माळशिरस तालुका

माळशिरस विधानसभा फॉर्म छालनीत 35 अर्जापैकी 25 उमेदवार पात्र तर 4 उमेदवार अपात्र

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-प्रमोद शिंदे

माळशिरस २५४ अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माळशिरस विधानसभेसाठी २९ उमेदवारांनी ३५ नामनिर्देशपत्र दाखल केलेली होती. त्यापैकी २५ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र पात्र झालेली असून ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अपात्र ठरलेली आहेत.

शरद गेना सावंत अपक्ष , अरुण मनोहर धाईंजे अपक्ष, सोमनाथ अरुण भोसले अपक्ष, मकरंद नागनाथ साठे अपक्ष, उत्तमराव शिवदास जानकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सुरज अशोक सरतापे बहुजन समाज पार्टी, प्रेमसिंह ज्ञानदेव कांबळे अपक्ष, मनोजकुमार उत्तम सुरवसे अपक्ष, नागेश आबा जाधव अपक्ष, राज यशवंतकुमार वंचित बहुजन आघाडी, सुधीर अर्जुन पोळ अपक्ष, कुमार आनंदा लोंढे अपक्ष, राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी, ज्ञानेश्वर मारुती काटे अपक्ष, अतुल श्रीमंत सरतापे अपक्ष, विकास संदिपान धाईंजे अपक्ष, दादा विश्वनाथ लोखंडे अपक्ष, साळवे नंदकुमार कृष्णाजी अपक्ष, प्रकाश वामन नवगिरे अपक्ष, अनिल तानाजी साठे अपक्ष, शैलेश जनार्दन कोथमिरे अपक्ष, प्रा. डॉ. धनंजय तुकाराम साठे अपक्ष, प्रा. डॉ. सुनील सुखदेव लोखंडे राष्ट्रीय समाज पक्ष, त्रिभुवन विनायक धाईंजे अपक्ष अशा २५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र झालेले आहेत.

तर, अनिल गौतम नवगिरे, संस्कृती राम सातपुते, अडगळे लालासाहेब ज्ञानोबा, किशोर शिवाजी सुळ असे चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अपात्र ठरलेले आहेत.

अकलूज उपविभागीय कार्यालय अकलूज येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ हे काम पाहत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज, माळशिरस, नातेपुते आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.

माळशिरस तालुका संवेदनशील असल्याने एसआरपी तैनात करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज शांततेत दाखल झालेले होते. नामनिर्देशन पत्रांची छाननी देखील शांततेत पार पडलेली आहे. दि. ४/११/२०२४ तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप होऊन माळशिरस तालुक्यातील निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घ्यावी- ए.पी.आय परजणे

चोऱ्या, दरोडे रोखण्याचे काम पोलिसांचे असले, तरी एक सुजाण नागरिक म्हणून परिसरातील चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांची महत्वाची आहे, असे आव ाहन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे. नागरिक व तरुणांना चोऱ्या, दरोडा पडण्याआधी कोणती काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात. याचे मार्गदर्शन पोलिसांकडून देऊन तरुणांना ग्रामसुरक्षा दलात सहभागी होण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दिवाळीच्या सुट्टी असल्याने अनेक नागरिक घराला लॉक लावून कुटुंबासह परगावी फिरावयास जातात मात्र परगावी जात असताना आपल्या घरातील सोन्या चांदीचे दागिने, पैसा व मौल्यवान वस्तू घरातील कपाटात तसेच ठेवून जातात या संधीचा फायदा घेऊन घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू चोर चोरी करून घेऊन जातात. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते. चोरीहोऊ नये यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना सोन्या चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. पोलीस वाहन घेऊन पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. परंतु एकाच वेळी प्रत्येक वस्ती व वाडी ठिकाणी हे वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून काही संशयास्पद वाटल्यास आपत्कालीन नंबर ११२ यावरती तात्काळ पो- लीस ठाण्याशी संपर्क करून माहिती देऊ शकता. असे आ- वाहन नागरिकांना नातेपुते पो- लीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे.

अंगावर खाज येण्याची मुख्य कारणे कोणती? – डॉ पल्लवी मेहर

आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्याविना कुठलेही पीक काढले जात नाही. तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे चांगली गरम पाण्याने धुऊन घ्या व मगच वापरा.काही जणांना नेहमीचे जेवनामुळेही त्रास होऊ शकतो खाण्यात नेहमीचेच पदार्थ खाजेचे कारण ठरू शकतात.उदा. अंडे, दूध, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर अंगाला खाज सुटते आजकाल लोकांच्या, मुलांच्या खाण्यात प्रचंड बदल झाले आहेत. त्यात जास्त फास्ट फूड, कुरकुरे, चिप्स, अगदी पाच-पाच रुपयांची पाकिटे बाजारात विकली जात आहेत. फास्ट फूडमध्ये तर नाना तर्‍हेचे रंग मिसळले जातात. तंदुरीवर तर ब्रश घेऊन रंग लावला जातो. त्यांच्या खाण्यामध्ये ऍजिनोमोटो नावाचा पदार्थ वापरला जातो. अक्षरशः पोत्यांनी ही वस्तू हॉटेलांमध्ये पोचवली जाते. कुठलाही फास्ट फूडचा प्रकार सांगा, तो बनवण्यासाठी या ऍजिनोमोटोचा वापर केला जातो. कारण त्याने म्हणे पदार्थाला चव येते व हा पदार्थ शरीराला अत्यंत घातक आहे. हा सेवन केल्याने अंगाला खाज येते. पुरळ उठतात. तेव्हा फास्ट फूड खाणार्‍यांनो, सावधान!!! तुमच्या अंगाला खाज सुटू शकते.
आपण शरीरावर धारण केलेल्या वस्तूंमुळे, अंगाला लागलेल्या कोणत्याही गोष्टीमुळेसुद्धा अंगाला खाज सुटते. जसे -सिनथेटिक कपडे, कपाळावरील टिकली, साबण, नकली दागिने या सगळ्या गोष्टींनी अलेर्जी निर्माण होऊन त्या भागावर पुरळ व खाज निर्माण होते. काही जणांना काही गोळ्या-औषधे घेतल्यानंतर शरीरावर खाज येऊ शकते. आपल्याला कोणत्या गोळयामुळे त्रास झाला हे लक्षात ठेवून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कुठल्याही आजारानिमित्त जाल तेव्हा डॉक्टरांना ते सांगा.त्वचेचे विविध विकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते- खरूज, नायटा, बुरशी, सोरिअसिस, पित्त, ऍलर्जी, लिकेन प्लेनस, डोक्यातील कोंडा, यासारखे असे अनेक त्वचाविकार आहेत ज्यामधे खाजेचा त्रास होतो. विविध प्रकारच्या रोगांमध्येही रुग्णाच्या अंगावर पुरळ उठून खाज येते.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्क्यात वाढ होण्याकरीता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील बारामती बसस्थानक, बारामती नगरपरिषद तसेच विविध ठिकाणी मतदार जागृतीबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले.

यावेळी ‘पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक मतदान सहभाग’ अर्थात ‘स्वीप’च्या समन्वयक सविता खारतोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. विलास कर्डीले यांच्यासह कु. सोहम वाघ, चंद्रहास धुमाळ, सिद्धार्थ काळे, साक्षी फाळके, गायत्री केद्रे, शर्वरी बाचल, प्रतिभा बोराटे आदी उपस्थित होते.

बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत मतदानाचा टक्क्यात वाढ होण्याकरीता मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बसस्थानक येथे आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात ‘मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो…. आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रवाशी व एसटी कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विधानसभा निवडणुकीत सहभागी होत येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे, असे त्यांनी आवाहन करण्यात आले.

आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा; बारामती प्रचारसभेत सूरज चव्हाणचं बारामतीकराना आवाहन..

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बारामती-

बारामती मतदारसंघातून दि.28 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी कण्हेरी येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांनी अर्ज दाखल केला.त्यानंतर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने खास उपस्थिती लावली होती. एवढंच नव्हे तर त्याने भाषण करत अजित पवारांना मतं देण्यासाठी जनतेला आवाहन केलं.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाणची खास भेट घेतली होती. त्याला शाबासकीची थाप देऊन अजित पवारांनी कौतुक केलं होतं. यावेळी अजित पवारांनी सूरजला त्याच्या गावात चांगलं घर बांधून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. नुकताच सूरजच्या गावातल्या नव्या घराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी सूरजने अजित पवारांचे आभार व्यक्त केले होते. त्यानंतर 28 ऑक्टोबर ला सूरज तोंड लपवत अजित पवारांच्या बारामती सभेत उपस्थित राहिला.
अजित पवारांच्या सभेत सूरज चव्हाण आल्याचं समजाताच जनता ओरडू लागली. त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सूरजचं स्वागत केलं. पुढे सूरज एका मिनिटांचं भाषण करत हात जोडून म्हणाला, “नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण. आई मरीमाता… ओम नमः शिवाय… शिव शंभो… हर हर महादेव… ऐका बाप्पा मोरया… माझं स्वप्न दादांनी पूर्ण केलंय आणि गरिबांना दादांनी मदत केली. तर मनापासून दादांचे आभार मानतो. आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा.” असे आपल्या स्टाईलमध्ये बारामतीकरांना आवाहन केले व उपस्थिताचे पुन्हा एकदा मन जिंकले.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जणांनी 24 अर्ज केलेला दाखल

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-प्रमोद शिंदे –

उत्तम शिवदास जानकर(अपक्ष)विकास संदिपान धाईजे(अपक्ष),राम सातपुते, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे, यांच्यासह अनेकांनी भरले उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जणांनी 24 अर्ज‌ दाखल केले यामध्ये ,अनिल गौतम नवगिरे
(अपक्ष),नागेश आबा जाधव (अपक्ष)सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष)त्रिभुवन विनायक धाईजे(अपक्ष)
त्रिभुवन विनायक धाईंजे,प्रहार जनशक्ती (ए.बी. फॉर्म अप्राप्त)कुमार आनंदा लोंढे(अपक्ष)राम विठ्ठल सातपुते (भा.ज.पा)संस्कृती राम सातपुतेभा.ज.पा. (ए.बी. फॉर्म अप्राप्त),ज्ञानेश्वर मारूती काटे(अपक्ष)अतुल श्रीमंत सरतापे(अपक्ष)शरद गेना सावंत(अपक्ष)दादा विश्वनाथ लोखंडे(अपक्ष)नंदकुमार कृष्णाजी साळवे,आर. पी. आय. (अठवले गट) (ए.बी. फॉर्म अप्राप्त)

वंचित बहुजन अघाडीचे वतीने राज यशवंत कुमार प्रकाश वामन नवगिरे(अपक्ष)अनिल तानाजी साठे(अपक्ष)शैलेश जनार्धन कोतमिरे(अपक्ष)धनंजय तुकाराम साठे(अपक्ष)!लालासाहेब ज्ञानोबा आडगळे,नॅशनॅलिस्ट काँग्रस पार्टी (शरदचंद्र पवार) पर्यायी उमेदवार,प्रा.डॉ. सुनिल सुखदेव लोखंडे(रा.स.प.)किशोर शिवाजी सुळ(अपक्ष)किशोर शिवाजी सुळ,भा.ज.पा. (ए.बी. फॉर्म अप्राप्त) यांनी अर्ज भरले.माळशिरस (अ.जा) राखीव मतदार संघात शेवटच्या दिवसा अखेर 29 जणांचे एकुन 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले,यामध्ये सहा जणांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले आहेत.

माझ्यासोबत अदृश्य शक्ती आहे असे म्हणत राम सातपुतेनी भरला उमेदवारी अर्ज

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

https://youtu.be/-SU1L8stIvc?si=Nc8Gs5nZyUA7bfR_

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार म्हणून ते आमच्या सोबत असतील-राम सातपुते
अदृश्य शक्ती माझ्यासोबत आहे. व रणजितसिंह मोहिते पाटील तेही आमच्या सोबत असतील या राम सातपुतेंच्या वक्तव्यावर संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.अदृश्य शक्ती कोण ? हा प्रश्न देखील माळशिरस तालुक्यातील जनतेच्या समोर पडला आहे.

254 माळशिरस विधानसभेसाठी आमदार राम सातपुते यांनी शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांनी मोठे शक्ति प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मांडवे येथील निवासस्थानापासून ते अकलूज प्रांत कार्यालय पर्यंत रॅली काढत कार्यकर्त्यांनी घोषणा देत राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोलताना आराम सातपुते म्हणाले की ही लढाई जनतेच्या हातातील आहे.जनतेने मला उभ केलं आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे. माझ्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे.त्यामुळे ही निवडणूक मी निवडून येणारच.तसेच पत्रकार करांनी प्रश्न विचारला असता मोहिते पाटील तुमच्या सोबत असतील का? या प्रश्नाचे उत्तर देताना राम सातपुते म्हणाले रणजीत सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार आहेत निश्चितच ते आमच्या सोबत असतील लाडकी बहीण योजनेतील बहिणींना सरकारकडून साडेसात हजार रुपये आमच्या सरकारने दिले आहेत आणि या पुढेही ही योजना चालू राहील असे राम सातपुते म्हणाले.

आ. राम सातपुते आज भरणार अर्ज

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दाखल करण्याची मंगळवार दिनांक २९ ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे माळशिरस मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आरोग्य दूत दमदार आम दार राम सातपुते हे उद्या दिनांक २९/१०/२०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता अर्ज भरणार आहेत.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच राम सातपुते आपल्या मतदारसंघात आल्यानंतर तालुक्यातील कानाकोपऱ्यातील जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी राम सातपुते तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. राम सातपुते यांनी आपण स्वतःच्या हिमतीवर या मतदारसंघात मागील पाच वर्षात प्रामाणिकपणे केलेल्या विकास कामाच्या जोरावर व गोरगरिबांच्या आशीर्वादावर निवडून येणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

माळशिरस मधून उत्तमराव जानकर व विकास धाईंजे यांनी भरला उमेदवारी अर्ज.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

– माळशिरस 254 विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचा अधिकृत  उमेदवार म्हणून .उत्तमराव जानकर साहेब व आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांचा मोठ्या शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज भरण्यात आला यावेळी  अकलूज सहकारी साखर  कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, संसदरत्न व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार..सुप्रियाताई सुळे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कायदा हातात घ्याल तर खैर नाही:-पो.नि.भिमराव खणदाळे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.
या सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए यासारखी कारवाई करण्यात येणार आहे सांगोला पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यातील सुमारे ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, टोळीने गुन्हे केलेल्या २ टोळ्यावर (महाराष्ट्र पोलीस कलम ५५ प्रमाणे) २ वर्षांसाठी ४ जिल्ह्यातून तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे तर १ जणांवर एमपीडीएची कारवाई (महाराष्ट्र पोलीस कलम कायदा ५६ प्रमाणे) ४ जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.
तसेच सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार केली असून प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी व एमपीडीएची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होवून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्या दिवसापासून उमेदवारांना पुढे १८ नोव्हेंबरपर्यंत प्रचार करता येईल. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
या काळात पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष राहणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हा केल्यास पुढे त्यांच्यावर स्थानबद्धतेची किंवा तडीपारीची कारवाई होवू शकते.
त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी, लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी केले आहे.
निवडणूक काळात सामाजिक शांतता व ‘सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे नेहमीच लक्ष असते, पण निवडणूक काळात विशेष लक्ष राहणार आहे.