उमरखेड शहरामध्ये अवैध जुगारू मटका सुरु प्रशासन मुग गिलुन गप्प


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
उमरखेड (दि. 23 ऑक्टोंबर) उमरखेड तालुक्यात व शहरामध्ये जुगार व मटका खुलेआम सुरू झाला आहे मागील दोन महिन्यामध्ये सामाजिक संघटनेच्या वतीने अवैध धंदे बंद करा..! अशा प्रकारचे निवेदन देऊन अमरण उपोषणाला श्याम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष उमरखेड हे बसले होते.

अमरण उपोषण मंडपामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने पीएसआय अमोल राठोड साहेब यांनी भेट देऊन व उमरखेड शहरांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे जुगार व मटका त्वरित बंद करण्यात येईल या प्रकारचे लेखी आश्वासन देऊन मटका व जुगार बंद केला होता.

परंतु येत्या दिवाळीच्या सणांमध्ये खुलेआम मटका व जुगाराला सुरुवात झाली आहे. यावर प्रशासन गप्प बसले आहे.
खुल्या मटका व जुगारामुळे अनेक संसारामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये वाद निर्माण होत आहे. नवतरुण या जुगार व मटक्या पाई त्यांचे जिवन उद्धवस्त होत आहे.त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्याऐवजी संसाराचा दिवाळाच साजरा
करावा लागत आहे.

पण यावर पोलिस प्रशासनाने सुरू केलेला खुलेआम मटका व जुगार त्वरित बंद करण्यात यावा.

अशी मागणी यावेळीं भिम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर व जिल्हा कार्याध्यक्ष श्याम धुळे यांनी केली आहे. अन्यथा संस्थापक मा.दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) यांच्या नेतत्वात”तीव्र आंदोलन” छेडल्याशिवाय शांत बसणार नाही.

You may have missed