पिरळे-फोंडशिरस रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचं नागरिकांची तक्रार

पिरळे-फोंडशिरस रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचं नागरिकांची तक्रार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपिरळे-फोंडशिरस रस्त्याचं काम सध्या सुरूआहे.जवळपास तीन कोटी रुपये रस्त्याचं  काम असून सुरुवातीलाच निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं स्थानिक नागरिकांमधून तक्रार होत आहे.या अगोदर सुद्धा पिरळे-नातेपुते फडतरी आठ किलोमीटर रस्ता सुधारणा कामासाठी एक कोटी ५० लाख रुपये चा रस्ता असून तो देखील निकृष्ट दर्जाचा झाल्याचा नागरिकांमधून बोललं जात आहेत या  संदर्भात पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटीलयांना देखील गाव भेटी दरम्यान रस्त्या संदर्भात लोकांनी तक्रार केली होती.सध्या माळशिरस तालुक्याला दोन आमदार असल्यामुळे माळशिरस तालुक्यात रस्त्यांसाठी  आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व आमदार रामभाऊ सातपुतेयांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.परंतु या निधीचा व्यवस्थित वापर होत नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे.सदर रस्त्यांच्या कामासाठी इस्टिमेट प्रमाणे काम होत नाही व रस्त्यामध्ये डांबर कमी प्रमाणात वापरलं जात आहे.अशाही तक्रारी लोकांकडून होत आहेत बऱ्याच वर्षापासून पश्चिम भागातील रस्ते प्रलंबित आहेत व त्या रस्त्यांची दुरावस्था झाली होती.सदर रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यास एन डी एम जेसंघटनेच्या वतीनेतीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.कामा संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका सुद्धा होत असल्याच दिसून येते.

You may have missed