प्रशासनाच्या दडपशाहीमुळे मतदान प्रक्रिया थांबली-आमदार उत्तमराव जानकर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
प्रशासनाच्या दडपशाहीमुळे मारकडवाडी येथील चाचणी मतदान प्रक्रिया थांबली गेली. पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे लोक मतदानासाठी बाहेर पडू शकले नाहीत.पोलीस प्रशासनाने कलम 144 लागू करून लोकांवरती एक प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.अशा प्रकारचे प्रतिक्रिया उत्तमराव जानकर यांनी मारकडवाडी येथे दिली. याबाबत हकीकत अशी की मारकडवडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन मध्ये मतदान प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचा आरोप करत प्रसार माध्यमांच्या समोर फेर मतदान घेण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते.त्यावर निवडणुका अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला जरी असला तरी मतदान करण्याची भूमिका मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी घेतली होती. सकाळपासूनच उभारण्यात आले होते.व त्या बुथवर बॅलेट पेपर, मतदार यादी.निवडणुकी संदर्भातील सर्व साहित्य. ठेवण्यात आले होते.मतदान चालू होण्यापूर्वी. पोलीस प्रशासनाने वाय एस पी शिरगावकर यांनी येथील ग्रामस्थांना कलम १४४ लागू झाल्याचे सांगितले एक जरी मतदान झाले तर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.आशा प्रकारच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या कायदा सुवेवस्था बिघडणार नाही. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शेवटी पोलीस प्रशासन व आमदार उत्तमराव जानकर यांच्यात चर्चा झाली असता उत्तम जानकर व ग्रामस्थांनी चर्चा करून मतदान प्रक्रिया निर्णय मागे घेतला.उत्तमराव जानकर बोलताना म्हणाली की ही लढाई पुढे अशीच सुरू राहील यागोदर मी दोनदा निवडणूक लढवली व त्यामध्ये माझा पराभव झाला तरीसुद्धा मी आक्षेप घेतला नाही मी जरी निवडून आलो असलो तरी आत्ताच्या मतदान प्रक्रियेत ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आला आहे.असा देखील आमदार उत्तमराव जानकर यांनी आरोप केला आहे.येत्या पंधरा दिवसात त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ही माध्यमांना सांगितले.