मनोज जरांगें पाटील यांची प्रकृती बिघडली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीबिघडली आहे. त्यांच्यावर अंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे राहत्या घरीच जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. जरांगे पाटील यांना घरीच सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणा- या डॉक्टरांनी सांगितले की, जरांगे पाटील यांना रात्रीपासून ताप येत होता. त्यांना तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घशाचे इन्फेक्शन आणि कफ झाला आहे. ही सर्व व्हायरलची लक्षणे आहेत. त्यामुळे आज सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.