शरद पवारांचे दाऊद इब्राहिमबरोबर संबंध प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचेअध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी ते सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेतून मोठा आरोप केला आहे.ते म्हणाले, ‘शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत.’ व्होरा कमिटीचा रिपोर्ट समोर का आला नाही, त्याबाबत अनेक खुलासे समोर आले असते. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत की नाहीत याबाबत अधिक माहिती घ्यावयाची असल्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून घ्यावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमधील वंचितच्याप्रकाश आंबेडकरमेदवारांसाठी प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या आधी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे. दाऊदचा शोध घेताना तिसऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला. इसिसला माणसं पुरवण्याचे काम जगभरातून झाले. १९९० ते २००० देशात ब्लास्ट होतं गेले. त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्याशी भेटीचा काही संबंध आहे का हे तपासले पाहिजे हे मला म्हणायचं आहे, असा खळबळजनक’देवेंद्र फडणवीसांनी संविधानाचा मूळ रंग सांगावा’राहुल गांधी महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या सभेमध्ये लाल रंगाचं संविधान दाखवत भाषण केले आहे. लाल रंगाच्या संविधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताच आता राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणीचा खेळ रंगला आहे. यातच प्रकाश आंबेडकरांनीही आता देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले आहे. ‘संविधानाचा मूळ रंग काय आहे ते फडणवीसांनी सांगावे,’ असे आंबेडकर म्हणाले.दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.किंवा मतदारांमध्ये आहे, असं मी मानतो. सोलापूर शहर दुर्लक्षित आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर स्वीकारावे.प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुणे आणि सोलापूर दोघात साम्य आहे. दोघांनी सर्वांत जास्त मंत्री पद भोगली. पण एक आणखी साम्य पाणी असून तहानलेले जिल्हे आहेत. सोलापूरला पाण्यासाठी नऊ दिवस थांबणायची गरज नाही असं मी उमेदवार असताना म्हटलेलं होतं. पाच वर्ष झाली नवीन खासदार आले पण परिस्थिती तशीच आहे. दोष एकतर लोकप्रतिनिधीमध्ये आहेतपुढे बोलताना प्रकाश आंबडेकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तर लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणण्याची गरज पडणार नाही. टेकस्टाईल उद्योगामुळे सोलापूरचे नावं जगाच्या पाटलावर आहे. सोलापुरात टेकस्टाईल कमिशन ऑफिस असायला हवं.

You may have missed