आंतरराष्ट्रीय

दहिगाव येथे शिवकालीन ऐतिहासिक वेस लोकार्पण सोहळा संपन्न

 

(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे)
 दहिगाव तालुका माळशिरस येथे शिवकालीन ऐतिहासिक  वेस नूतनीकरण लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच याप्रसंगी नूतन सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  दहिगाव ला ऐतिहासिक वारसा लाभला असून शिवकालीन इतिहासात कसबे दहिगाव अशी ओळख असून, जैन मुनी महतीसागर महाराज यांचे वास्तव्य लाभलेले व त्यांच्या संकल्पनेतून लाभलेले ऐतिहासिक मंदिर उभे असलेले गाव तसेच निंबाळकर राजेंची जहागिरी व राजवाडा यांचा वारसा लाभलेल्या दहिगाव  हे ऐतिहासिक शिवकालीन संस्थानिक गाव आहे. गावामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोक राहतात. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आम्ही दहिगावकर ही संकल्पना अस्तित्वात आली व याच संकल्पनेतून  नामशेष होत असलेली ऐतिहासिक वेस  दगडी बांधकाम करून त्याचे नूतनीकरण करून त्यावेसला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले व ती वेस लोकार्पण करण्यात आली. हा कार्यक्रम दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर  घेण्यात आला होता.या कार्यक्रमास गावातील युवक प्रतिष्ठित व्यक्ती व गावकऱ्यांचा मोलाचा सहभाग दिसून आला. तसेच या कार्यक्रमास  गावातील आजी-माजी शासकीय कर्मचारी अधिकारी वर्ग,माजी सैनिक,शिक्षक,ग्रामस्थ युवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिरळे येथे शिंदे गट शिवसेना शाखेचे उद्घाटन

नातेपुते (प्रतिनिधी)

पिरळे ता. माळशिरसयेथेशिंदे गट शिवसेनेचे उद्घाटन तालुकाप्रारमुख जकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या निमित्तानेअल्प दरात चणाडाळ डाळ वाटप पाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले शासनाच्या सर्व योजना  गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे.पिराळा येथे  शिवसेनेच्या  शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त एका आधार कार्ड वर ५ किलो ६० रुपये किलो दराप्रमाणे सवलतीच्या दरात हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली यावेळी  बोलताना राजकुमार हिवरकर म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी शासन आपल्या दारी ही योजना आणून सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे त्याचाच प्रत्येक म्हणून आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत  यांच्या मार्गदर्शनाखाली. शिवसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात डाळ नागरिकांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली यामध्ये आत्तापर्यंत 75000 पेक्षा जास्त माता-भगिनीने लाभ घेतलेला आहे. त्याचा प्रतिसाद पाहता आपण लवकरच दोन लाखाचा टप्पा सुद्धा गाठू यावेळी   माजी सरपंच संदीप नरळे,सरपंच सुनील दडस,पत्रकार प्रमोद शिंदे,वसंत दडस,माजी सरपंच शिवाजी लवटे,माजी उपसरपंच अमोल बापू शिंदे,दत्तू लवटे,दादा लवटे,उमेश खिलारे जिल्हा परिषद गटप्रमुख अनिल दडस पिरळे शाखाप्रमुख आकाश खिलारे उपप्रमुख उमेश जाधव दहीगाव जिल्हा परिषद गटाचे प्रमोद चिकणे नातेपुते नगरपंचायतचे गटनेते दादाभाई मुलानी प्रभाग ७ प्रमुख सनी बरडकर जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत उपाध्यक्ष राजू जाधव सचिव माऊली देशमुख व शेकडो ग्रामस्थ बहुसंख्येने महिला भगिनीउपस्थित होते.

ग्रामपंचायत एकशिव च्या उपसरपंच पदी सुवर्णा दत्ता कांबळे यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नातेपुते  (प्रतिनिधी) ग्रामपंचायत एक शिव च्या उपसरपंच पदी शिवपुरी येथील सौ. सुवर्णा दत्ता कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली याप्रसंगी  निवडणूक निर्णय समिती,सरपंच सौ. शिल्पा रणजित पाटील,मा मा.उपसरपंच मुमताज बाबासाहब मुलाणी,माजी सरपंच श्री शहाजीदादा धायगुडे, निवडणूक प्रशासक श्री जाधव साहेब,ग्रामसेवक श्री पवार भाऊसाहेब,माजी उपसरपंच श्री भारत सूर्यकांत साळवे,ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली सुनील जानकर , ग्रामपंचायत सदस्या सौ.पूजा शशांक बागनवर ,ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथ नाना जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री राहुल अवघडे,प्रतापसिंह मोहिते पाटील विदयालय शिवपुरी चे माजी सभापती श्री सुग्रीव बापु मोटे. श्री रणजित पाटील टिपू सुलतान ग्रुप एकशीव चे अध्यक्ष वाहिद बाबासाब मुलांनी व एन डी एम जे संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष  श्री दत्ता आड्याप्पा कांबळे डि.के  आधी  उपस्थित होते.

पिरळे येथे दोन ऑक्टोबर पर्यंत स्मशानभूमीचे काम सुरून केल्यास आंदोलन करणार – प्रमोद शिंदे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


पिरळे येथे दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत स्मशानभूमीचे काम तात्काळ सुरू केल्यास २ ऑक्टोबर रोजी,तहसील प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एकाच दिवशीआमरण उपोषण व धरणे आंदोलन करणार असल्याचा एन डी एम जेसंघटनेच्या वतीनेकरण्यात येणार असल्याचा इशारा एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेदन दिले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धाअद्याप पिरळे ता माळशिरस येथे स्मशानभूमी झालेली नाही.गावामध्ये दलित व पिचडावर्ग इतराज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून मयत झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते.व उघड्यावर अंत्यविधी करताना ताण-तणाव निर्माण होतो.त्यातून जाती-अत्याचारासारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या अगोदर सुद्धास्मशानभूमी संदर्भात10 ऑक्टोबर 2022 रोजी माळशिरस तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्यात आले होते.त्यावर ग्रामपंचायत पिरळे यांनी अंदाजे जवळ पास एक कोटी २० लाख रुपये स्मशानभूमीचा प्रस्तावपुढील कार्यालयाकडे पाठवला होता.स्मशान भूमीसाठी ग्रामपंचायतकडे पुरेशी जागा सुद्धा उपलब्ध आहे.त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही.त्यामुळे तात्काळ सुशोभित,हायटेक,आरसीसी स्मशानभूमी चे कामतात्काळ सुरू करण्यात यावे.तसेच लिंगायत समाज व मुस्लिम समाज दफनभूमी चे ही काम सुरू करण्यात यावे.दोन ऑक्टोबर पर्यंत काम न सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.

उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देताना राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना

रियल लाइफ चे हिरो हे मेजरअनिल मानेंसारखे असतात- आय आर एस समीर वानखडे


नातेपुते (पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे)- बीएसएफ मधून नुकतेच रिटायर झालेले नातेपुते चे सुपुत्र मेजर अनिल माने यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल नातेपुते कर यांच्यावतीने सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सन्मान सोहळ्यास सुप्रसिद्ध आय आर एस समीर वानखडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
बोलताना ते म्हणाले की रियल लाईफरियल लाइफ चे हिरो हे मेजर अनिल माने यांच्यासारख्या असतात अनिल माने यांनी माझ्यासोबत ड्रग्स मिशनमध्ये तीन वर्ष काम केले आहे.अनिल हा जिगरबाज पोलादी व धाडसी होता.अनिल ने त्याच्यासोबत अनेक बीएसएफ मधील जवान आमच्या सोबत जोडले व आतापर्यंत कुख्यात 357 गॅंगस्टर आम्ही पकडले आहेत.70 गुंडांना फक्त पाच जवानांनी अडवले होते. त्यात अनिल माने एक होता.अशाप्रकारे मेजर अनिल माने यांचे कौतुक त्यांनी केले.सध्या मुलांना खरा राष्ट्रवादी समजून सांगितला पाहिजे व मुलांना आयएस आयपीएस अधिकारी बनवले पाहिजे.
प्रसंगी मा आमदार रामहरी रुपनवर, शिवामृत दूध संस्थेचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच समीर वानखडे यांच्या पत्नी सिने अभिनेत्री क्रांति रेडकर बोलताना म्हणायला पाहिज अनिल माने हा माझ्या भावासारखा आहे.साहेबांची सावली बनून तो नेहमी राहिला आहे.अशा देशासाठी रक्त वाहणाऱ्यालोकांची गाथा मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.सह पत्नी मेजर अनिल माने यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना मेजर अनिल माने भाऊक झाले व म्हणाले हा माझा एकट्याचा सन्मान नसून माझे आई-वडील व माझे सर्व गुरु यांचा सन्मान आहे.याप्रसंगी बा.ज.दाते प्रशालेचे चेअरमन धर्यशील भाऊ देशमुख,रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे,माजी सरपंच डी वाय राऊत,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मा पं समिती सदस्य माऊली पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,एडवोकेट पिसाळ,पंचक्रोशीतील माजी सैनिक,ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले.

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ॲट्रॉसिटीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क संदेश भालेराव मुंबई

वैभवजी गीते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला ऐतिहासिक यश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहोत…ऍड.डॉ.केवल उके

ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले होते.
राज्य महासचिव ऍड.डॉ. केवल उके यांच्या नेतृत्वात ऍड.अनिल कांबळे,विनोद जाधव,पी.एस.खंदारे, पंचशीला कुंभारकर,शरद शेळके,बंदिश सोनवणे,शशिकांत खंडागळे,संदेश तुकाराम भालेराव यांनी महामहीम राज्यपाल यांना भेटून निवेदन दिले होते.
तसेच जंक्शन ता.इंदापूर जी.पुणे येथे दलीत पँथरच्या वर्धापन दिनी वैभव गिते यांनी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला होता.
मुंबई मराठी पत्रकार संघात परिषदेत बोलताना ही समिती नसल्याने शासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
पुणे येथे जाती तोडो समाज जोडो या मॅक्स महाराष्ट्र आयोजीत कार्यक्रमात बोलताना वैभव गिते यांनी या समितीची स्थापना नसल्याने अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे सांगून सरकारला घेरले होते.
मावळ जी.पुणे येथील जाती तोडो समाज जोडो या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत समिती नसल्याने कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे उदाहरणांसह सांगीतले.महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेत ही समिती स्थापन करून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती.याची दखल घेऊन
शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत शासनाने राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना केली आहे.
या समितीची कार्ये खालील प्रमाणे

1) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय,२०१५) व सुधारित नियम, २०१६ ची अंमलबजावणी राज्यात योग्य रितीने व काटेकोरपणे होते किंवा कसे याचा आढावा घेणे तसेच या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

2) अत्याचारग्रस्त,अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य / मदत नियमांनुसार देण्यात येते किंवा कसे, याबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेणे.

3) अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यक्तींचे पुनर्वसन इ. नियमानुसार व तात्काळ करण्यात येत आहे किंवा कसे, या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

4) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत पोलिसात दाखल करण्यात आलेले गुन्हे/न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणे यांचा आढावा घेणे. या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधित संस्था / अधिकारी/
कार्यालयाकडून होते आहे किंवा कसे याचा आढावा घेणे.

5) या अधिनियमांतर्गत नियमांचे उल्लंघन अथवा अंमलबजावणीसंबंधी शासनास प्राप्त अहवालांवर कार्यवाही करणे
समितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री,अनुसूचित जातीतील खासदार,आमदार व सर्व वरिष्ठ अधिकारी असे एकूण 25 जन आहेत.
या समितीच्या एका कॅलेंडर वर्षात जानेवारी व जुलै या महिन्यांत १-१ अशा २ बैठका आयोजित कराव्यात.
यापूर्वी दि. ८ जानेवारी, २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे पुनर्गठण करण्यात आले होते.याची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत दिनांक.
झाली होती.तेव्हापासून आजतागायत या कायद्याच्या अंमलजावणीसाठी मुख्यमत्र्यांनी एकही बैठक घेतलेली नाही.सध्या
समिती स्थापन झाल्याने तात्काळ बैठक आयोजित करून कार्यवाही करावी अशी मुख्यमंत्री यांच्या कडून अपेक्षा आहे.यासाठी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले व त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे,संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे,
व एन.डी.एम.जे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधवांचे सहकार्य व मार्गर्शन मिळाल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना वैभव गिते यांनी दिली.

पिरळेत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन


 • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
  पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सोमवार दिनांक 17जुलै रोजी सकाळी दहा वाजता जि प शाळा परळी येथे
  ग्रामपंचायत पिरळे व द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्था यांचे संयुक्त विद्यमाने
  *भव्य रांगोळी स्पर्धा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे ब्रिलियंट संस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण क्लास घेण्यात आले होते अनेक महिलांनी या शिवण क्लास प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला होता प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच प्रमाणपत्र वाटपासोबत रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यातत आले आहे या स्पर्धेसाठी
  *प्रथम बक्षीस**
  माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
  द्वितीय वक्षिस*
  माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
  तृतीय बक्षिस*
  माझी वसुंधरा सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीस असून स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियम राहतील
  स्पर्धा नियम*
  (१) स्पर्धेसाठी रांगोळी स्वतःची आणावी.
  (२) रांगोळी काढताना त्यातून सामाजिक संदेश गेला पाहिजे
  (३) रांगोळी काढताना स्वतः चे नाव टाकायचे नाही संयोजक कडून नंबर घेउन टाकायचा.
  (४) रांगोळीचे बक्षिसाचे नंबर हे तुमच्या रांगोळीतून सामाजिक संदेश, आकृती, रंगरंगोटी कशी आहे यावर अवलंबून असते. यावर तक्रार चालणार नाही.
  *(५) रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे **
  (६) रांगोळी स्पर्धेत कोर्स करणाऱ्या महिलांनी व बाहेरील महिलांनी ही सहभाग घेऊ शकतात.
  (७) रांगोळी स्पर्धाचे परीक्षक हे बाहेरील असतील. त्यामुळे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  दिनांक १७जुलै २०२३वार सोमवार वेळ सकाळी १०.००वाजता*
  ठिकाण :- जि.प.प्राथमिक शाळा पिरळे*
  तरी सर्वांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान पिरळे गावचे सरपंच सुनिल दडस, उपसरपंच अमोल शिंदे ,ग्रामसेवक हनुमंत वगरे द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी केले आहे.

विद्यार्थी हितासाठी धडपडणारे शिक्षक अभिजीत वाळके यांनी स्वखर्चातून विद्यार्थी हजेरी साठी बसवली बायोमेट्रिक मशीन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
नातेपुते येथील
नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विभागांमध्ये इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक अभिजीत वाळके यांनी स्वखर्चातून विद्यार्थी हजरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविली. गेली पंचवीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग तसेच विद्यार्थ्यांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमाची ओळख निर्माण करणारे अभिजीत वाळके सर यांनी यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. इयत्ता चौथी पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा असताना आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती आणले आहेत. तसेच गतवर्षी इयत्ता दुसरीचा वर्ग असताना एकही रविवार सुट्टी न घेता व दिवाळी उन्हाळी सुट्टी मध्ये शाळा घेऊन कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिन्यात एकही दिवस गैरहजर न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर वेगवेगळी बक्षिसे पॅड, वॉटर बॉटल, कंपास पेटी ,टिफिन बॅग स्वखर्चातून देऊन विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्यास प्रेरित केले तसेच. यावर्षी इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी स्वखर्चातून बायोमेट्रिक मशीन बसवून नवीन उपक्रम सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यात हा इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धतीवर हजरी घेण्याचा पहिलाच प्रयोग आहे. या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बायोमेट्रिक पद्धतीवर हजेरी देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे कुतूहल मनाला खूप समाधान देत होते असे वर्गशिक्षक अभिजीत वाळके यांनी सांगितले. आज सदर बायोमेट्रिक मशीनची अनावरण करण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कूडलिक इंगळे , ज्येष्ठ शिक्षकं संजय जाधव,दादासाहेब देवकाते मनोज पवार, रवी ननवरे , मारूती भांगरे , सूनिल कदम , इंगोले, किशोर,भरते, संतोष वाघमोडे , सागर बरडकर, शिक्षकेतर कर्मचारी विनायक चांगन हे सर्व उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक कूडलिक इंगळे यांनी उपक्रमाचे कौतुक करून शिक्षकांनी सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या प्राथमिक विभागाचे नाव उज्वल करावे असे आवाहन सर्व शिक्षक बांधवांना केले.

माळशिरस येथे शाहूमहाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न

माळशिरस येथे शाहूमहाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न
नातेपुते (प्रतिनिधी)


माळशिरस येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूमहाराज यांची जयंती नालंदा बुध्द विहार ट्रस्ट च्या वतीने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवात सा.गटशिक्षणाधिकारी करङे, जि प सदस्य बाळासाहेब धाईजे , नुतन कृषी अधिकारी पंकजजी लोंढेसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 10 व 12 वी मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक मुला मुलींना एक झाङ भेट देण्यात आलं तसेच जिल्हा परिषद शाळेतील गरीब व होतकरू पहिली ते सातवीतील मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नूतन कृषी अधिकारी पंकज लोंढे, सुहानी पोपट गेजगे या मुलीने पुणे येथे झालेल्या तायकांदो कराटे स्पर्धेत ब्राॅज पदक मिळविल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. छत्रपती शाहूमहाराज यांच्या जीवनावर प्रा दिपक धाईजे सर , ङाॅक्टर कुमार लोंढेसाहेब, प्रदिप धाईजे व जि प सदस्य बाळासाहेब धाईजे यांनी मनोगत व्यक्त केले नालंदा बुद्ध विहार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांनी केले. या कार्यक्रमास जेष्ठ नेते आबाजी सावंत, अशोकबापु धाईजे ट्रस्टचे अध्यक्ष विकासदादा धाईजे, मिलींद सरतापे ,विशाल साळवे , दशरथ नवगीरे , सरपंच रजनीश बनसोङे , दादा नामदास , रणजीत सातपुते , राम कांबळे , चंद्रकांत कांबळेगुरूजी , रमेश धाईजे , रणजीत सरवदे , ङाॅक्टर राहुल केंगार , मोहन करङे , मिलींद गायकवाड, किरण धाईजे , बुध्दभूषण धाईजे , अतुल धाईजे ,अक्षय जाधव, लखन बेंद्रे ,बुध्दभूषण बनसोङे , तसेच जि प शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. रणजीत धाईजे उपस्थित आमच्या आभार व्यक्त केले.

You may have missed