आंतरराष्ट्रीय

पिरळे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पणण सोहळा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
 

पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी  सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या वतीने योजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमत माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटीलयांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय पेयजल योजनेतील  82000 लिटर  क्षमतेची उंच पाणी टाकीचे लोकार्पण सोहळा,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून काशी विश्वेश्वरकाशी  सभामंडप उद्घाटन तसेच आमदार राम सातपुते यांच्या निधीतून मंजूर झालेल्यामहादेव मंदिर सभा मंडप चे भूमिपूजन व हायमस पोलचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.हा कार्यक्रम  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाल विधानसभा सदस्य आमदार राम सातपुते व शिवामृत संघ चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार असून या कार्यक्रमास पंचक्रोशीतील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित असणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक यांच्यावतीने करण्यातत आले आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योजक संदीप तात्या नरोळे यांनी केले आहे.

पिरळे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा

 

पुरोगामी न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)  पिरळे तालुका माळशिरस येथे दिनांक 15 जानेवारी 23 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दलित पॅंथरचेे प्रणेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त  दलित पॅंथर संघटनेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या अभिवादन सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील दलित पॅंथर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले ( दलित पॅंथर प्रदेशाध्यक्ष) हे असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब शिंदे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे व तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले यांनी केले आहे .

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे

खडतर परिश्रमाच्या जोरावर सतीश तात्या ढेकळे यांची गरुड झेप सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
एकशिव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील 40-41 वर्षाचा युवक सतीश तात्या ढेकळे जिद्द,मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर त्यांनी उद्योग सामाजिक क्षेत्रात गरुड झेप घेतले आहे.
खरंतर सतीश ढेकळे गरीब कुटुंबात जन्माला आलेला व्यक्तिमत्व प्राथमिक शिक्षण एकशिव येथे तर माध्यमिक शिक्षण प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे इयत्ता दहावीपर्यंत.परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम केल्याखेरीज पर्याय नव्हता म्हणून त्यांनी गाव सोडून बाहेर मजुरी करण्याचा निर्णय घेतला
व ते पेंटिंगचं काम करण्यासाठी मजूर म्हणून हैदराबाद येथे एका ठेकेदाराच्या कडे गेले सुरुवातीला काम कसं करायचं माहित नव्हतं पहिल्यांदाच घरातून बाहेर पडल्यामुळे बाहेरचं जग कसं असतं हे माहित नव्हतं पहिले चार-पाच दिवस वडापाव वर आपल्या पोटाचे भूभागवली.राहिला निवारा नव्हता म्हणून तिथेच सिमेंटच्या गोडाऊनमध्ये मुक्काम ठोकला हळूहळू एका चांगल्या व्यक्तीची ओळख झाली व त्या व्यक्तीने प्रामाणिकपणा पाहून काम दिले.
त्यानंतर सतीश तात्या ढेकळे यांनी कधीच माघार वळून पाहिलं नाही त्यांनी एक उत्तुंग गरुड झेप घेतली व आज सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली ते भाजपाचे पिरळे पंचायत समिती गणातून प्रबळ दावेदार मानले जातात.त्यांनी कोणत्याही राजकीय पदावरती नसताना अनेक लोकांना निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.
एकशिव व पिरळे व इतर ठिकाणी स्वखर्चाने अनेक बोअर वेल दिले.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गोर गरीब गरजू लोकांना पुणे मुंबई सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये लागणारी आर्थिक मदत केली,व पेशंट ला घरी सोडण्यासाठी अँबूलन्स ला जादा पैसे देण्याऐवजी स्वतःच्या गाडीने पेशंट ला घरी पोचवणे.
कोरोना काळात अनेक गरजू लोकांना किराणा साहित्य व दवाखान्यात साठी लागणारे सर्व औषधा सहित होणार सम्पूर्ण खर्च केला.
स्वतःच्या साई एंटरप्राइजेस या व्यवसायच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींना आर्थिक सहाय्य व व्यवसाय मार्गदर्शन करून अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केले.
गावात पावसाळ्यात ज्या ठिकाणी रस्ता मध्ये चिखल होऊन चालता येत नाही अशा, एकशिव पिरळे चव्हाणवाडी बांगार्डे ठिकाणी स्वखर्चाने खडीकरण करून रस्ता करून दिला.
सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, व शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेऊन दिला.
तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा,आट्यापाट्या व हॉलीबॉल आशा अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. लोकांचे आरोग्य चांगले राहावं म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन.
पुणे सारख्या शहरातील आमदार व नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सहकार्याने अनेकांना गरजवंताना व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य ही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत सर्व समाज उपयोगी कामे उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांचं कामच सर्व सामान्य लोकांना आवडत असून त्यांना अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पिरळे पंचायत समिती गणातून मधून मिळत आहे त्यामुळे पिरळे पंचायत समिती गणातून उद्योजक सतीश तात्या ढेकळे हे पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आशा
दमदार व दिलदार मित्राला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रमोद शिंदे पिरळे नातेपुत
9975903040

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या राज्य उपाध्यक्षपदी श्रीकांत बाविस्कर यांची निवड


नातेपुते प्रतिनिधी : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल महाराष्ट्र या नोंदणीकृत राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नातेपुते येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत उत्तम बाविस्कर यांची सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनी निवड झाली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी पत्र देऊन बाविस्कर यांची निवड जाहीर केली श्रीकांत बाविस्कर हे गेल्या २५ वर्षापासून पत्रकार क्षेत्रात असून त्यांनी अनेक नामांकित दैनिकात पत्रकार म्हणून काम केले आहे आणि सध्याही करीत आहेत निवडीनंतर श्रीकांत बाविस्कर म्हणाले ,”ए जी एफ सी या राष्ट्रीय पत्रकार संघटने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली असून संघटनेच्या ध्येयधोरणानुसार सर्वांना बरोबर घेऊन संघटनेचे काम करणारअसल्याचं त्यांनी सांगीतले .

उंबरे दहिगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मौजे उंबरे दहिगाव तालुका माळशिरस येथील जनतेतून सरपंच पदी सौ. शोभा विजय ठोंबरे यांची निवड झाल्यानंतर आज मा. विष्णुपंत नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रेय ढेकळे यांचे बंधू श्री बापूराव गोविंद ढेकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दतात्रय गायकवाड व ग्रामसेवक एम. के. शिंदे यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सर्व सदस्य व पांडुरंग ढेकळे, लक्ष्मण ठोंबरे, दत्तात्रय जगन्नाथ ढेकळे विठ्ठल बाबु ढेकळे,सोपान महादेव वाघमोडे, मारुती वाघमोडे, मधुकर ठोंबरे,विष्णू ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे तुकाराम दशरथ वाघमोडे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा समस्त उंबरे दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ शोभा विजय ठोंबरे यांनी आपल्या कामातून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन केले. यावेळी उपसरपंच श्री बापुराव ढेकळे यांनी श्री दत्तात्रय पंत ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरे गावचा विविध विकास कामातून चेहरा मोहरा बदलू व गावच्या विकास साठी नेहमी कटीबद्ध राहु असे प्रतिपादन केले.

कळंबोली पुलावरून स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत कडून अपघात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

कळंबोली ता माळशिरस येथील पुलावरून पहाटे च्या सुमारास टेंभुर्णी येथील एम एच 45 ए क्यू 92 93 ही स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत पडून भीषणअपघात झाला आहे.हकीकत आशिकी पहाटे  चारच्या सुमारास सागर घोडके राहणार टेंभुर्णी हे टेंभुर्णी वरून कळंबोली ला पाहुण्याकडे येत असताना पहाटेच्या सुमारास एका ट्रकने गाडीला  नदीच्या पुलावर रकट मारल्यामुळे तीस्विफ्टगाडी नदी वरील अरुंद पूल व कठडा नसल्यामुळे नदीमध्ये कोसळली त्या स्वीट मध्ये चौघे प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.स्थानिकांच्या मदतीने चौघांचा जीव वाचवण्यात आला. दुसऱ्या दिवशी क्रेन च्या साह्याने गाडी बाहेर काढण्यात आली. नेहमीच या पुलावरअशा प्रकारचे अपघात होत असतात.काहींना या पुलावरून खाली पडून आपला जीव गमवावा लागला.या पुलावरून नेहमीची वर्दळ असते शाळेला व कॉलेजला जाणारे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळेला जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पूल ओलांडवा लागतो .दरवेळेस नदीवर निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे बांधले जाते व पूर आल्यानंतर ते पुराच्या प्रवाहात वाहून जातात.लवकरात लवकर पुलावरील कठडे संरक्षण भिंत चांगल्या दर्जाचे बांधण्यात यावे व पुलाची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी एन डी एम जे चे प्रमोद शिंदे  व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. लवकरात लवकर पुलाच्या कठड्याचे काम सुरू केले नाहीतर 26 जानेवारीला ग्रामस्थांसह पुलावरा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केला आहे.जर इथून पुढे एखाद्याचा अपघात होऊनअनर्थ झाला तर याला जबाबदार संबंधित विभाग असेल.व संबंधित विभागातील अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करणार.

जि प शाळेतील शिक्षक दादासाहेब साळवे यांनी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिले 75 हजारचे पुस्तकांचे संच

गरीब घरातील विद्यार्थी हा घडला पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आपल्या कमाईतील विसावा हिस्सा हा सामाजिक कार्यासाठी दिला पाहिजे त्यातूनच समाज उन्नती होईल म्हणून दरवर्षी हा उपक्रम आम्ही हाती घेतो- दादासाहेब साळवे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

जि प शाळा कळंबोली येथील शिक्षक दादासाहेब साळवे यांनी सामाजिक भान ठेवून2023 मध्ये माळशिरस तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सलग तिसऱ्यांदा 75 हजार रुपयाचे पुस्तक संच भेट दिले.नातेपुते येथे गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली जि प शाळेतील  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.याच कार्यक्रमात माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांना दादासाहेब साळवे  सर यांच्या वतीने पुस्तक संच देण्यात आले.कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविकेत गटशिक्षणाधिकारी धनंजय  देशमुख सर म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये फक्त गोरगरिबांची मुलंशिकायला येतात त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करत आहेत .तसेच या शिष्यवृत्तीचा टक्का वाढवा म्हणून या शिबिराचे आयोजनन केले आहे.तसेच यावेळेस 83 विद्यार्थी शिष्यवृत्तीला पास झाले आहेत.तर पुढील काळात जिल्हा परिषद ची 100 पेक्षा जास्त मुले शिष्यवृत्तीला यश मिळवतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.पत्रकार सुनील राऊत बोलताना म्हणाले की मला मराठी शाळा व शिक्षकांचा अभिमान आहे.मराठी शाळेतील शिक्षक व शिक्षिका हे मुलांचे आई बाप असतात विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्याचं काम करतात.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब,पत्रकार सुनील राऊत, करडे साहेब,मुख्याध्यापक बडवे सर,सुधीर नाचणे सर,पत्रकार आनंद लोंढे, प्रमोद शिंदे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरोडकर सर यांनी केले.या कार्यक्रमास चंद्रशेखर शिवगुंडे,प्रदीप कनाळ,बापूसाहेब कांबळे,झोडगे सर, राजाभाऊ गुजर सर,वनसाळे सर,माने सर,जब्बर मुलाणी सर, सर्व केंद्रप्रमुख व मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होते.  

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात बाजार दिवस उत्साहात साजरा

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात बाजार दिवस उत्साहात साजरा
नातेपुते (प्ररतिनिधी) रत्नत्रे इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शनिवार रोजी सकाळी 9:00 वाजता बाजार दिवस चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाघाटन डॉक्टर रणजीत गजानन गुरव (शास्त्रज्ञ टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटी टेक्सास युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री .अनंतलाल दोशी संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर होते. सदर प्रसंगी सदाशिवनगर चे नूतन सरपंच श्री विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी प्रशालेचे सदस्य वैभव शहा, अर्जुन धाइंजे,अभिमान सावंत, विष्णू भोगळे , रामदास कर्णे, बबन गोपणे, गजानन गोरे, माणता पाटील, बाहुबली दोशी, तुषार गांधी , सुरेश धाईजे, वसंतराव ढगे, शिवाजी लवटे, तानाजी पालवे, तुषार ढेकळे,
सौ.मृणालणी दोशी ,सौ.पूनम दोशी ,धनश्री दोशी,सारिका राऊत सदाशिवनगर ग्रामपंचायतचे नूतन सदस्य,प्रशाला कमिटी सदस्य, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना,खरेदी-विक्री, नफा-तोटा यातून व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. बाजारात विविध प्रकारचे 50 स्टॉल लावले होते.या बझार डे मध्ये एक लाख 45 हजाराची उलाढाल झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दैवत वाघमोडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. श्रीकृष्ण पाटील यांनी केले.

अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन

अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) शासकीय जागेमध्ये आतिक्रमण नियमानुकुल करण्या संदर्भात नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेच्या वतीने विकास दादा धाईंजे व वैभव गीतेंच्या नेतृत्वात माळशिरस तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र शासन यांच्या 20 ऑक्टोबरच्या 2018 पत्रानुसार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमाकूल करण्यास गती देऊन सदर निवासस्थानाची जागा अतिक्रमण धारकाच्या नावे करण्यात यावी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प सोलापूर यांनी दिनांक 19/12/2022 रोजी दिलेल्या पत्रानुसार सर्व जाती धर्मांच्या नागरिकांची अतिक्रमण नोंदणी मध्ये कार्यवाही करणे तसेच माळशिरस तालुक्यात शेती महामंडळाच्या जागेत अतिक्रमण करून राहिलेल्या लोकांचे अतिक्रमण निवासी नियमानुकुल करून गावच्या हद्दीतील शेती महामंडळाच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांच्या घराची नोंद करून त्यांना नमुना नंबरआठ चा उतारा देण्यात यावा.माळशिरस तालुक्यातील सर्व नगरपंचायत शहरांतर्गत व ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानूकूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल बैठकीत सादर करावा.तसेच अतिक्रमणा संदर्भात मा.तहसीलदार यांच्या अंतर्गत मा.गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांची तात्काळ बैठक लावण्यात यावी अशी मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली . तसेच या संदर्भात नऊ मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी भेट दिली व सदर सर्व मागण्यांवर पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.याआंदोलनास आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे एन डी एम जे राज्यसचिव वैभव गीते,प्रमोद शिंदे
सुनील भोसले, गणेश गायकवाड, गोरख गायकवाड,सुरज गायकवाड,आशिष धांडोरे ,प्रज्ञेश कांबळे,व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलनास पंचायत समिती सदस्य अजय सकट प्रहार संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

You may have missed