*नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र* *केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची वैभव गिते यांनी भेट घेऊन निवेदन दिले* *नितीन आगे खून खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात मा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी* अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या यशस्वी आंदोलनांमुळे शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या खटल्यात सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती अद्याप झालेली नाही शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाने नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच अचानक शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवले आहे.वकिलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर प्रश्नचिन्ह आहे. मा.उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव तानाजी गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रालय शास्त्रीभवन दिल्ली येथे जाऊन भेट घेऊन नितीन आगे खून प्रकरणात मंत्रालयीन अधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यासाठी निवेदन दिले यावर मा.मंत्री रामदासजी आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना गृह विभाग,विधी व न्याय विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यासाठी पत्र लिहले आहे यावेळी रिपाई (आठवले) राज्य सचिव हरेष भाई देखणे व एन.डी. एम.जे चे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे हे उपस्थित होते.

You may have missed