मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार अर्ज मागे घेण्याचे कार्यकर्त्यांना सूचना
मनोज जरांगे केल्यानंतर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी एका दिवसातच या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.मित्रपक्षांनी यादी न पाठवल्याने आपण माघार घेत आहोत. यादीच नाही म्हटल्यावर लढायचे जमेल का? एका जातीवर कसे निवडन येणार माझ्यावर कोणाचाही दबाव नाही- मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा सुरुवात करणार असल्याचेही यावेळी जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक संपली की आपले आंदोलन सुरू करणार आहोत. पुन्हा आपल्या जातीसाठी आपण लडू. याला पाड आणि त्याला पाड म्हणायची माझी इच्छा नाही कारण जिंकून कोणी तिसराच येईल. कोणाच्याही प्रचाराला मला जायचे नाही. तसेच, आमचा कोणत्याही पक्षाला, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही. माझ्यावर महायुती किंवा मविआ, कोणाचाही दबाव नाही असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

























