माळशिरस तालुक्याचे सामाजिक पालकत्व विकास दाद धाइंजे व वैभव गीतेंनी स्वीकारले

माळशिरस तालुक्याचे सामाजिक पालकत्व विकास दाद धाइंजे व वैभव गीतेंनी स्वीकारले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सामान्य जनतेचा आवाज बनून आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य साचीव वैभव गिते हे प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सातत्याने भेटी घेऊन सध्याच्या परिस्थितिचा आढावा घेत आहेत.तालुका प्रशासनाचे मनोबल वाढवून जनतेचे प्रश्न सोडवत आहेत.लॉकडाऊन च्या काळात परराज्यातील व परजिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचे,कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून मजुरांना,कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह गहू तांदूळ किराणा माल पुरवत आहेत.किराणा दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढवल्याने तात्काळ प्रांतअधिकारी शमा पवार यांची भेट घेऊन जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले प्रांत अधिकारी यांनी जास्त दर आकारणी केल्यास कारवाई करण्याचे नोटीस संबंधितांना काढले
रेशनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणून तालुका पुरवठा अधिकारी व उज्वला गॅस वितरणासाठी सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी तहसीलदार यांची भेट घेतली व धान्य पुरवठा सुरळीत केला.शिवभोजन थाळी अकलूज, वेळापूर,महालुंग
नातेपुते, दहिगाव, पिलीव या गावांमध्ये पाच रूपयांमध्ये गरीब व गरजू जनतेपर्यंत थाळी पोचावी म्हणून प्रांतअधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली
बौद्ध अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी 15 टक्के निधीतुन जीवनावश्यक वस्तू द्याव्यात म्हणून गटविकास अधिकारी यांची भेट घेतली
त्यामुळे आणीबाणीच्या काळात काळजीवाहू मुख्यमंत्री देशाचा कारभार पाहतो तशीच किमया माळशिरस तालुक्यात विकास दादा धाइंजे यांनी केल्याने त्यांना काळजी वाहू आमदार असे जनतेतून म्हंटले जात आहे एक कुटूंब प्रमुख कुटुंबाची काळजी घेतो तशी काळजी तालुक्यातील जनतेची घेत आहेत अशी चर्चा घरा-घरात चालू आहे.

You may have missed