प्रमोद शिंदे

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे पवारांची “उत्तम “खेळी

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे  पवारांची “उत्तम “खेळी
 संपादक (प्रमोद शिंदे )- माळशिरस तालुक्यात लोकसभे पासूनच राजकारणाला एक वेगळे वळण लागले आहे लोकसभेला पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादी साठी मोहिते- पाटलांना डावल्या मुळे माळशिरस तालुक्याच्या राजकारणात काळोख पसरला होता मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा प्रकाश टाकला परंतु तोच प्रकाश राष्ट्रवादीसाठी काळोख ठरला त्यातच आता विधानसभेला राष्ट्रवादीकडून शरद पवारांनी भाजपचे नाराज उत्तमराव जानकर यांना टिकीट देऊन  जणूकाही  काळोखात शरदाचे चांदणे  आणले आहे व पवारांनी  राजकारणात उत्तम जानकर यांच्या माध्यमातून  उत्तम खेळी  माळशिरस तालुक्यात  केली आहे  त्यामुळे  राष्ट्रवादीला  नवसंजीवनी  मिळाली असून कार्यकर्त्या मध्ये  नवचैतन्य  निर्माण होऊन  मोहिते पाटलांन विरोधात पुन्हा एकदा मोठी फळी उभी राहिली आहे .माळशिरस तालुक्यातील  चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पंचायत समिती माळशिरस चे माजी उपसभापती उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नुकतीच जाहीर केली असल्याने उत्तमराव जानकर गटामध्ये व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळालेली असून लोकसभेच्या वेळेला मोहिते-पाटील आणि विरोधी गट एकत्र असल्याने भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला आहे. 
माळशिरस तालुक्यामध्ये दोन्ही गट एकत्र झाल्याने माळशिरस तालुका हा पूर्वीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा तो आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून लोकसभे पासून ओळखला जाऊ लागला त्यातच आता फूट पडली आहे व. उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीमुळे माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला नवचैतन्य निर्माण झालेले आहे. उत्तमराव जानकर यांच्यामुळे मोहिते-पाटील गटाच्या  उमेदवाराला  मोठा फटका बसू शकतो.उत्तम जानकर हे खासदार रंजीत सिंह निंबाळकर यांचे निकटवर्ती असल्यामुळे माळशिरस तालुक्यातून जानकर यांना मदत होऊ शकते का हाही मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे शरद पवारांच्या उत्तम खेळीमुळे मोहिते- पाटीलांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे का हा येणारा काळ सांगू शकेल.

सरपंच अमर जगताप यांच्या प्रयत्नांना यश तलावात पाणी सोडण्यास मंजुरी*

सरपंच अमर जगताप यांच्या प्रयत्नांना यश तलावात पाणी सोडण्यास मंजुरी*
नातेपुते( प्रमोद शिंदे)- कारुंडे तालुका माळशिरस येथील लघुपाटबंधारे तलाव कोरडा पडला असल्याने कारुंडे गावात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कारुंडे या भागात विहिरी नाले बोरवेल याचे पाणी आटले आहे. त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने धीम बलवाडी धरणातील पाणी कारुंडे तलावात सोडण्याची मागणी सरपंच अमर जगताप व ग्रामस्थांनी दिनांक  26 /9 2019 ग्रामसभेचा ठराव करून केली होती.लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती याची दखल घेत लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता बोडके यांनी दिनांक 30/9/2019 रोजी पाणी सोडण्याची मंजुरी पत्राद्वारे दिली आहे.लवकरच तलावामध्ये पाणी सोडले जाईल अशी माहिती सरपंच अमर जगताप यांनी दिली.

राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार साहेबांचा कसलाही संबंध नसताना नाव घेण्यात आला म्हणून राजीनामा दिला अजित पवारांचा खुलासा* *पत्रकार परिषदेत अजित दादा झाले भाऊक त्यांना अश्रू अनावर झाले*

  • राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार साहेबांचा कसलाही संबंध नसताना नाव घेण्यात आला म्हणून राजीनामा दिला अजित पवारांचा खुलासा*
    पत्रकार परिषदेत अजित दादा झाले भाऊक त्यांना अश्रू अनावर झाले*
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याचा खुलासा त्यांनी आज पत्रकार परिषे देत केला. ज्या बँकेत १० ते १२ हजार कोटी ठेवी आहेत त्या बँकेत २५ हजार कोटीचा गैरव्यवहार कसा होवू शकतो असे ते म्हणाले.
    यावेळी ते म्हणाले, आमचे बोर्ड जेव्हा बरखास्त झालो तेव्हा बिनविरोध निवडून आलेले होतो याचिकाकर्त्यांनी 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच आरोप केला. ज्या बँकेच्या ठेवी 10-12 हजार कोटी आहेत त्या बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होऊ शकतो. साखर कारखाने, सूतगिरण्या विक्रीला काढण्यात आल्या. राज्य बँक ही शिखर बँक आहे. एखादा सरकारी साखर कारखाने, सूतगिरण्या दुष्काळ किंवा अन्य संकटामुळे अडचणीत येतात तेव्हा आऊट ऑफ दी वे जाऊन मदत करावी लागते. या राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच चार कारखान्यांना मदत केली आहे. केंद्र सरकारही करते. माझ्या काळात जे कर्जवाटप झाले ते फिटलेले आहे. सरकारने हमी दिली होती. कर्ज कारखाने विका आणि कर्ज फेडण्याचे आदेश होते. यामुळे कारखाने विकण्यात आले. आज ही बँक 285 कोटी नेट प्रॉफिटमध्ये आहे. मग 25 हजार कोटींचा घोटाळा झाला तर ही बँक बुडाली नसती का, असे पवार म्हणाले. राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवारांचा काडीचा संबंध नाही, दुरान्वये संबंध नाही. मात्र, त्यांचे नाव यात आल्याने मी अस्वस्थ झालो होतो, असे अजित पवार म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत अजितदादा भावूक झाले होते पुढे ते म्हणाले की पवार साहेब देतील ते आदेश आम्ही पाहणार आहोत पवार साहेब हे आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांचा प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य आहे आमच्या कुटुंबांमध्ये कसलाही कलह नाही इथून पुढे पवार साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू आम्हाला सोडून गेलेले लोक या लोकांना सांभाळण्यासाठी कदाचित आम्ही कमी पडला असेल म्हणून ते आम्हाला सोडून गेले परंतु यांच्यावरती आम्ही टीका केली नाही शिखर बँक घोटाळा प्रकरणी 69 जनां वरती गुन्हे दाखल आहेत परंतु अजित पवारांचं नाव याच्यात असल्यामुळे हा सगळा उठाठेव हे लोक करत आहेत असा आरोप अजित पवारांनी केला आहे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्या नसल्याचा ठामपणे अजित पवार यांनी सांगितलं

माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण

माळशिरस नगरपंचायतीमध्ये बेकायदेशिर कर्मचारी भरतीच्या निषेधार्थ पुणे येथे आमरण उपोषण,
माळशिरस( प्रमोद शिंदे) 2015 मध्ये माळशिरस येथे ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली यावेळी या ठिकाणी कार्यरत असणारे अनेक कर्मचारी आकृतीबंध नुसार कमी करण्यात आले,याचा फायदा घेत तत्कालीन ग्रामसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी व भरती प्रक्रियेशी निगडीत सर्व अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मुळ पात्रताधारकांना बाजूला करून त्यांचे ठिकाणी इतर लोकांना कामाला लावले आहे ही संपूर्ण भरती प्रक्रिया बेकायदेशीर व अनाधिकृत आहे .सध्या हे लोक नगरपंचायत मध्ये स्वतःचा एकाधिकारशाही नुसार कार्यभार सांभाळत आहेत माळशिरस या नगरपंचायती मध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या लोकांना व्यवस्थित बोलत नाही त्यांची कामे वेळेत करत नाही त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश थोरात यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये संबंधित विभागाकडून या कर्मचारी भरती ची संपूर्ण माहिती मागवली असता त्यामध्ये त्यांना तफावत दिसून आली त्यानुसार त्यांनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व ही बेकायदेशीर झालेल्या कर्मचारी -अधिकारी नियुक्तीची चौकशी करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी वेळोवेळी मा.मुख्याधिकारी नगर पंचायत माळशिरस सोलापुर येथील वरिष्ठ म्हणजेच मा.जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे वेळो-वेळी कागदोपत्री पाठपुरावा केला मात्र , तक्रारदारांचे पदरी निराशाच पडली. संबंधित अधिकारी या प्रकरणी मौन बाळगून होते , त्यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही उलट याप्रकरणी अधिकारी जाणीवपुर्वक उदासीनता दाखवित असून त्या ठिकाणी सुध्दा,आर्थिक व्यवहार झाले असल्याचे मंगेश थोरात यांचे म्हणणे आहे .त्यानुसार यापुढे मा.विभागीय आयुक्त सो,(महसुल)पुणे यांचे यांचे कार्यालयात सुद्धा या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला, मात्र ,अद्यापि त्या ठिकाणी ही कोणतीच कार्यवाही, कारवाई झालेली दिसून आलेली नाही , त्यामुळे या सर्व भ्रष्ट प्रशासनाच्या निषेधार्थ मा.विभागीय आयुक्त सो (महसूल) पुणे,विधानभवन, यांचे कार्यालयासमोर दि. १ ऑक्टोबर २०१९ रोजी, सकाळी ९ वाजता आमरण उपोषणास बसणार आहे अशी माहिती मंगेश थोरात यांनी दिली,यावेळी सामाजिक कार्यकर्ता सुनील ओवाळ, आदी उपस्थित होते.

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली. सविता ढोबळे

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली. सविता ढोबळे

कृष्णामाईच्या प्रेरणेमुळेच सहकार महर्षिनी माळशिरसमध्ये क्रांती केली.
सविता ढोबळे
नातेपुते ( प्रतिनिधी)
कृष्णामाई माने पाटील या आदर्श माता होत्या. त्यांनी आपल्या मुलांवर सामाजिक कार्याचे संस्कार केले. त्यांच्या प्रेरणेमुळेच सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात क्रांती केली असे मत साविता ढोबळे यांनी व्यक्त केले आहे.
मोरजाई विद्यालय मोरोची ता माळशिरस येथे कृष्णामाई माने पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यातआली त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्याध्यापक विकास सुर्यवंशी, रामहरी आचार, बाळासाहेब बळवंतराव , फिरोज आतार, संपत रुपनवर, आशा महामुनी, दिपाली जाधव, सुनंदा वजाळे, रणजित बाबर, बाळासाहेब लवटे, विठ्ठल लोंढे उपस्थित होते . यावेळी कु केतकी पाटील, पुनम अवघडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना सौ ढोबळे म्हणाल्या की, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरसच्या माळरानावर सहकार, शैक्षणिक,कृषी औद्योगिक , दुग्ध क्रांती केली आहे. त्यांच्या मातोश्री कृष्णामाईनी लहानपणी केलेल्या सामाजिक कार्याच्या संस्कारामुळे , कृष्णामाईनी आपली तिन्ही मुले कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, धर्मवीर सहाशिवराव माने पाटील, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांना आदर्श घडवण्यासाठी प्रयत्न केले. इथल्या सामान्य लोकांचे दुःख दुर व्हावे यासाठी सहकारी संस्था स्थापना करुन जीवनमान उंचावण्याची प्रेरणा त्यांनी दिली . त्यांचे स्वप्न आज प्रत्येक्षात उतरलले पहावयास मिळत आहे. सहकारमहर्षिनीं स्थापन केलेल्या संस्था गरीबांची आश्रयस्थाने बनलीआहेतअसे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक भागवत यांनी केले तर आभार प्रथमेश पाटोळे यांनी मानले..

शरद पवार यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यात कडकडीत बंद


 
चौकट-( शरद पवार साहेब यांच्यावर केलेली कारवाई ही  सूडबुद्धी च्या राजकारणातून केलेली कारवाई आहे विधानपरिषद आमदार रामहरी रुपनवर)
नातेपुते( प्रमोद शिंदे )-शरद पवार यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळा संदर्भात गुन्हा दाखल केल्यामुळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी कडून निषेध म्हणून माळशिरस तालुक्यातील माळशिरस ,सदाशिवनगर ,नातेपुते सह अनेक ठिकाणी सर्व व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या या बंदला व्यापारी बंधूंनी ही साथ दिली आहे तसेच विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की ही कारवाई भाजपने सूडबुद्धीने केली आहे शरद पवारांचा यामध्ये काही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रयत्नन केला आहे आम्ही  शरद पवार साहेब  यांच्या  सोबत आहोत  69 जणांवरती  गुन्हे दाखल असताना  शरद पवारांना का टार्गेट केले जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी युवकचे अक्षय भांड व अनेक कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारचे मत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले आहे.

शरद पवार यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यात कडकडीत बंद

 शरद पवार यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यात कडकडीत बंद
 
चौकट-( शरद पवार साहेब यांच्यावर केलेली कारवाई ही  सूडबुद्धी च्या राजकारणातून केलेली कारवाई आहे विधानपरिषद आमदार रामहरी रुपनवर)
नातेपुते( प्रमोद शिंदे )-शरद पवार यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळा संदर्भात गुन्हा दाखल केल्यामुळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी कडून निषेध म्हणून माळशिरस तालुक्यातील माळशिरस ,सदाशिवनगर ,नातेपुते सह अनेक ठिकाणी सर्व व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या या बंदला व्यापारी बंधूंनी ही साथ दिली आहे तसेच विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की ही कारवाई भाजपने सूडबुद्धीने केली आहे शरद पवारांचा यामध्ये काही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रयत्नन केला आहे आम्ही  शरद पवार साहेब  यांच्या  सोबत आहोत  69 जणांवरती  गुन्हे दाखल असताना  शरद पवारांना का टार्गेट केले जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारचे मत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले आहे.

वैभव गीते यांच्या प्रयत्न मुळे चर्मकार समाजातील मयत संतोष लक्ष्मण भालके यांच्या कुटुंबा चे पुनर्वसन

वैभव गीते यांच्या प्रयत्न मुळे चर्मकार समाजातील मयत संतोष लक्ष्मण भालके यांच्या कुटुंबा चे पुनर्वसन

सतीश लक्ष्मण भालके यांना मिळाली शासकीय नोकरी

नातेपुते( प्रमोद शिंदे) -मे 2015 मध्ये कंधार तालुका नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे संतोष लक्ष्मण भालके यांची निर्घृण हत्या झाली होती चार वर्षानंतरसुद्धा शासनाने त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन केलेले नाही म्हणून
त्यांचे बंधू साईनाथ भालके राहणार गोणार ता.कंधार जि. नांदेड यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव Dr. केवलजी उके व वैभवजी गिते यांच्याकडे कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची विनंती केली होती,dr. केवलजी उके यांनी ही जबाबदारी . वैभवजी गिते यांचेवर सोपवली होती
चर्मकार समाजातील मयत संतोष लक्ष्मण भालके कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे अशी घोषणा वैभव गितेनी काही महिन्यांपूर्वीच केली होती
जिल्हाधिकारी नांदेड,आयुक्त समाजकल्याण पुणे,सामाजिक न्याय व विशेष सहायय विभाग मंत्रालय या विभागांकडे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेने कायदेशीर पाठपुरावा करून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र निदर्शने करून शासनावर दबाव तयार केला यामुळे दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी सहाययक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांनी शासकीय नोकरीत सामावून घेतल्याची आदेश काढले भालके कुटुंबांनी Dr.केवलजी उके व वैभवजी गिते आभार मानले
महाराष्ट्रातील खून झालेल्या 399 कुटुंबांचे पुनर्वसन केल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही असे वैभव गिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
यापूर्वीच Dr. केवलजी उके व मा. रमाताई आहिरे यांच्या मार्गदर्शनात वैभवजी गिते यांनी नितीन आगे,माणिक उदागे,सागर शेजवळ,विशाल पगारे,संजय दनाने,या गाजलेल्या खून खटल्यांमध्ये त्यांच्या कुटुंबांना नोकरी,जमीन पेन्शन मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने डॉक्टर एम के इनामदार यांना सन्मानपत्र देण्यात आले

महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड संकल्पनेतून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल ने झाडे लावा झाडे जगवा अभियान राबवले होते या अभियानात सुप्रसिद्ध हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर एम के इनामदार यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून सहकार्य केल्याबद्दल त्यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले