अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महागाई भत्यासह दरमहा 5000 रु पेन्शन मंजूर
अजिनाथ राऊत यांनी केलेल्या लढ्याला ऐतिहासिक यश
अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महागाई भत्यासह दरमहा 5000 रु पेन्शन मंजूर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.
उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2019 ते 2022 या तीन वर्षांत अॅट्रोसिटी अंतर्गत जातीय अत्याचारात खुन झालेल्या सात पिडीत कुटुंबातील व्यक्तींना नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत व त्यांच्या जिल्हा टिमने शासनाच्या विविध कार्यालयांना पत्रव्यवहार करुन गेली तीन वर्षांपासून केलेल्या खडतर पाठपुराव्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी राज्य शासकीय कर्मचारी यांना लागु असलेल्या महागाई भत्यासह दरमहा 5,000 रु पेन्शन मंजुर केल्याचा आदेश पारीत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय दलीत न्याय आंदोलन या सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव अॅड. डॉ. केवलजी ऊके, राज्य सचिव वैभवजी गिते यांनी दिलेल्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी उपाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, जिल्हा सचिव काशिनाथ कांबळे, कोषाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, जिल्हा युवकाध्यक्ष आकाश चव्हाण यांच्या सहकार्याने मंत्रालयात संबंधित विभाग, विधानभवन, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी उस्मानाबाद यांचेकडे गेली तीन वर्षांपासून वेळोवेळी कायदेशीर पत्रव्यवहार करुन आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता अखेर त्यांनी जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कचेरीसमोर दि. 6 डिसेंबर 2022 रोजी स्वतः आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता त्यानंतर त्याच दिवशी जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त यांनी तात्काळ पिडीतांच्या पुनर्वसनाची पावले उचलत जिल्ह्यात अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या सात कुटुंबातील व्यक्तींना पेन्शन मंजूर करुन उर्वरीत खुन प्रकरणात पुढील जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मासिक बैठकीत मंजुर करण्याचे आश्वासन अजिनाथ राऊत यांना दिले आहे. पेन्शन मंजुर केल्याचा आदेश मिळाल्याने व पुढील खुन प्रकरणातील वारसांचे पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राऊत यांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा मागे घेतला आहे. अत्याचार पिडीत व्यक्तींच्या वारसांना पेन्शन मंजूर केल्याने राऊत यांचेवर सामाजिक, राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातून कौतुक करुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.