प्रमोद शिंदे

भाजपा चे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुंन्हा दाखल करनार.- पँथर डॉ. राजन माकणीकर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि(प्रतिनिधी)
चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेली तक्रार ही मनुस्मृतीचे समर्थन करणारी असून भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करनार असल्याची माहिती डॉ राजन माकणीकर यांनी दिली.
पँथर ऑफ सम्यक योद्धा या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचे केंद्रीय महासचिव व सल्लागार पँथर डॉ राजन माक्निकर यांनी पक्ष व संघटनेच्या वतींने सोनी टेलिव्हिजन नेटवर्क व अमिताभ बच्चंन चे जाहीर अभार अभिनंदन व्यक्त केले असून असे ऐतिहासिक प्रश्न नेहमी विचारले जावेत अशी आशा व्यक्त करून 25 दिसेम्बर मनुस्मृती दहन दिनी संविधान चौक सीपझ गाव मुंबई येथे मनुस्मृती दहन करणार असल्याची माहिती देऊन ज्यांना संविधान मान्य नाही अस्यांनी खुशाल भारत सोडून जावा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संविधानावर चालणाऱ्या भारतात राहून संविधानाचा विरोध करून मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वीय सहाय्यक व लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे.
समविधान विरोधी, देशद्रोही कारवाया करणार्या नाजाईज मनुवादी पिलावळ देशात तोंड वर काढत असून बौद्ध धर्मगुरू पूज्य भदंत शिलबोधी, रिपाई अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पँथर श्रवण गायकवाड, पँथर राजेश पिल्ले, पँथर सचिन भूटकर, समाजसेवक वीरेंद्र लगाडे, कायदेशोर सल्लागार नितीन माने आदींचे शस्तमंडल वारंवार घडलेल्या घटनेवर पँथर ऑफ सम्यक योद्धा, सम्यक मैत्रेय फौंडेशन, रिपाई डेमोक्रॅटिक च्या वतीने तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही डॉ.माकणीकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षा नीती आंदोलन समिती अकोला ची चिंतन बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकोला विजय कुचे- राष्ट्रीय शिक्षा नीती आंदोलन समिती अकोला ची चिंतन बैठक दिनांक 1/11/2020 रोजी मराठा सेवा संघ कार्यलय येथे पडली, अकोला येथे जेष्ठ सामजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ मा विजयभाऊ कौशल यांच्या अध्यक्षते खाली पार पडली, या बैठकीत खालील मुद्द्यावर प्रमुख चर्चा करण्यात आली
1) आंदोलनासाठी जग्रुती करणे
2)आंदोलन समितीच्या तालुका व ग्राम स्तरावर क्रुतीशील कार्यकारणी तयार करणे
3) जिल्हा स्तरावर शैक्षणिक धोरणाच्या विरोधात कार्यक्रम आयोजित करणे
4) समविचारी सामजिक राजकीय व शैक्षणिक संघटनांचा सहभाग घेणे
5) रविवार दिनांक 8/11/2020 ला ठीक 12 वाजता मराठा सेवा संघ कार्यालय, अकोला येथे मीटिंग चे आयोजन करण्यात आले आहे या वेळी सुरज मेश्राम,संदीप बाजरे, गजानन देशमुख, अशोक पटोकार,चंद्रकांत झटाले,पंकज जायले,सचिन भीमकर, राहुल इंगोले, सचिन रामटेके, रोशन रंगारी, प्रा. प्रवीण ढोणे, शरद इंगोले इत्यादींचा सहभाग होता

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मराठा समाजातील संदीप जाधव यांच्या कुटूंबास मिळाली चार लाख मदत …..विकास दादा धाइंजे

लोकप्रिय नेते वैभवजी गिते साहेबांच्या खडतर पाठपुराव्याला यश

वैभव गीतेंनी कुटुंबास दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आठ दिवसातच केल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रतून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कनैसर्गिक आपत्तीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुराच्या पाण्यात कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मराठा समाजातील गरीब कुटुंबातील विवाहित तरुण कळस ता.इंदापूर येथून पाण्यात वाहून गेला होता.संदीप जाधव यांचा स्वभाव अतिशय मायाळू असल्याने कुरबावी गावासह पंचक्रोशीतील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी एक वर्षाचा मुलगा आई व वडील असे कुटुंब आहे.
विशेष बाब म्हणजे माळशिरस तालुक्यातील कोणत्याही आमदारांनी व माढा लोकसभेचे खासदार यांनी कुरबावी ता.माळशिरस येथे येऊन संदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले नाही.
एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचीव ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने वैभव गिते, प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे,दत्ता कांबळे,संभाजी साळे,यांनी निवासी नायब तहसीलदार देशमुख यांची भेट घेऊन संदीप जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत तात्काळ देण्यात यावी यासाठी निवेदन देऊन चर्चा केली होती तसेच लोकप्रिय नेते वैभव गिते साहेबांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे कळवले होते तसेच इंदापूर तालुक्यातील आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती तसेच भेट घेऊनही निवेदन दिले होते
या घटनेची सविस्तर माहिती वैभव गिते साहेबांनी बारामतीचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा करून त्वरित कार्यवाही करण्याची वीनंती केली होती.प्रांत दादासाहेब कांबळे यांनी तहसीलदार इंदापूर यांना त्वरित कार्यवाही करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे नेते शंकर थोरात व तालुकाध्यक्ष वैभव धाइंजे यांनी तहसीलदार यांना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली अखेर आज तहसीलदार इंदापूर जि. पुणे यांनी संदीप जाधव यांची पत्नी सारिका संदीप जाधव यांच्या नावाने चार लाख रुपयांचा चेक दिला असल्याची माहिती एन.डी.एम.जे संघटनेचे नेते शंकर थोरात यांनी दिली.संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी खडतर पाठपुरावा केल्यामुळे नैसर्गिक आपत्तीग्रस्त मराठा समाजातील जाधव कुटुंबास झटपट मदत मिळाली त्यामुळे जाधव कुटुंबाने लोकप्रिय नेते वैभव गिते व त्यांच्या संपूर्ण टीम चे आभार मानले आहेत.
अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख वैभव काटे यांनी दिली आहे.

वैभव गीतेंनी कुटुंबास दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आठ दिवसातच केल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रतून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

आरपीआय चे कनिष्क कांबळे यांना आमदारकी(?)


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई

दि. (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विधान परिषद सदस्य पदावर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून महाराष्ट्र राज्यातील व देशातील युवा उमलते नेतृत्व माजी आमदार पँथर दिवंगत टी एम कांबळे यांचे सुपुत्र कनिष्क कांबळे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत माजी आमदार टी एम कांबळे यांचे सुपुत्र कनिष्क कांबळे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकी निश्चित झाल्याची चर्चा राजकीय गोटात पसरली असून कनिष्क कांबळे एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असून अश्या युवा वर्गाला आमदारकी दिल्यास सकारात्मक राजकारणाच्या प्रवाह गती येऊन तरुण वर्ग राजकारणाकडे आकर्षिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पँथर टी एम कांबळे यांच्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकरणाचे गालबोट लागले असून स्वछ व पारदर्शक समाजसेवा करून समाजात त्यांची आगळीवेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे, त्यांचिंच प्रतिमा म्हणून कनिष्क कांबळे यांनी जनतेतून पाहण्यात येते.
आंबेडकरी चळवळीतील दिग्गज व लढवय्या नेत्याच्या मुलांपैकी एक उज्ज्वल व विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून कनिष्क कांबळे यांचे नाव सर्वाधिक पुढे येते.
दिवंगत माजी आमदार टी एम कांबळे यांच्या नंतर कनिष्क कांबळे यांनी स्वबळावर राजकीय शक्ती वाढवून आंबेडकरी चळवळीत स्वतःचे एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी अस्तित्व निर्माण केले आहे, या व अन्य गुणांना पाहून राजकीय गोटात राज्यपाल नियुक्त आमदारकी साठी कनिष्क कांबळे यांच्या नावाला पसंती येत आहे.
विधानसभा निवडणुकीत आर पी आय डेमॉक्रॅटिक हा कनिष्क कांबळे यांचा पक्ष कॉंग्रेस सोबत तर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अधिकृत युती करून रणांगणात होता आणि दोन्ही पक्षासोबत अत्यंत घनिष्ट संबंध आहेत त्यामुळेच की काय कनिष्क कांबळे यांची वर्णी लागली असावी असेही चर्चिले जात आहे.
सदर चर्चेबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधून चर्चेचा खुलासा केला तेंव्हा डॉ. माकणीकर यांनी सकारात्मक अविर्भाव आणला मात्र अधिकृत अशी माहिती अजून आली नसून चर्चा होत असल्याचे सत्य आहे असे स्पष्टीकरण दिले व युवा शक्ती व इंजिनीअर असलेल्या व्यक्तीला आमदारकी मिळाल्यास खऱ्या अर्थाने आमदार या पदाला न्याय मिळेल असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका-पँथर डॉ. राजन माकणीकर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि (प्रतिनिधी) देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका येणारा न्यायालयीन खर्च आम्ही करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटने केंद्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला.

      देशातील महामानवांच्या पुतळ्यांच्या विटंबनेत वाढ झाली असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना सर्रास केली जात आहे.
 यामागचा सूत्रधार शोधणे आवश्यक असून अश्या विकृतीमुळे समाजात तेढ निर्माण होऊन राष्ट्राची एकता व अखंडता बाधित होन्याची शक्यता नाकारता येणार नाही शिवाय  धार्मिक वाद सुद्धा फोफाऊ शकतो. असे वाद व विटंबना थांबवण्यासाठी पुतळ्याजवळ सार्वजनिक वाचनालय उभारून पुतळ्याच्या जागेची स्वच्छता व निगा राखावी तसेच ग्रामीण भागात पुतळा कमिटीच्या वतीने 4 तरुण श्रमदानातून पुतळा संरक्षणासार्थ उभा करावेत ज्यामुळे अश्या प्रकारावर प्रतिबंध होण्यास मदत होईल. पुतळे उभारून त्या पुतळ्याची निगा राखणे सुद्धा पुतळा समितीचेच परम कर्तव्य असायला पाहिजे.
 किंबहुना देशातील कोणत्याही महामानव महानायिका यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या हातांना कलम करावेत व पोलिसात द्यावे, शिवाय कलम करणाऱ्या शूरविरावर होणाऱ्या न्यायालयीन बाजूचा लढा पँथर ऑफ सम्यक योद्धा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने लढण्यात येऊन परिवारासह न्यायालयीन आर्थिक भार उचलण्यात येण्याची ग्वाही दिली तर असा विकृत समोर आला तर हातपाय तोडून संविधानिक लढा स्वतःच्या बचावासाठी मी लढेंन असेही पँथर डॉ माकणीकर यांनी सांगितलेआंबेडकर भवन, भीमा कोरेगाव, 

राजगृह वरील भ्याड हल्ला व झालेल्या पुतळा विटंबना प्रकरणी पोलिसांद्वारे काय कारवाई करण्यात येऊन आरोपी व खरा सूत्रधार कोण (?) याबद्दल पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी नेतृवाखाली श्रावण गायकवाड, वीरेंद्र लगाडे, राजेश पिल्ले, सचिन भूटकर आदी पँथर्सचे शिस्तमंडळ संबंधित पोलीस ठाण्यातुन तपास अहवाल मागवत असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.

देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका. पँथर डॉ. राजन माकणीकर

अवैद्य मुरूम उत्खनन करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची- युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांची मागणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

/:-मौजे-खळवे,ता.माळशिरस या गावच्या हद्दीत श्री एम.एस.आवताडे प्रा.लि.या कंस्ट्रक्शन कंपनी,मंगळवेढा यांनी शासनाची कोणतीही परवानगी नसताना अवैध मुरूम उत्खनन व वाहतुक केल्यामुळे कंपनीवरती दंडात्मक कारवाईची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
खळवे येथील गट नं.151,120/1,152,154 याव्यतिरिक्त इतर गटांमध्ये आवताडे कंस्ट्रक्शन कंपनीने आठ महिन्यांपासून विनापरवाना,अनधिकृत गौणखनिज मुरूम उत्खनन व वाहतुक केली आहे.
सदर मुरूम हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2019-20 अंतर्गत पॅकेज क्र.सोलापूर 106,माळखांबी-खळवे-पिराची कुरोली-पंढरपुर या संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी वापरलेला आहे.या कामासाठी लागणारा मुरूम उत्खनन करण्यासाठी कंपनीने महसुली प्रसिद्धी
शासनाची कोणतीही परवानगी किंवा राॅयल्टी भरली नाही.यामुळे कंपनीने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला आहे.
गांव कामगार तलाठी सजा-खळवे /माळखांबी यांनी मा.तहसीलदार माळशिरस यांचेकडे मुरूम उत्खनन व वाहतुकीबाबत जमा.संकलन आवक क्र.4083 हा दि.15जुलै2020 रोजी पंचनामा सादर केला होता.परंतु सदर पंचनाम्यामध्ये पंचांची नावे व स्वाक्ष-या नसल्याने तो मोघम स्वरूपाचा असल्याचे तत्कालीन तहसीलदार अभिजित पाटील यांनी तलाठी यांना उलटपक्षी पत्राद्वारे कळवले होते.
तसेच दि.12 आक्टोंबर 2020 रोजी सदर पंचनाम्यामध्ये त्रुटी असुन नव्याने फेरपंचनामे करून परिपूर्ण पंचनामे सादर करण्याचे पत्र मा.प्रांताधिकारी अकलूज व मा.तहसीलदार माळशिरस यांनी मंडल अधिकारी-महाळुंग व तलाठी यांना काढले आहे.तरीही.तलाठी दिपक साठे व लिपिक अशोक शिंदे हे फेरपंचनामे करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून विलंब करीत असल्याचा आक्षेप युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या वाघमारे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र जमिन महसुली अधिनियमानुसार अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्यामुळे उत्खनन केलेल्या मुरूमाच्या पाचपट दंडाची रक्कम आकारून शासनाचा बुडविलेला महसुल वसुल करावा.माजी तहसीलदार पाटील यांनी अहवालात नमुद केल्याप्रमाणे तलाठी आवताडे कंस्ट्रक्शन कंपनीला पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच तहसीलदार निंबाळकर यांनी फेरपंचनामा करण्याचे फेरआदेश दिले असतानाही तलाठी पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याने तलाठी यांचेवरती निलंबनाची कारवाई करावी अन्यथा दि.09 नोव्हेंबर 2020 रोजी तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वप्निल वाघमारे यांनी दिला आहे.

“एस.एम.आवताडे कंपनीने या प्रकरणात शासनाची शुद्ध फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडविल्याचे प्रशासनासमोर आणुन दिले आहे.हे प्रशासनाने मान्यही केले आहे. परंतु फेरपंचनाम्याचे आदेश असुनही दंडात्मक कारवाई करण्यास तलाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.फक्त कागदी घोडे नाचवुन लालफितीचा कारभार केला जात आहे.याचा सरळ अर्थ असा होतो की,आवताडे कंन्सट्र्कशन कंपनीचे व महसुल प्रशानाचे आर्थिक लागेबंध असु शकतात.” असे आरोप
-मा.स्वप्निलभैय्य वाघमारे,
युवासेना जिल्हाप्रमुख तथा पं.स.सदस्य,माळशिरस यांनी केले आहेत.

बहुजन क्रांती मोर्चा माळशिरस तालुका यांच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथील घटनेच्या विरोधात वेळापुर पोलीस स्टेशन येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील बहुजन समाजातील मनीषा वाल्मिकी या युवती वरती तेथील काही मनुवादी,जातीवादी, नराधमांनि बलात्कार करून तिची हत्या घडवून आणली होती..
त्या आरोपिंना फाशीची शिक्षा व्हावी म्हणुन भारत देशातील 550 जिल्ह्यात बहुजन क्रांती मोर्च्याचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून आज माळशिरस तालुक्यातील वेळापुर येथे सर्व बहुजन महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वेळापुर पोलीस स्टेशन मध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आले…

यावेळी बहुजन क्रांती मोर्च्याचे माळशिरस तालुका संयोजक-रिकेश चव्हाण
सिकंदर कोरबु ,संजय वाघमोडे
माहिती सेवाभावी संस्थेचे-महेंद्र साठे
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष-पिनुभाऊ येडगे
आरपीआय सरचिटणीस-रजनीश बनसोडे
मैत्री प्रतिष्ठान संस्थापक-महेश शिंदे व सर्व टीम
बहुजन मुक्ती पार्टीचे ता अध्यक्ष-नागेश
वाघंबरे
बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका संपर्कप्रमुख सौरभ वाघमारे
युवा नेते आबासाहेब वाघमारे
भारतीय बेरोजगार मोर्च्याचे तालुका अध्यक्ष दिलीप बोडरेआदी मान्यवर उपस्थित होते

बहुजन क्रांती मोर्चा माळशिरस तालुका यांच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथील घटनेच्या विरोधात वेळापुर पोलीस स्टेशन येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले

तुम्ही जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो. डॉ. राजन माकणीकर

तुम्ही जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो. डॉ. राजन माकणीकरपुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई (प्रतिनिधी) वेदनादायक आयुष्य जगण्यास भाग पाडणार्‍या जातींना बळकटी देण्यासाठी भारतीय संविधानाद्वारे प्रयत्न केला गेला. मात्र प्रस्थापित जातींनी जातीव्यवस्था समूळ नष्ट केल्यास आरक्षण सोडण्यास विचार होऊ शकतो असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
डॉ. माकणिकर पुढे असे म्हणतात की वर्षो नि वर्ष जातींच्या नावाखाली शोषण करून वेदनादायक जीवन जगण्यास भाग पाडले गेले, ज्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवले गेले, दलित या शिवी ने जातीवाचक संबोधन्यात आले, संवीधानाद्वारे आरक्षण देऊन वंचितांना प्रवाहात आणण्याचा असा प्रयत्न केला आहे, माणूस म्हणून अधिकार देण्यात आले आहेत, जर जातीव्यवस्था प्रस्थापित लोकांद्वारे संपवली तर आरक्षण संपेल असे मानले जाऊ शकते, आणि त्यासाठी आम्ही चिंतन करण्यास तयार आहोत.
जातीव्यवस्था हा एक कलंक आहे, देशाला लागलेला एक अभिशाप आहे, भारत देशाचा जातिव्यवस्थेने नाश केला आहे, जातींचा भेदभाव पसरविला आहे, शोषणवादी मानसिकतेने मोठे झालेले लोक म्हणतात की शेवटच्या जन्माची कर्मे आहेत, तुम्ही या जन्मापासूनच या वर्णात जन्माला आला आहात. म्हणून शूद्र समजून आपणास हेच काम करायचे आहे, अशा लोकांनी मोठ्या वंचितांवर अत्याचार केला आहे, त्यांचा हक्क नाकारला गेला आहे,
ही व्यवस्था संपवून भारताला बळकट करावे लागेल.
जे आरक्षणाच्या विरोधात बोलतात त्यांनी जातीव्यवस्था संपऊन रोटी बेटी व्यवहार मानून तसे वर्तन केले तर आम्ही आरक्षण सोडण्याचा विचार करतो. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कनिष्क कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवर पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन केली जाईल व पुढील कार्यक्रमही आखला जाईल, असे डॉ.राजन माकणिकर यांनी सांगितले.

तुम्ही जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो. डॉ. राजन माकणीकर

बेकायदा पाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सहायक आयुक्तांचा आडता हात. भाजपच्या अशोक शेळके यांचा गंभीर आरोप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नालासोपारा, बुधवार दिनांक २८ ऑक्टोबर, २०२० :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती – ब चे सहायक आयुक्त पंकज भुसे यांच्याकडून अनधिकृतपणे पाणी विक्री करणाऱ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या अशोक शेळके यांनी केला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यास अपायकारक आणि अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्या बोगस प्लांट चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बेकायदेशीपणे चालविण्यात येत असलेले गोरखधंदे सीलबंद करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरन देवराजन यांनी कठोर कारवाईचा बडगा उचलला. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई सुरु झाली काही ठिकाणी गुन्हे दाखल होऊन बोगस प्लांट सील करण्यात आले. मात्र प्रभाग समिती – बी चे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांच्याकडून कारवाई करण्यास हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याची बाब अशोक शेळके यांनी समोर आणली आहे.
प्रभाग समिती – ब मध्ये एकूण ६० बोगस प्लांट आढळून आले. दिनांक १२ ऑक्टोबर रोजी ३ प्लांट वर तर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी १५ बोगस प्लांट असे ६० पैकी केवळ १८ बेकायदा प्लांट सील करण्यात आले. उर्वरित ४२ प्लांट वरील कारवाई चे पुढे काय झाले असा सवाल अशोक शेळके यांनी केला आहे. १३ तारखेनंतर आज ऑक्टोबर महिना संपत आला असताना पुढे एकही बेकायदा प्लांट वर कारवाही का झाली नाही, सदरची कारवाई न करण्यामागे सहाय्यक आयुक्तांचा नेमका हेतू काय आहे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.
याप्रकरणी आयुक्त महोदयांनी व्यक्तिशः लक्ष घालावे अन्यथा कारवाईस होत असलेल्या दिरंगाईबद्दल राज्य शासनाकडे पुन्हा तक्रार करावी लागेल असा इशारा अशोक शेळके यांनी दिला आहे.

भुजबळ साहेब यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार च्या युवकमित्र परिवारास 73 महापुरुषांचे ग्रंथ भेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कपुणे-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी व संरक्षण मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे अध्यक्ष मा.नामदार छगन भुजबळसाहेब यांच्या 73 व्या(निर्भय दिन व वाचन दिन) वाढदिवसानिमित भारतीय संविधान , शेकऱ्याचा आसूड , सम्राट बळीराजा,गौतम बुद्ध,जिजाऊ मांसाहेब , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे ते काकासाहेब गाडगीळ,बहुजनांचे कैवारी छगन भुजबळ व इतर महापुरुषांचे जीवनावरील तसेच सामाजिक ,स्त्री, पुरुष समानता विषयाचे 15000रुपयांचे एकूण 73 ग्रंथ नंदुरबार च्या युवकमित्र परिवारास ग्रामीण व दुर्गम भागात वाचन चळवळ गाव तेथे ग्रंथालय मोहीम यशस्वी राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण महाजन ,जिल्हा परिषद, बांधकाम विभाग,पुणे चे कर्मचारी यांना विजयादशमी दिनी म्हणजे दि.25 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र, राजयोग प्लाझा , धायरी ,पुणे येथे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले.
या प्रसंगी सुरवातीला थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सत्यशोधिका आशा व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर प्रवीण महाजन यांचे हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.यावेळी प्रवीण महाजन म्हणाले की ग्रामीण व दुर्गम भागात समाजपरिवर्तनासाठी प्रत्येक गावी ग्रंथालय असणे जरुरीचे आहे म्हणून आमचे संस्थेच्या माध्यमातून वाचनीय ग्रंथ, पुस्तके गोळा करून गावोगावी मोफत वाचनालय चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याबाबतीत पुणेकर मंडळीनी खूप मदत केली असून कृतिशील ग्रंथ मित्र व ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी मोठी मदत केल्याचे आवर्जून सांगितले आणि आता सत्यशोधक मित्र रघुनाथ ढोक यांनी आजच्या दसरादिनी भुजबळ साहेबांनचे वाढदिवसानिमित्त महत्त्वपूर्ण 73 ग्रंथ भेट देऊन आमचे संस्थेच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की भुजबळ साहेब यांचे 71 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरियाणा, कुरुक्षेत्र येथील सावित्री जोतिबा ग्रंथालयास 71 ग्रंथ व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे 3 पुटी अर्धं पुतळे तिकडे जाऊन 2 वर्षांपूर्वी 10 नोव्हेंबर 2018 रोजी भेट दिले होते आणि आज वाचन चळवळी साठी 73 ग्रंथ भेट दिले. पुढे ढोक असे ही म्हणाले की नुकतेच एप्रिल ,मे,जून महिन्यात देशात व परदेशात कोरोना चा धुमाकूळ चालला असताना या महापुरुषांचे ग्रंथानेच भारतीयांचे मनोबल वाढविले हे देखील विसरून चालणार नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांचे व समाजाचे चांगल्या वाचनाने ज्ञान ,मनोधर्य , शिक्षणाची आवड कायम निर्माण व्हावी म्हणून युवकमित्र परिवारास ग्रंथ भेट देऊन गावोगावी वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य करावे असे आवाहन देखील यावेळी केले.
कार्यक्रमाचे शेवटी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड आशा ढोक यांनी म्हंटला तर ग्रंथ भेटीचे नियोजन आकाश ढोक व आभारप्रदर्शन क्षितिज ढोक यांनी मानले तर मोलाचे सहकार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लाभले.

You may have missed