नितीन आगे चे वडील राजू आगे यांचा संघर्ष महाराष्ट्रातील इतर पीडितांना सदैव प्रेरणा देत राहील…वैभव गिते

मुंबई मंत्रालय येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या केबिनला सम्राट पेपरच्या आलेली बातमी लावून प्रशासनाचा निषेध करताना पीडित राजू आगे व सोबत एन डी एम जे राज्यसचिव वैभव गीते
आय एआय ए एस नोडल ऑफिसर हर्षदीप कांबळे साहेब यांची मंत्रालय येथे भेट घेताना पीडित राजू आगे श्रावण उदागे व राज्यसचिव वैभवव गीते

राजू आगे यांनी मृत्यू स्वीकारला पण आरोपींच्या दबावाला व अमिषाला बळी पडले नाहीत…..अमोल सोनवणे (विशेष सरकारी वकील)

नातेपुते प्रतिनिधी (प्रमोद शिंदे)-
दिनांक पाच जून 2023 रोजी खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणातील फिर्यादी नितीनचे वडील राजूू आगे यांचं अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यासाठी एन डी एम जेराज्यसचिव वैभव गीते व विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे व कार्यकर्ते खर्डा येथे उपस्थित होते.
त्याप्रसंगी बोलताना वैभव गीते म्हणाले की राजू आगे साहेबांचा संघर्ष महाराष्ट्रातील इतर पीडीतांना सदैव प्रेरणारणा देत राहील. पुढे ते म्हणाले की
खर्डा ता.जामखेड जि.अहमनगर येथे 2014 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून शाळकरी विद्यार्थी नितीन आगे यास हाल हाल करून ठार मारून गळफास घेतल्याचा बनाव करण्यात आला. परंतु नितीन चा निरखून खून झालेली वृत्तपत्रांच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यावेळेस अनेक संघटनांनी व नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या व प्रशासनावरती दबाव येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपींना अटक करण्यात आली. त्यावेळी राजू आगे यांना अनेक आंबेडकरी नेत्यांनी मदत केली. त्यानंतर त्यांच्याकडे कोणी पाहिलं नाही परंतु एन डी एम जे चे राज्यसचिव वैभव गीते यांनी


ऍड.डॉ. केवल उके यांच्या आदेशाने व मार्गर्शनाखाली खर्डा गावात त्याच म्हणजे दिवशी भेट दिली.गुन्हा दाखल झाला.
जामखेड पोलिस स्टेशन,कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमनगर पोलिस अधीक्षक,जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा केली चार वेगवेगळ्या संघटनांनी स्वतःच्या लेटर हेडवर विशेष सरकारी वकील मिळण्यासाठी निवेदने दिली.आणि प्रत्येकाने स्वतःचा एक वेगळा वकील विशेष सरकारी वकील म्हणून मिळावा यासाठी निवेदने दिली.सरकारच्या समोर पेच पडला की कोणता अर्ज मंजूर करायचा यामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती रखडली.यास राजू आगे जबाबदार नसून भेटी देऊन भाषणे करून जाणारे अध्यक्ष त्यांच्या संघटना व पक्षांचे स्वयंघोषित नेतेच कारणीभुत होते
राजू आगे यांना समाजकल्याण विभागाची आर्थिक मदत मिळण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे न्हवती.ती कागदपत्रे काढण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे न्हवते. वैभव गीते यांनी त्यांना घेऊन रेशनकार्ड, जातीचा दाखला काढण्यासाठी मदत केली आणि कागदपत्रे काढली.त्यांना मदत मिळवून दिली.काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या परीने आर्थिक मदत केली.राजू आगे यांना आंबेडकर प्रतिष्ठान दिल्ली येथील अनुदान मिळण्यासाठी दिल्लीला घेऊन जाऊन मदत मिळवून दिली जोपर्यंत राजू आगे यांच्याकडे पैसे होते तोपर्यंत नातेवाईकांनी व अहमनगर मधील काही स्थानिक नेत्यांनी आगे यांना अक्षर शः लुटले.
आगे यांची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने माझ्या कुटुंबाचे पुनर्वसन करा माझ्या मुलीला नोकरी लावा अशी विनंती आगे यांनी माझ्याकडे केली.परंतु अट्रोसिटी ॲक्ट मध्ये कमवता व्यक्तीची हत्या झाली तरच पुनर्वसन करण्याची तरतूद असल्याने पुनर्वसन करण्यात अडचणी येत होत्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अनेकवेळा आगे यांचे पुनर्वसन करता येणार नाही म्हणून फाईल रिजेक्ट केली होती. पाठपुराव्यासाठी येण्या जाण्यासाठी सुद्धा आगे यांच्याकडे पैसे नसायचे आम्ही त्यांना येण्याजण्यासाठी थोडीफार मदत करायचो पुढे जाऊन आयुक्त समाजकल्याण पुणे या कार्यालयाच्या पुढील आंदोलने,राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग,राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्ली,मंत्रालयात मंत्री,सचिवांच्या भेटी घेणे नित्याचे झाले.adv.केवलजी उके साहेबांचे मार्गदर्शन मिळायचे कायद्यातील बारकावे उके साहेब समजावून सांगायचे त्यामुळे अधिक सुलभता येत गेली.यादरम्यान अनेक वेळा पाठपुरावा करताना राजू आगे व माझा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन गिरगाव चौपाटीवर मुक्काम झाला.राजू आगे घरून येताना चटणी व ज्वारीची भाकरी बांधून आणायचे आम्ही दोघेजण एकत्र बसून जेवायचो त्यांनी घरून आणलेली चटणी व भाकरीतील चव अन्य कोणत्याही जेवणास येणार नाही.


पुनर्वसनाचे काम जर मुख्यमंत्र्यांनी स्पेशल केस म्हनून सही केली तरच काम होईल अन्यथा होणार नाही हे समजताच सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला रामदास आठवले यांनी व त्याचे स्विय सहाय्यक यांनीही खूप मदत केली. अधिवेशनात मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वेळ मिळावा म्हणून रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्याकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजकुमार बडोले यांनी त्यांच्या दालनात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली यामध्ये नितीन आगे,सागर शेजवळ,माणिक उदागे या तीन गुन्ह्यांवर चर्चा होती.पीडित कुटुंबाच्या बाजूने ॲड.डॉ. केवल उके,वैभव गिते,पी.एस.खंदारे हे तर अधिकारी म्हणून आयुक्त समाजकल्याण पुणे मिलिंद शंभरकर,प्रधान सचिव दिनेश वाघमारे,अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थुल हे उपस्थित होते.आमचा युक्तिवाद कायदेशीर व परीणामकारक ठरला कायद्यातील बारकावे दाखवत आम्ही अधिकाऱ्यांवर भारी पडलो.आणि तीनही कुटुंबांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आदेश मंत्रालयातून स्पेशल फाईल द्वारे निघाले.एकावेळी तीन कुटुंब उभा करू शकलो याचा आनंद झाला.पुढे राजू आगे यांना जामखेड मधील शहरातील जागा घरकुल बांधण्यासाठी मिळवली घरकुल मंजूर करून त्यामध्ये घर बांधले.राजू आगे यांची मुलगी मुलींचे वसतिगृह येथे शासकीय नोकरीवर जाऊ लागली आणि राजू आगे यांची उपासमार थांबली.
पुढे केसमध्ये आरोपी यांनी जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु आम्ही त्यांना जामीन मिळू दिला नाही.राजू आगे यांना मदत करण्यासाठी ॲड.विलास लोखंडे अंबाजोगाई हे टूव्हीलर वर अहमनगर कोर्टात यायचे.दरम्यान माझ्यावर खोटी केस दखल करून मला जेलमध्ये टाकून माझा एनकाऊन्टर करण्याचा प्रयत्न झाला
मला जेलमध्ये टाकताच नितीन आगे यांचा खटला सुरू झाला आणि मी जेलमधून जामिनावर बाहेर येईपर्यंत हा खटला निर्दोष झाला होता.महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने राजू आगे यांना या दरम्यान मदत केली नाही.साक्षीदार फितूर झाले.आणि खटला निर्दोष झाला
आम्ही आंदोलन सुरू केले महाराष्ट्रातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या चैत्यभूमी दादर येथे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना भेटून निवेदन दिले.बडोले यांनी या खटल्यात अपिलात जाण्याचे आदेश दिले.मंत्रालयात बैठक झाली या बैठकीस मी उपस्थित होतो राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांना पुन्हा नितीन आगेंच्या घरी जाऊन माहिती घेण्याचे आदेश दील्याने आयोग खर्डा येथे आला त्याचवेळी ॲड.नितीन सातपुते यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली नंतर महाराष्ट्र सरकार च्या वतीने मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अपील दखल करण्यात आले.फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर कोर्टात दाखल झाला.राजू आगे यांना धमक्या येऊ लागल्याने पोलीस संरक्षणाची गरज भासू लागली.आम्ही सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना रात्रीच्या 1 वाजता सोलापूरच्या शासकीय विश्रागृहावर भेटलो.तेथून पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना फोन झाले व राजू आगे यांना पोलिस संरक्षण मिळाले.नवीन सरकार येताच राजू आगे यांचे पोलिस संरक्षण काढण्यात आले आम्ही पुन्हा मंत्रालयीन पाठपुरावा करून पोलिस संरक्षण मिळवले.याचवेळी उच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी साठी आम्ही गेल्यावर कळले की या खटल्यात शासनाने नेमलेले विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी अचानक या खटल्यातून माघार घेतली.आत्ता नवीन बाका प्रसंग उभा राहिला नवीन विशेष सरकारी वकील नियुक्ती करणे त्याचवेळी फितूर साक्षीदारांवर कारवाईचा खटला अहमनगर कोर्टात सुरू होता.आणि दोन्ही केसमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली न्हवती अशा कठीण प्रसंगात राजू आगे यांना विविध आजारांनी घेतले.अनेकवेळा मला फोन करून बोलायचे मी त्यांना उपचारासाठी माळशिरस तालुक्यात बोलावले होते नंतर जास्त आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. आम्ही नांदेड येथे अक्षय भालेराव खून प्रकरणात भेट देण्यासाठी गेलो असता तिथे राजू आगे हे जग सोडून गेल्याची बातमी समजली आणि आम्ही खर्डा या गावी निघालो
स्मशानभूमीत जाऊन राजू आगे यांना सेल्यिट केला.श्रद्धांजली दिली.

राजू आगे यांच्या कार्याला सॅल्यूट करताना वैभव गिते विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे अनिकेत मोहिते आजिनाथ राऊत प्रमोद भोसले गोरख साळवे नवनाथ भागवत यांच्यासह पदाधिकारी
माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले याची पहाटे भेट घेऊन राजू आगे यांना पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली
माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून राजू आगे श्रावण उदागे व आकाश शेजवळ यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात वैभव गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
पिढीतांचे पुनर्वसन व्हावे म्हणून विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालया पुढे वैभव गीते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर राजू आगे यांची मुलगी दुर्गा आगे सागर शेजवळ चा भाऊ आकाश शेजवळ माणिक उदागे चा भाऊ श्रावण उदागे त्यांना नोकरी मिळाली वतुकाराम दानाने यांना चार एकर जमीन मिळाली या आंदोलनात संघटक अंपल खरात पंचशीला ताई कुंभारकर संजय झेंडे दलित टिपके पुणे सोलापूर सातारा येथील कार्मयकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या सर्व लढाईत राजू आगे गरीब असताना सुद्धा आरोपींच्या आर्थिक अमिषाला बळी पडले नाहीत.मुलाच्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी राजू आगे यांनी शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत लढत राहिले,लढत राहिले,लढत राहिले या पाठपुराव्यात मला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व त्यांचे स्विय सहाय्यक प्रवीण मोरे यांचे विशेष सहकार्य मिळाले राजू आगे हे खरे संघर्ष योद्धा आहेत.नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली.अशाप्रकारे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंत्रालयात पुनर्वसना संदर्भात पीडित राजू आगे सागर शेजवळ चा भाऊ आकाश शेजवळ माणिक उदागे चा भाऊ श्रावण उदागे व या पिढीताना सोबतसोबत घेऊन एनडीएनजे राज्यसचिव वैभव गीते
खर्डा येथे राजू आगे यांच्या कुटुंबाची भेट घेताना राज्य सचिव वैभव गीते राज्य संघटक अंपलजी खरात प्रमोद शिंदे व एन डी एम जे टीम
अनुसूचित जाती आयोग सदस्य सी एल थूल यांची भेट घेताना
डॉक्टर केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य माझी न्यायाधीश सी एल लथूल नोडल ऑफिसर दिनेश वाघमारे
यांची भेट घेऊन पुनर्वसना संदर्भात चर्चा करताना शिष्टमंडळ

You may have missed