पिरळे- नातेपुते रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी अन्न त्याग आंदोलनास यश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अनेक वर्षापासून पिरळे नातेपुते रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम अनेक वर्ष विविध कारणांमुळे रखडले होते.या रस्त्यांमुळे अनेक विद्यार्थी वृद्ध व नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत पत्रकार विनायक धनाजी सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून शेवटी बांधकाम विभागास व प्रशासनास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देत दिनांक 5 जानेवारी रोजी आंदोलन सुरू केले या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी पत्र देत तात्काळ डांबरीकरणाचे काम सुरू करत असल्याचे श्वासन दिले. या आंदोलनास नातेपुते येथील भाजपाचे नेते बाबाराजे देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी सुद्धा या आंदोलनाची फोनवरून चौकशी करून कार्यकर्त्यांना पाठवून पाठिंबा दर्शवला.तसेच एन डी एम जे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे व ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.रस्त्याचे काम सुरू करत असल्याबाबतचे पत्र देताना बांधकाम विभागाचे उपअभियंता गोविंद कर्णावर- पाटील, शाखा अभियंता शुभम कोले, पिरळे माजी सरपंच महादेव शिंदे, प्रमोद शिंदे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोरटे, ठेकेदार संजय मोठे,रणजीत कसबे विकास दडस व इतर मान्यवर उपस्थित होते.,तसेच नातेपुते परिसरातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्षात भेट देऊन पाठिंबा दिला या यशाबद्दल विनायक सावंत यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
