलीस पाटील. तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील,सोसायटी चेअरमन सुभाष लवटे , समावि अध्यक्ष शिवाजीराव लवटे. उपसरपंच उमेश खिलारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस, प्रमोद डूडू , दत्तात्रेय लवटे, दादासो किर्दक मेजर, रामचंद्र किर्दक, पोपट माने, धनंजय कदम, धन्यकुमार माने, नारायण वाघमोडे, प्राचार्य दीपक शिंदे, मुख्याध्यापक. संजय नरोळे ,महादेव शिंदे, विठ्ठल सूर्यवंशी, अजित खंडागळे ,कैलास निकम, मुख्याध्यापक शंकर शिंगाडे , ढवळे सर,  सुनील माने, प्रल्हाद साळवे गुरुजी, प्रल्हाद नरोळे, विजय कदम, दशरथ पवार, विठ्ठल कदम, ज्ञानदेव शिंदे साहेब ,संदीप पवार, भारत पवार ,रामचंद्र राहुडकर, सोमनाथ नरोळे ,विठ्ठल किर्दक, बाळासाहेब वाघमोडे, कोंडीराम नरोळे, अंकुश वाघमोडे ,बंडू कारंजकर ,पप्पू वाघ ,सचिन सूर्यवंशी, आबासाहेब शिंदे, सर्व ज्येष्ठ सत्कारमूर्ती ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी औदुंबर बुधावले दीपक शिंदे यांनी तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

You may have missed