श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने आरोग्याच्या दृष्टी कोणातून चांगले काम केले आहे-डॉ श्रेणिक शहा

नातेपुते प्रमोद शिंदे-
श्री 1008 महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने सलग 23 व्या वर्षी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी डॉ.श्रेणिक शहा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
बोलताना ते म्हणाले की संस्थेने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले काम केले आहे.तेवीस वर्षात अनेक रुग्णांवर उपचार संस्थेने केले आहेत.तसेच या शिबिरामुळे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना फायदा होत आहे.भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळेल सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित त्यांना केले.तसेच ट्रस्टी नरेंद्र गांधी बोलताना म्हणाले थोड्याच दिवसात ट्रस्टच्या वतीने ब्रह्म महती सागर आयुर्वेदिक चिकित्सालय मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहे.तसेच दहिगाव येथील भारतातील सर्वात सुंदर मेरू तयार झाला आहे.सी आर दोशी सरांचे स्वप्न होते की मोठी आरोग्य सेवा ट्रस्टच्या माध्यमातून उभी करायची आहे.ही संकल्पना आपण पूर्ण करणार आहोत.रथ उत्सव हा दहिगाव चा मानबिंदू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. कार्यक्रम उद्घाटनास श्री108 शुभंकीर्ती महाराज यांचे सानिध्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे दातार व उद्घाटक हिंगणगावकर दोशी परिवार हे होते. शिबिरात रुग्ण तपासणीसाठी डॉ.श्रेणिक शहा इंदापूर,डॉ.समीर दोशी अकलूज,डॉ.भूषण चंकेश्वरा, डॉ.महावीर गांधी, डॉ उत्कर्ष गांधी,डॉ निखिल फडे,डॉ अजिंक्य होरा, डॉ.सीमा गांधी यांनी 650 रुग्णांना मोफत सेवा दिली.मेडिकल असोसिएशनच्या वतीने दीड लाख रुपयांची औषधं मोफत देण्यात आली.या कार्यक्रमास आजी माजी सरपंच,उपसरपंच सोसायटी चेअरमन पदाधिकारी सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टी,श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

You may have missed