पिरळे-दहिगाव रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेने सातवीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील खड्डे आणि झाडीमुळे अपघातांत वाढ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे: सोलापूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भीषण अपघातात सातवीत शिकणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून,रस्त्यावरील खड्डे आणि दोन्ही बाजूंच्या झाडीमुळे या भागात अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याची तीव्र चिंता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटने संदर्भात हाकिकत आशि की फिर्यादी युवराज शिंदे यांचा १५ वर्षीय मुलाचा मुलगा शंभू विकास शिंदे हा दहिगाव येथील हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होता. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास शंभू हा सायकलवरून शाळेतून घरी जात होता.तो दहिगाव ते पिरळे – रोडवरील खंडोबा मंदिरासमोर आला असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरने (ट्रॅक्टर व डंपिंग ट्रेलरजवळील चालक: प्रतीक शेखर नरोळे, रा. पिरळे) त्याच्या सायकलला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात शंभू सायकलवरून खाली पडून ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि जागीच मयत झाला.घटनेनंतर ट्रॅक्टरचालक कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला होता.या प्रकरणी नातेपुते पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून सदर दोन आरोपीस ताब्यात घेतले असून, पोलीस हवालदार अमोल वाघमोडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
चौकट -खड्डे आणि झाडी ठरत आहेत जीवघेणी सदर अपघाताच्या ठिकाणी आणि परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली असून, रस्त्यामध्येही ठीक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहन चालवताना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि झाडीमुळे समोरील व बाजूकडील रस्ता नीट दिसत नाही. परिणामी, या भागातील खराब रस्ते आणि वाढलेली झाडी यामुळे अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे या अगोदर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एन.डी एम जे राज्य प्रसिद्ध प्रमुख तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रमोद शिंदे यांच्या वतीने पिरळे व परिसरातील रस्ते दुरुस्त करण्यासंदर्भात वेळोवेळी पत्राद्वारे मागणी केली आहे सदर अपघाताच्या घटनेमुळे संबंधित बांधकाम विभागावर संताप व्यक्त होत आहे खड्डे व रस्त्यातील झाडे झुडपामुळे होणारे अपघातास संबंधित विभाग व अधिकारी जबाबदार आहेत व याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

