डिपॉझिट वाचवायला एक षष्ठांश मते आवश्यकच

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
विधानसभा निवडणुकीच्या सोलापूर जिल्ह्यातील
११ मतदारसंघाच्या मैदानात सद्यःस्थितीत तब्बल ३३३ उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सोमवारचाच दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी यातील कितीजण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण, प्रत्येक उमेदवाराला त्या मतदारसंघातील एकूण वैध म तांच्या एक षष्ठांश (उदा. एकूण मतदानातील एक लाख ८० हजार मते वैध असल्यास त्यापैकी ३० हजार मते पडायलाच हवीत) मते घ्यावीच लागतील, अन्यथा त्यांना डिपॉझिट परत मिळणार नाही.
जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीमध्ये तृतीयपंथी मतदार ३१० आहेत. त्यात माढा मतदारसंघात अवघे तीन तर सांगोल्यात पाच तृतीयपंधी
आहेत. २०१९च्या निवडणुकीत ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते, यंदा त्यात वाढ होईल, असा विश्वास विल्हा प्रशासनाला आहे. या निवडणुकीत अपक्षांची
कितीजण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष, तृतीयपंथी ३१० मतदार मतदानाचा हक बजावता आला
संख्या जास्त राहिल्यास ज्या उमेदवाराला ७० हजारांपर्यंत मते मिळतील तो विजयी होऊ शकतो.
पण मतदान किती केलेले वाचन आणि निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार, यावर ते समीकरण अवलंबून असणार आहे. २०१९च्या निवडणुकीसाठी एकूण ३३ लाख ९१ लाख ८१४ इतके मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीत ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत
चार लाख ५७ हजार ५५ मतदार वाढले आहेत. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सवांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांकडे मतदान कार्ड असताना देखील मतदार यादीत नावे नसल्याने त्यांना
नव्हता. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक उमेदवारांनी स्वतःहून विभागनिहाय मतदार यादी तयार करून आपल्या विश्वासातील कार्यकत्यांकडे दिली आहे. आपल्याला खात्रीने पडणाऱ्यांची नावे त्यात आहेत की नाही, याची शहानिशा केली जात आहे. याशिवाय आपल्याला मागच्या निवडणुकीत कोणत्या ठिकाणी कमी मतदान झाले होते असे भाग काढून त्याठिकाणी पोचण्याचे नियोजनही उमेदवारांनी केले आहे.
जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदार मतदारसंघ पुरुष महिला एकूण
करमाळा १,७१,५१५१,५७,४६८ ३,२८,९९४ माडा १,८३,९४८ १,६८,७४० ३,५२,६९१ बार्शी १,७३,४५३ १,६४,००२ ३,३७,४९९ मोहोळ १,७३,१२१ १९,५८,३२९ ३,३१,४५८ शहर उत्तर १,६२,४६७१,६६,०५९३,२८,५७२ शहर मध्य १,७०,५०९१,७६,११५ ३,४६,६७७ अक्कलकोट १,९६,५७७ १,८६,९६४३,८३,४७९ दक्षिण सोलापूर १,९५,७५१ १,८६,९६४ ३,८२,७५४ पंढरपूर-मंगळवेढा १,९१,४६४ १,८२,१९४ ३,७३,६८४ सांगोला १,७२,७०४ १,६०,७८४ ३,३३,४९३ माळशिरस १,८०,३२२ १,६९,२१४ ३,४९,५६८ एकूण १९,७१,८३१ १८,७६,७२८ ३८,४८,८६९