तुम्ही माणूस आहात समोरच्याला माणसासारखं वागवा,अधिकाऱ्यांना जात नसते-प्रांताधिकारी विजया पांगरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथे उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या अंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट व जातीय सलोखा कार्यशाळा संपन्न झाली..
माळशिरस तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ॲट्रॉसिटी ॲक्ट व जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेची आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व शक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय तथा प्रांताधिकारी विजया पांगरकर मॅडम बोलताना म्हणाल्या की तुम्ही माणूस आहात समोरच्याला माणसासारखं वागवा अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जात नसते ते सर्वांचे असतात काम करत असताना जातीच्या भिंती पलीकडे गेले पाहिजे जातीय सलोखा राखण्यासाठी माणसाचा माणूस म्हणून विचार केला पाहिजे माळशिरस तालुक्यातील उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती ही सर्वांसाठी काम करते त्यांचं अतिशय चांगलं प्रकारे काम आहे अशाप्रकारे समितीतील सदस्यांची प्रशंसा केली.सरपंच,पोलीस पाटील हे गावाचे कान नाक डोळे असतात. त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात त्यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे अशाप्रकारे मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तसेच गटविकास अधिकारी माळशिरस यांनी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे कार्य जबाबदारी व ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि जातीय सलोखा अबाधित ठेवण्याबाबत उद्देश स्पष्ट करीत प्रास्ताविक केले. विशेष सरकारी वकील वैभव धाइंजे यांनी ॲट्रॉसिटी कायदा अस्तित्वात येण्याची कारणे व कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले. माळशिरस चे पोलीस निरीक्षक पवार यांनी पहिली खबर देताना काय काळजी घेतली पाहिजे तपास कसा केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार शेजुळ यांनी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना व पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या यावर भाष्य करत जातीय सलोखा व एकोपा टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्यात.ऍड.सुमित सावंत यांनी ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सांगत अतिशय सोप्या भाषेमध्ये ॲट्रॉसिटी कायदा व जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ॲट्रॉसिटी कायद्यातील समज गैरसमज उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या महत्त्वाच्या सूचना पोलीस पाटलांना केले. दुर्बल घटकावर अन्याय अत्याचार झाल्यास पोलीस स्टेशनचे दरवाजे 24 तास उघडे असून कोणावरही अन्याय खपवून घेतला जाणार नाही असे सांगीतले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे तिन जिल्ह्यांचे प्रमुख समन्वयक नागनाथ बनसोडे यांनी जन आरोग्य योजनेची माहिती देत असताना गोरगरिबांनी या योजनेसाठी काय केले पाहिजे तसेच रुग्णालयांनी कोणत्याही रुग्णास उपचार देण्यासाठी टाळाटाळ करू नये, याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस राज्य सचिव वैभव गीते यांनी ॲट्रॉसिटी कायदा, प्रमुख तरतुदी, अधिकारी कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या, पहिली खबर देताना घ्यावयाची काळजी, तपासामध्ये पुरावा कशाप्रकारे घ्यावा, दोषारोप पत्र पाठवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, सरकारी वकिलांच्या जबाबदाऱ्या, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची जबाबदारी व कार्य विशद केली. तसेच उपविभागीय अधिकारी व डी वाय एस पी गटविकास अधिकारी यांचे आभार मानले. महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा ॲट्रॉसिटीच्या अंमलबजावणीसाठी माळशिरस उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना झाली व त्याच्या नियमित बैठका देखील घेतल्या जातात याची दखल जिल्हाधिकारी व मंत्रालय स्तरावर मुख्य सचिव यांनी घेतली व माळशिरस तालुक्याचे कौतुक केले ही बाब देखील वैभव गीते यांनी कार्यशाळेमध्ये अधोरेखित केली. अध्यक्षस्थानी बोलताना प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी अतिशय मार्मिक व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पोलीस पाटलांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात सरपंचांनी दुर्बल घटकांना मदत करावी समिती सदस्यांनी कशाप्रकारे जबाबदारी तसेच प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या समजावून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही कार्यशाळा पार पडली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उपविभागीय स्तरावर तालुकास्तरीय ॲट्रॉसिटी एकच्या कार्यशाळा व जातीय सलोखा बैठका सुरू आहेत.यावेळी माळशिरस तालुक्यातील पोलीस पाटील,ग्रामसेवक,तलाठी, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी समितीचे सदस्य सचिव विकास अधिकारी आबासाहेब पवार व विस्तार अधिकारी सरवदे,बुगड रावसाहेब यांनी प्रयत्न केले. यावेळी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सर्व सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते उपस्थित होते.सूत्रसंचालन समितीचे सदस्य प्रमोद शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तालुका समन्वयक किरण वाघमारे यांनी केले.