दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क नातेपुते प्रमोद शिंदे

 संपूर्ण महाराष्ट्रातील जैन बांधवांचा मानबिंदू असलेला दहिगाव येथील रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन रथोत्सव साजरा करण्यात आला. रथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाच मजली लाकडी धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर यांची मूर्ती ठेवून भव्य दिव्य अशी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली काढण्यात आली.या धर्म रथाला हार तुरे पताका लावून रथाचे सुशोभीकरण करण्यात आले होते.गाव प्रदक्षिणा करून तो रथ पंडितांच्या माळावर परंपरेनुसार नेण्यात आला. व श्री 108 शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात संस्थेचे माजी अध्यक्ष सी.आर.दोशी यांना मरणोत्तर समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.व याच ठिकाणी पुढच्या वर्षीच्या रथोत्सव कार्यक्रमाच्या विविध चढावांच्या संगीतमय बोली घेण्यातआल्या.या कार्यक्रमास माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा हजेरी लावली व श्री महावीर दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिरास 25 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. जैन बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपंगे व अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधव श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.