एसटी ड्रायव्हरच्या हुशारीने प्रवाशाचे प्राण वाचलेशिंगणापूर घाटात एसटी ब्रेक फेल झाल्याने दरीत जाता जाता वाचली

एसटी ड्रायव्हरच्या हुशारीने प्रवाशाचे प्राण वाचलेशिंगणापूर घाटात एसटी ब्रेक फेल झाल्याने दरीत जाता जाता वाचली

नातेपुते प्रतिनिधी:-नातेपुते येथील शिंगणापूर जवळील भवानी घाटात नातेपुते दहिवडी एसटी घेऊन जात असताना अचानक शिंगणापूर घाटाकडे जाणाऱ्या शेवटच्या वळणावर एसटी चे ब्रेक फेल झाल्याने गाडी दरी त जाते असे दिसत असताना एसटी ड्रायव्हर उमाजी खरात यांच्या चालाखीने वेळ प्रसंग बघून गाडीला रिव्हर्स मारून गाडी  पाठीमागे हळूहळू घेऊन पाठीमागे धडकवली त्यामुळे   दरीत जाणारी गाडी वाचून किरकोळ अपघात होऊन नऊ जण जखमी झाले आहेतयाबाबत सविस्तर माहिती अशी की नातेपुते येथून दहिवडीकडे जाणारीगाडी नंबर एम एच 0 7 सी 91 79 ही गाडी नातेपुते शिंगणापूर कडे निघाले असता घाटाच्या शेवटच्या वळणावर अचानकपणे गाडीचे ब्रेक फेल झाल्याने गाडी घाटातील दरी च्या दिशेने जाऊ लागल्याचे पाहून एसटी ड्रायव्हर उमाजी खरात यांनी हुशारीने गाडीचा रिव्हर्स मारून गाडी पाठीमागे नेऊन डोंगरावर आदळी त्यामुळे गाडीचे नुकसान झाले व प्रवाशांना नऊ प्रवासी हे जखमी झाले परंतु जर गाडी दरीत कोसळली असती तर फार मोठा अपघात झाला असता या गाडीमध्ये प्रवासी मोहन आबा तुपे राहणार शिंगणापूर, भगवान अण्णा तुपे शिंगणापूर, सुभाष कृष्णाजी चितळीकर राहणार चीतळी, सुमन विठ्ठल राऊत नातेपुते, ज्योती प्रकाश बनसोडे राहणार सदाशिवनगर, सिंधू मोहन तुपे राहणार शिंगणापूर, प्रेरणा अण्णा कुंभार राहणार फोंडशिरस ,प्रतिक्षा अजय तुपे राहणार शिंगणापूर संजीवनी राजू राजाळे राहणार विटा हे प्रवासी जखमी झालेले आहेतयाबाबत प्रवासी संजीवनी राजगिरे म्हणाल्या की एसटी ड्रायव्हर यांनी ज्या हुशारीने सर्व प्रवाशाचे प्राण वाचवले त्याबद्दल खरं त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण गाडी ब्रेक फेल झाल्यानंतर जरीच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर सगळ्याचा काळजाचा ठोका चुकला होता परंतु ड्रायव्हर उमाजी खरात हुशारीने गाडीला रिव्हर्स घेऊन पाठीमागे डोंगरावर गाडी थोडीशी आदळी व सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले असे सांगितले

You may have missed