९,७०,२५,११९ महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या; निवडणूक आयोगाची माहिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज

नेटवर्कविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने अद्ययावत मतदार यादी जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात ९ कोटी ७० लाखांपेक्षाही जास्त नोंदणीकृत मतदार आहेत.निवडणक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. याशिवाय ६ हजार १०१ तृतीयपंथी म तदार आहेत. महाराष्ट्रात १८ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण२२ लाख २२ हजार ४०७ मतदार आहेत. याचा अर्थ जवळपास २२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आ- हेत. आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मतदार ३०ते ३९ वर्ष वयोगटातील आ हेत. त्यांची संख्या २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ इतकी आहे. याशिवाय ८५ ते १५० वर्ष वयोगटातील १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. यापैकी १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११० मतदार आहेत. ज्यात ५६ पुरुष, तर ५४ महिला आहेत.निवडणूक आयोगाकडून विशेष उपक्रमप्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोग विशेष उपक्रम राबवले जात आहेत. तसेच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध उपक्रम घेतले जात आहे. दिव्यांग म तदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर वयोवृद्ध नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान केलं जाणार आहे.