आंतरराष्ट्रीय

कल्याण येथे महाकवी मधुकरजी घुसळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभव गिते यांना समाज भूषण पुरस्कार

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क संदेश भालेरावसोनियाची उगवली सकाळ…” या भिमगीताचे गीतकार महाकवी कालकथित मधुकरजी घुसळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित वालधुनी- कल्यान येथे आयोजित ‘निखळला तारा..’ या कार्यक्रमा निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मा. वैभवजी गिते यांना “महाकवी मधुकरजी घुसळे समाजभूषण” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मुख्य आयोजक आयु.संदीप घुसळे व सिध्दांत संदिप घुसळे यांनी केले
याकार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना एन.डी.एम.जे. संघटनेचे राज्य सचिव मा वैभव गिते साहेब् यांनी “दिवंगत मधुकरजी घुसळे यांनी लिहिलेली अनेक सांस्कृतिक व बुद्ध-भीमगीते ही महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदे यांनी गाईली आहेत. या गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा जपण्याचे कार्य त्यांनी केले आहे, त्यांचे नाव हे नक्कीच आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल” असे म्हटले.

यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आयु.विजय कांबळे, , कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष ॲड. प्रविण बोदडे, ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव ,प्रणव भागवत, प्रचित भालेराव इत्यादी उपस्थित होते.

नातेपुते येथील उद्योजक मारुती धोंडिबा शिकारे यांचे दुःखद निधन

नातेपुते येथील उद्योजक मारुती धोंडिबा शिकारे यांचे दुःखद निधन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते येथील जिद्दी कष्टाळू उद्योजक मारुती धोंडीबा शिकारे यांचे काल सायंकाळी पाच वाजले च्या दरम्यान अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे मारुती शिकारे हे अतिशय मेहनती जिद्दी आणि कष्टाळू होते त्यांचा चप्पल चा होलसेल व्यवसाय असून त्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी आपला व्यवसाय केला त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सून नातवंड असा परिवार असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजातील युवकाचा अंत्यविधी रोखणाऱ्यांवर कडक कारवाई करा——-केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी यांना सूचना

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजातील युवकाचा अंत्यविधी रोखणाऱ्यांवर कडक कारवाई करा——-केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी यांना सूचना

वैभव गिते यांनी दिलेल्या निवेदनाची रामदासजी आठवले यांनी घेतली गंभीर दखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई वांद्रे मनोज रणपिसे- माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी येथे मातंग समाजातील तरुणाचा अंत्यविधी स्मशानभूमीत घेऊन जाताना अडथळा केलेबाबत अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.अद्याप आरोपींवर कडक कारवाई झाली नसल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव व ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी 20 मागण्यांचे निवेदन सादर केले.याची गंभीर दखल घेऊन रामदासजी आठवले यांनी राज्याचे पोलिस महासंचालक व जिल्हाधिकारी सोलापूर यांना आरोपींवर कडक कारवाई करून साठे कुटुंबियांचे संपूर्ण पुनर्वसन करावे.खटला संपेपर्यंत पोलिस संरक्षण द्यावे.माळेवाडी ते स्मशानभूमी रस्ता मंजूर करावा.पुन्हा अत्याचार होणार नाही म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात खटल्यात वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अशा सूचना केल्या आहेत.

रिपाई आठवले गट निवडणुका संदर्भात बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –रिपाई आठवले पक्षाची जिल्हा बैठक संपन्न आगामी निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा सोलापूर शासकीय विश्राम विश्रामगृह येथे ही बैठक पार पडली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष व मोहोळ पंचायत समितीचे उपसभापती माननीय अशोक नाना सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत
पक्षाची ताकद आणि आठवले साहेबांची ताकद वाढविण्यासाठी आपण सर्व निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकदीनिशी आपले उमेदवार उभा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक नाना सरोदे यांनी सांगितले त्याचबरोबर सोलापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असून त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड यांचे संपर्क कार्यालय लवकरात लवकर सुरू करुण बाहेरच्या तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करावा असी विनंतीवजा सूचना सर्व जिल्ह्याचे नेत्यांनी केली, फक्त रामदासजी आठवले साहेब आपले नेते आहेत साहेबांनी कधीही कार्यकर्त्यांचा दुजाभाव केला नाही त्यामुळे काही नेते जरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असलेले तरी त्याच्याकडे कुठल्या प्रकारचे लक्ष न देता आपण पूर्ण ताकतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले पक्षाचेच काम करावे आणि करत राहू असेही जिल्हाध्यक्ष अशोक नाना सरोदे यांनी सांगितले कारण आपले गाव चे कार्यकर्ते त्यांच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या या बरोबरीचे काम करत आहेत आणि तालुक्याचे कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांबरोबरीचे काम करत आहेत तर जिल्ह्याचे नेते त्यांच्या राज्याच्या नेत्याच्याबरोबरीचे काम करत आहेत त्यामुळे त्यांचे नेते फक्त आपल्या कार्यकर्त्यावर नाव ठेवण्याचे काम करत आहे ते आपल्या सामाजिक काम करणाऱ्या राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कधीही बरोबरी करू शकत नाही
लवकरच अनेक हजारो कार्यकर्त्यांचे रिपब्लिकन पक्षात प्रवेश होणार आहेत तरी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून भव्य अशा मेळाव्याचे आयोजन करणार आहे असे रिपाई आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष व मोहोळ पंचायत समितीचे उपसभापती अशोक नाना सरोदे यांनी सांगितले त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक मा सुनील सर्वगोड यांनी सांगितले की पक्षातून काढण्याचा अधिकार फक्त आठवले साहेबांनाचा आहे आपण आठवले साहेबांचे काम करतोय कुण्या आयर्या गैर्याचे नाही त्यामुळे आपण इतर कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नये साहेबांना सर्व कार्यकर्ते समानच आहेत म्हणून आपण सर्व एकजुटीने काम करून पक्षाची ताकद वाढवू त्यासाठी प्रत्येक दोन महिन्याला जिल्ह्याच्या बैठका होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले यावेळी राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार केंगार त्याचबरोबर प. महा. संघटक दयानंद धाईंजे युवक प्रदेश उपाध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड जिल्हा कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड जिल्हा सरचिटणीस व सांगोल्याचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष व अक्कलकोटचे नगरसेवक उत्तम गायकवाड अशा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित जिल्ह्याचे मार्गदर्शक अरुण अण्णा बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे पाटील जिल्हा संपर्कप्रमुख भारत नाना आठवले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविराज बनसोडे करमाळा युवक अध्यक्ष यशपाल कांबळे माळशिरस तालुका उपाध्यक्ष समीर सोरटे अश्विन भाऊ गायकवाड, महेश अण्णा गजधाने, युवा नेते दीपक सरवदे,अतिश आठवले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे आयोजन रिपाइं जिल्हा कार्याध्यक्ष समाजरत्न अजित भाऊ गायकवाड यांनी केले होते

उच्चपदस्थ अधिकारी प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांच्याशी बोरगाव-माळेवाडी प्रकरणी वैभव गिते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई मंत्रालयीन विशेष प्रतिनिधी

उच्चपदस्थ अधिकारी प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांच्याशी बोरगाव-माळेवाडी प्रकरणी वैभव गिते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले

गृह विभागाने पोलिस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण) यांच्याकडून अहवाल मागितला

माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी येथे मातंग समाजातील गृहस्थाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत रस्त्याने जाण्यासाठी मज्जाव केल्याबाबत अकलूक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते व ठाणे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव श्री संजय सक्सेना यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली व बोरगाव-माळेवाडी अंत्यविधी रोखलेल्या घटनेचे गंभीर्य लक्षात आणून दिले.वरिष्ठ प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांनी पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडून जलद व वस्तुनिष्ठअहवाल मागितला आहे.कडक कारवाई न झाल्यास सर्व संघटनांना सोबत घेऊन आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा वैभव गिते यांनी दिला आहे.एक दिवसापूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सनदी अधिकारी अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्या केबिन मध्ये जाऊन आरोपींवर कारवाई करण्यासाठी वैभव गिते व संदेश भालेराव आक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याची चर्चा मंत्रालयात रंगली होती.

बोरगाव-माळेवाडी अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास मज्जाव प्रकरणाचा आवाज मंत्रालयात घुमला

बोरगाव-माळेवाडी अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास मज्जाव प्रकरणाचा आवाज मंत्रालयात घुमला

मंत्रालयात वैभव गीतेंचा आक्रमक पवित्रा….अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांचे पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई संदेश भालेराव- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी या गावात मातंग समाजाच्या धनाजी अनंता साठे यांचे प्रेत अंत्यविधी करण्यासाठी गावातील रवींद्र शहाजी पाटील सह 13 जणांवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 20/8/2021 रोजी एट्रॉसिटी व भादवी च्या कलमान्वये गुन्हा दाखल असूनसुद्धा आरोपींवर कडक कारवाई झाली नसल्याने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते व ठाणे प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी थेट मंत्रालयात जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सनदी अधिकारी अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्या केबिनमध्ये घुसून जाब विचारला वैभव गिते व संदेश भालेराव यांचा आक्रमक पवित्रा पाहून अपर मुख्य सचिव यांनी मंत्रालयीन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.आरोपींवर कडक कारवाई करण्याचे लेखी निवेदन देऊन चर्चा केली.राज्याचे पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागितला.आठ दिवसात कारवाई न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा वैभव गिते यांनी शासनास दिला आहे.त्यामुळे मंत्रालयीन वातावरण गंभीर व गरम झाल्याचे दिसत होते.

कोरोना पार्श्वभूमीवर नातेपुते येथील मोहरम साध्या पद्धतीने

कोरोना पार्श्वभूमीवर नातेपुते येथील मोहरम साध्या पद्धती साजरा करण्यात आला
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे मुस्लिम बांधवांचा मोहरम पवित्र सासन मानला जातो नातेपुते शहरात मोठ्या उत्साहात मोहरम दरवर्षी साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोना महामारी साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला काझी गल्ली परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीने मोहरम निमित्त मोठा आरास केला जातो यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांचा मोहरम हा साध्या पद्धतीने करण्यात आला.

मोहरा साध्या पद्धतीने साजरा करताना सामाजिक कार्यकर्ते सलमान काझी व कार्यकर्ते

नातेपुते येथील काझी गल्ली परिसरात ताबूत (ताजिया) मोठया उत्सवात सर्व बांधव एकत्रीत येवून आनंदात साजरी करत असतात. या वर्षी कोरोनाची साथ असल्यामुळे कोवीड चे नियम पाळून साध्या पद्धतीने मोहरम साजरा करण्यात आला.
या वेळी सलमान काझी, असीम काझी, साजिद काझी , जिलानी काझी, शब्बीरभैया काझी , वसीम काझी, समीर काझी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

मुलाच्या मयता साठी वेठबिगारी ने केली गळफास घेऊन केली अत्महत्या, पीडित कुटुंबास एन डी एम जे ची शिष्टमंडळाची भेट

मुलाच्या कफना साठी वेठबिगारी ने केली गळफास लावून अत्महत्या

मुलाच्या मयता साठी वेठबिगारी ने केली गळफास घेऊन केली अत्महत्या, पीडित कुटुंबास एन डी एम जे चे ठाणे प्रदेशाध्यक्ष बंदी सोनवणे सचिव शशी खंडागळे व कार्यकर्ते यांची भेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –दिनांक २४\८\२०२१ रोजी वाडा मोखाडा तालुक्यातील
सदर बातमी कळताच मुंबई ठाणे प्रदेश टीम चे आधक्ष बंदिश सोनवणे सर यांची मोखाडा तालक्यातील आसे गावातील पीडितांना भेट
सदर मयत व्यक्ती काळू पवार यांनी अवणी साठी शेती वर काम करण्यासाठी ३००० रू ची बोलणी करून मुलाच्या मयत कफना साठी उचल ५००रू घेऊन मुलाचे मयत झाल्यानंतर काही दिवसांनी काळू पवार हे रामदास कोरडे यांच्या शेतावर आवणी शेतीकाम करण्यास जाऊ लागले असता त्यांचा कडून शेती कामाचे दोन दिवस खाडे झाले असता शेती मालक त्याचा खूप राग आला व काळू पवार यांना मार हान केली मारहाण व अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली
सदर घटनेला न्याय देण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनवणे सर पाठपुरावा करत आहेत घटना स्थली भेट देण्यासाठी मा. बंदिश सोनवणे,( अध्यक्ष मुंबई ठाणे प्रदेश) शशिकांत खंडागळे (सचिव मुंबई ठाणे प्रदेश) नितेश गायकवाड (कल्याण ग्रामीण अध्यक्ष) मयूर पागी सुरेश. वळवी यांनी भेट

बोरगाव-माळेवाडी मातंग कुटुंबाचा अंत्यविधी स्मशानभूमीत नकरू दिल्याबद्द एन डी एम जे यांच्या वतीने,कल्याण-डोंबिवली तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण-( संदेश भालेराव) बोरगाव-माळेवाडी मातंग कुटुंबाचा अंत्यविधी रोखल्याबद्दल
नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य,कल्याण डोंबिवली शहर  जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले
दिनांक २५\८\२०२१रोजी   नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेब यांच्या अदेशानुसार  व राज्य सचिव वैभवजी गिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.विशाल साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनवणे ,ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजयजी काबंळे
ॲड. प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून कल्याण तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले निवेदन
मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल होऊन योग्य ति शिक्षा व्हायलाच हवी म्हणून एकूण २० मागण्यांचे निवेदन दिले

मालेगाव बोरगाव प्रकरण मातंग समाजातील व्यक्तीचा अंत्यविधी करून दिल्याबद्दल निषेधार्थ कल्याण तहसीलदार यांना निवेदन देताना एन डी एम जे राज्य सचिव वैभवजी गिते बंदिश सोनवणे संदेश भालेराव तसेच कल्याण-डोंबिवली व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी

मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील १३ जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
बोरगांव( माळेवाडी(बो) येथील मातंग समाजाचे “धनाजी आनंता साठे” ,यांचे निधन झाल्यावर त्यांचे कुटुंबिय व इतर लोक त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीकडे निघाले होते. त्याचवेळी रविंद्र शहाजीराव पाटील, गजेंद्र भिमराव पांढरे, चंद्रकांत मारूती पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयराम मच्छिंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, प्रविण मधुकर कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे व अमोल दत्तात्रय कुदळे यांनी मांगाचे प्रेत आम्ही आमच्या रस्त्याने अंत्यविधीसाठी जाऊ देणार नाही असे म्हणून मातंग समाजाच्या भावना दुखावल्याने व मयत प्रेताची विटंबना केल्याने या तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी विमल सुरेश साठे यांची जाऊ राणी दशरथ साठे व दशरथ आनंता साठे यांनी गावातील विनायक शिवाजी कुदळे, राहुल शिवाजी कुदळे, नवनाथ विष्णू पांढरे व विजया शिवाजी कुदळे यांचेविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्याच्या कारणावरून साठे व कुदळे यांच्यात वाद आहे. त्यामुळेच फिर्यादीचे दीर धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मयताची हेळसांड करून सदरच्या जातीयवाद्यांनी जातीयवादी वक्तव्य केले आहे. धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यावर त्यांचा अंत्यविधी करण्याकरिता सरपणाची आवश्यकता असल्याने फिर्यादीचा मुलगा मिथुन व इतर लोक बोरगांव येथील राजू माळी यांच्या लाकडाच्या अड्ड्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अड्ड्यामध्ये सरपण नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी खंडाळी येथून टेम्पोमध्ये सरपण आणले. यादरम्यान सदरच्या टेम्पोच्या पाठीमागे धनाजी आनंता साठे यांचे प्रेत घेऊन त्यांचे नातेवाईक माळेवाडी (बो) येथील स्मशानभूमीकडे जात असताना वरील तेरा जातीयवाद्यांनी पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून “तुम्ही आमच्याविरूध्द दिलेली तक्रार माघारी घेतो असे लेखी लिहून द्या, नाहीतर तुमचा टेम्पो व प्रेत या रस्त्याने जाऊ देणार नाही, मांगाचे मयत आमच्या शेतातील रस्त्याने स्मशानभूमीकडे न्यायचे नाही. तसेच जर तुम्ही ऍट्रोसिटीची तक्रार माघारी घेतली नाही तर तुम्ही प्रेत ओढ्यात नेऊन अंत्यविधी करा” असे वक्तव्य केले. त्यावेळी नातेवाईकांनी सदरची स्मशानभूमी ही गावातील नागरिकांसाठी असल्याने तुम्ही आम्हाला आमच्या मयत इसमाच्या अंत्यविधीसाठी का अडविता? अशी विचारणा केली असता सदरचा रस्ता आमच्या शेतातील असल्याने आम्ही तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही असे हे जातीयवादी म्हणाले. इतकेच नव्हे तर मयताचे प्रेत त्या रस्त्याने घेऊन जाता येऊ नये म्हणून या जातीयवाद्यांनी रस्त्यावर पाणी सोडले. त्यामुळे फिर्यादी विमल सुरेश साठे या दीराचे प्रेत लाकडाच्या टेम्पोमध्ये ठेवून आपल्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेल्या. तेव्हा संबंधित तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टनुसार ३(१)(एस), ३(१)(झेड ए), ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रेताचे दहन उपस्थित पोलिसांच्या साक्षीने माळेवाडी (बो) ग्रामपंचायतसमोर करून अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्या या जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध

मागासवर्गीया वरील अन्याय अत्याचार त्वरित थांबवा अन्यथा तिव्रआंदोलन – महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिनेश लोंढे –
    चंद्रपुर,दि.२४ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे साहेब यांची भेट घेऊन वरील विषयांतर्गत निवेदन देण्यात आले.
    चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्या मधील वणी खुर्द ह्या गावात दलित महिला वृद्धांना भरचौकात खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केली असून संपूर्ण गावात भीती व दहशतीचे वातावरण पसरले आहे त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील बोरगावात एका मांतग समाजातील कार्यकर्त्याचा शव सार्वजनिक स्मशानभूमीत जाळू देण्यात मज्जाव करण्यात आला वरील दोन्हीही घटना जातीयवादातून घडल्या आसून संबंधितांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली
    .

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, नाशिक उप जिल्हाप्रमुख मा.सुनिलभाई यशवंते, नाशिक जिल्हा नेते मा.गोटीरामजी पवार,नाशिक जिल्हा संघटक मा.प्रशांतजी भालेराव,युवा नेते सागरभाऊ काळे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed