शिक्षण हे आजकालच्या प्रत्येक गोष्टीवरील प्रभावी लस आहे -डॉ.एम के इनामदार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

 पिरळे ता.माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालय येथे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शिक्षण हे आज कालच्या प्रत्येक गोष्टीवरील प्रभावी लस आहे आणि ही शिक्षणाची लस प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे.आपण शिक्षण घेतले तर प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो.तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागात तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध आहेत त्या संधीच आपण सोनं केलं पाहिजे.पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडून दिलं पाहिजे. प्रत्येक व्यवसाय आपल्या आवडीने करायला हवा. सध्या कम्प्युटर युग आहे प्रत्येक विद्यार्थ्याने कम्प्युटर प्रशिक्षण घ्यायला हवं. विद्यार्थ्यांनी एकमेकांबद्दल आदर बाळगला पाहिजे तसेच देशाच्या संविधाना बद्दल आदर असला पाहिजे.46 वर्षाच्या कारकिर्दीत ग्रामीण भागात पहिल्यांदाच एवढी चांगली प्रात्यक्षिक समता माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून पाहायला मिळाली,अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम भोसले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की खेड्यापाड्यातील गावकुसातील मुलांना समता माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळत आहे . क्षणा शिवाय पर्याय नाही. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजा रोहनाने करण्यात आली. यावेळी  एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन, धनुर विद्या, लाठी काठी, रायफल शूटिंग, फायर फायटिंग, चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर केली.ओपन जीपमधून शाळेच्या मैदानात मधून डॉक्टर इनामदार यांनी संचलन पाहणी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले. यावेळी डॉक्टर इनामदार यांना संस्थेच्या वतीने देव माणूस काळजीचे प्रतीक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच संस्थेच्या सभापती पदी प्रमोद काका डूडू यांची निवड झाल्याबद्दल व  महावितरणच्या जिल्हा समन्वयक पदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल दत्तात्रेय रुपनवर यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे  संचालक जब्बर शिंदे, दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष दासाहेब शिंदे सर, कांतीलाल माने, मा.सरपंच ज्ञानदेव शिंदे साहेब, संदीप शेठ नरोळे, काशिनाथ दडस,पोलीस पाटील औदुंबर बुधावले, सरपंच बाळासाहेब शिंदे,संस्थेचे चेअरमन महादेवजी शिंदे,गणेश दडस, दत्तात्रेय लवटे,किशोर मसुगडे, पत्रकार प्रमोद शिंदे,हरिभाऊ लवटे,मनोज डूड्ड,तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ,पालक विद्यार्थी शिक्षक स्टाफ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य दीपक शिंदे सर,दादासाहेब शिंदे सर,सर्व संचालक यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

You may have missed