गद्दाराला क्षमा नाही, गुवाहाटीचा डोंगर पाहिला आता गद्दारांना टकमक टोक दाखवायचे-उद्धव ठाकरे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. त्यांना हेच सांगायचे आहे की, त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचे टकमक टोक बघितले नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचे आहे. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी २३ तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढून द्यावे, कारण एकाला तिकडे पाठवायचे आहे. मग त्यांनी तिथे झाडे, डोंगर मोजत बसावे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू यांचे लगावला. नाव न घेतापंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत आहेत. लगे रहो मुन्नाभाईम धील सर्किटसारखी त्यांची अवस्था झाली आहे. इथे येऊन शेतकऱ्यांच्या मुद्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील अनुच्छेद ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना, आम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत, असे ते म्हणतात.मोदी-शहा यांनीशिवसेनेचा घात केलाकदाचित अमित शाह यांना स्मृतीभ्रंश झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झाले, त्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. केंद्रातील नेते, पदाधिकारी राज्यात येऊन प्रचार करत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विमानतळ, वेअर हाऊस आदी मोठे प्रकल्प अदानी यांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राचे अदानीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. सर्व उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्राला विकू पाहणाऱ्या भाजपला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. महाराष्ट्राचे गद्दारी करणे हे माझ्या रक्तात नाही. मी लढतोय, मंजूर असेल तर सोबत या ? नाहीतर मी एकटा आहेच. मोदी आणि शहा यांनी शिवसेनेचा घात केला आणि चोर कंपनी घेऊन माझ्यावरच वार करायला येत आहात. हे कदापि शक्य होणार नाही. वार करायला येणार असाल तर माझा शिवसैनिकच तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी सोलापुरातील जाहीर सभेत दिला.