नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक
– चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे राहणार नातेपुते तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते *वाहन टाटा टिपर* नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर *डिस्कसह किंमत 75,000/ रुपये* खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा *कडेगाव जिल्हा सांगली येथील* नामे बुरान इलाही मुलानी वय – 40 वर्षअसे असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगांव जिल्हा सांगली येथे पकडण्यात आले. सदर आरोपीस याबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर आरोपीस वरील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आले. पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपीने गुन्ह्यातील चोरीस गेलेला *माल दोन टायर* *डिस्कसह किंमत 75,000/ रुपये**व *त्यासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची झेन कार तसेच उभे वाहनाचे टायर काढण्यासाठी वापरलेली जॅक व नट बोल्ट काढण्या साठी वापरलेली मशीन* *अशी एकूण 2,04,000/ किं* किमती मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेले आहे. सदर आरोपीवर आटपाडी पोलीस ठाणे येथे यापूर्वी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास ASI पाठकुलकर हे करीत आहेत. सदर गुन्ह्याचे फिर्यादी यांनी पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजने व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील सहा. पोलीस फौजदार श्रीकांतनिकम, पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस नाईक दत्ता खरात ,सहा पोलीस फौजदार सत्यवान पाटकुलकर, सुभाष गोरे पोका / सचिन चव्हाण, मनोज शिंदे, रंजीत मदने, नातेपुते पोलीस ठाणे तसेच *सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी* यांनी केली आहे.






























































